MPSC परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; सुरु करा महाराष्ट्रनामा'वर लेखी परीक्षेचा ऑनलाईन अभ्यास

मुंबई: राज्यातील महाविकास आघाडीचंसरकार स्थापन झाल्यावर जाहीर झालेली ही पहिली भरती आहे. महाराष्ट्रातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये भरती प्रक्रिया पार पडणार असून त्यासाठी शहर आणि ग्रामीण महाराष्ट्रातुन लाखो तरुण आणि तरुणींनी मैदानी परीक्षेची तयारी सुरु केली आहे. मात्र नव्या नियमानुसार उमेदवारांना प्रथम ऑनलाईन लेखी परीक्षेला सामोरं जावं लागणार असल्याने प्रचंड अभ्यासाची गरज आहे, अन्यथा सर्व मेहनत वाया जाईल.
तत्पूर्वी फडणवीस सरकारने केलेल्या नव्या नियमानुसार महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांच्या नोकरभरतीच्या परीक्षा महापोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जात आहेत. मात्र, या महापोर्टलबाबत अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत आणि राज्यभर मोठीं आंदोलनं झाली आहेत. मात्र राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्याने त्यासंदर्भात देखील घडामोडी घडू लागल्या आहेत.
त्याअनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापोर्टल बंद करुन चांगले पोर्टल सुरु करण्याची विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे आणि सरकारपातळीवर जो निर्णय व्हायचा तो होईल. त्यालाच अनुसरून महाराष्ट्रनामा न्यूज’ने राज्यातील तरुण-तरुणींसाठी मोफत ऑनलाईन अभ्यासाची सोय करून दिली असून, राज्यभरातून हजारो तरुण या सुविधांचा फायदा घेत आहेत. तरी आपण सुद्धा त्याच तयारीत असाल तर जास्तीत जास्त लेखी परीक्षेचा सराव करावा आणि त्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून सातत्याने अभ्यास सुरु ठेवावा.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) पुढील वर्षी घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यात राज्य सेवा परीक्षेसह अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षेसह कृषी सेवा परीक्षेचा समावेश आहे. आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार राज्यसेवा परीक्षेतील पूर्वपरीक्षा ५ एप्रिल तर मुख्य परीक्षा ८, ९ व १० ऑगस्ट रोजी होणार आहे. दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग परीक्षा १ मार्च तर मुख्य परीक्षा १४ जून रोजी घेतली जाईल. सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा १५ मार्च तर मुख्य परीक्षा १२ जुलै रोजी होणार आहे.
महाराष्ट्र वन सेवा पूर्व परीक्षा १० मे तर मुख्य परीक्षा ११ ऑक्टोबर रोजी असेल. महाराष्ट्र कृषी सेवा परीक्षेत ५ जुलै रोजी पूर्व परीक्षा तर १ नोव्हेंबर रोजी मुख्य परीक्षा घेण्यात येईल. पोलीस उपनिरीक्षक, राज्य कर निरीक्षक, सहायक कक्ष अधिकारी पदासाठी पूर्व परीक्षा ३ मे रोजी घेण्यात येणार आहे. तर महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त परीक्षा संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा ६ सप्टेंबर, पोलीस उप निरीक्षक पद मुख्य परीक्षा १३ सप्टेंबर, राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा २७ सप्टेंबर तर सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा ४ ऑक्टोबर रोजी घेतली जाणार आहे. (MPSC examinations are declared for PSI, Sales Tax Officer, Assistant officers)
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १७ मे रोजी होणार आहे तर स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा १८ ऑक्टोबर रोजी होईल. गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा ७ जून रोजी होणार आहे. संयुक्त पेपर क्रमांक-एकची मुख्य परीक्षा २९ नोव्हेंबर, लिपिक-टंकलेखक मुख्य परीक्षा ६ डिसेंबर, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क गट-क मुख्य परीक्षा १३ डिसेंबर रोजी तर कर सहायक मुख्य परीक्षा २० डिसेंबर रोजी घेतली जाणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं