तुमच्याकडे केसरी किंवा पिवळे रेशन कार्ड आहे? | जाणून घ्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेचे फायदे

मुंबई, २९ जून | महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य’ योजनेचे लाभ कसे घ्यायचे हे जाणून घेण्यासाठी हा लेख वाचा. महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना खरंतर २ जुलै २०१२ रोजीच महाराष्ट्र सरकारने राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केली होती. आता (२०१७ मध्ये) त्याच योजनेचं नाव बदलून महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना हे ठेवण्यात आलं आहे. (इथे आपल्याला राज-कारणात पडायचं नसून, उपयोगी अशा योजनेची माहिती घ्यायची आहे). आपल्याला अशा अनेक योजनांबद्दल माहिती नसते, कधी माहिती असली तरी त्याचा लाभ कोणाला घेता येतो आणि तो कसा घ्यायचा, त्यासाठी काय काय करावं याबद्दल आपण अनभिद्न्य असतो.
अशा गोष्टी कोणाला विचारायच्या, कोणाची मदत घ्यायची याबद्दल पण बऱ्याच जणांना माहिती नसते शिवाय बऱ्याच जणांना तर खात्रीशीर माहिती मिळेल का याचीच शाश्वती नसते. म्हणूनच आज आम्ही या योजनेबद्दल अगदी बारकाईने माहिती या लेखाद्वारे, देणार आहोत जेणेकरून ज्यांना याचा लाभ घ्यायचा आहे ते घेऊ शकतात.
सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने ही योजना २०१२ सालापासूनच सुरु केली आहे, पण सुरुवातीला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना या नावाने सुरु केलेली ही योजना केवळ आठ जिल्ह्यात राबवली जात होती. मात्र २०१७ मध्ये या योजनेचं नाव बदलून, महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजना करण्यात आलं आणि ती उरलेल्या २८ जिल्ह्यात सुद्धा राबवण्यास सुरुवात केली.
या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं?
* या योजनेचा लाभ दारिद्र्य रेषे खालचे व (दारिद्र्य रेषेवरचे- अन°धिकृत रित्त्या) लोक ज्यांच्याकडे पिवळं किंवा ऑरेंज कार्ड आहे अशीच लोकं घेऊ शकतात.
* या योजनेअंतर्गत अशा कुटुंबीयांची मेडिकल सेवा, हॉस्पीटलायझेशन आणि सर्जरी सुद्धा कव्हर केल्या जातात.
महाराष्ट्र सरकारच्या स्वास्थ्य मंत्रालयाद्वारे राबवल्या जाणाऱ्या या योजनेचा मुख्य हेतू हाच आहे की गरीबांना महागड्या वैद्यकीय सेवासुविधांचा लाभ घ्याता यावा. यलो आणि ऑरेंज कार्ड धारकांच्या परिवारातलं कोणी आजारी पडलं तर त्यांना महागड्या सुविधांचा लाभ या योजनेद्वारे घेता येईल. या आजारांच्या उपचारांसाठी (जिथे या योजनेचा लाभ घेता येईल) महाराष्ट्राच्या ३६ जिल्ह्यांमधली हॉस्पिटल निवडली गेली आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्या अटी पूर्ण कराव्या लागतात?
* महाराष्ट्रात ज्या परिवारांकडे ऑरेंज किंवा यलो रेशन कार्ड आहे.
* ज्या जोडप्याला दोन पेक्षा जास्त अपत्य नाहीत अशी जोडपी.
* या योजनेचा लाभ केवळ महाराष्ट्र राज्याचे नागरिकच घेऊ शकतात.
* ज्या शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.
* या योजनेचा लाभ घेण्यासाठी संपूर्ण परिवाराचं वार्षिक उत्पन्न १ लाखापेक्षा कमी असलं पाहिजे.
या योजनेअंतर्गत काय कव्हर केलं जातं?
या योजनेअंतर्गत सुमारे ९७१ प्रकारच्या सर्जरी, थेरपी आणि मेडिकल प्रोसिजर कव्हर केल्या जातात आणि या सगळ्यांची विभागणी एकूण ३० प्रकारात केली आहे, जसं की कार्डियाक सर्जरी, जनरल सर्जरी, पेडिऍट्रिक सर्जरी इत्यादी.
या योजनेसाठी अप्लाय कसं करायचं?
https://www.jeevandayee.gov.in/ ही या योजनेसाठीची ऑफिशिअल वेबसाईट आहे ज्यावर जाऊन आपण अप्लाय करू शकतो.
१. https://www.jeevandayee.gov.in/ (दिलेले वेबसाईटचे हे पूर्ण नाव ब्राउजर मध्ये कॉपी पेस्ट करता येईल) हि वेबसाईट ओपन केल्यावर तुमच्या कॉम्पुटर स्क्रीनवर या योजनेची शासनाद्वारे तयार केलेल्या अधिकृत वेबसाईटचं होमपेज उघडेल.
२. होमपेजवर आपल्याला ‘न्यू रजिस्ट्रेशन’चा ऑप्शन दिसेल त्यावर क्लीक करा.
३. यानंतर तुमच्या स्क्रीनवर एक फॉर्म उघडलेला तुम्हाला दिसेल, त्यात विचारलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तर टाईप करून द्यावी लागतील. तिथे यादी असलेली सगळी सर्टिफिकेट स्कॅन करून, अपलोड करून जोडावी लागतील.
४. यानंतर सबमिट असा एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करून फॉर्म सबमिट करता येईल.
महात्मा जोतिबा फुले जन आरोग्य योजनेसाठी अप्लाय करण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात?
१. निदान केलेल्या आजाराचं सर्टिफिकेट. (जे सरकारी डॉक्टरांकडूनच घेतलेलं असावं लागतं.)
२. अप्लाय करणाऱ्या व्यक्तीचे तीन पासपोर्ट साईझ फोटो.
३. वार्षिक उत्पन्नाचा दाखला.
४. वयाचा दाखला
५. आधार कार्ड
६. राशन कार्ड
सरकारच्या अशा अनेक योजना असतात, त्याबद्दल माहिती असणे आणि ती माहिती इतर लोकांना देणं हे महत्वाचं आहे.. आणि आपण ते नक्कीच करू शकतो. म्हणूनच लेख जास्तीत जास्त शेअर करा.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Benefits of Mahatma Fule Jan Aarogya Yojna government scheme news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं