दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | माहिती जाणून घ्या

मुंबई, ११ जुलै | विविध शासकीय योजनांसाठी दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
* दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्यासाठी सर्वात आधी “आपले सरकारची” https://aaplesarkar.mahaonline.gov.in/ हि वेबसाईट ओपन करायची आहे.
* त्यानंतर नवीन यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन नोंदणी करावे लागेल, नोंदणी झाल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर युजर आयडी आणि पासवर्ड येईल तो टाकायचा आहे व तुमच्या जिल्ह्याचे नाव टाकायचे आहे, तसेच खाली तुम्हाला कॅप्चा कोड टाकायचा आहे व लॉगिन करायचे आहे.
* आता तुमच्या पुढे आपले सरकारचे एक पेज ओपन होईल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश किंवा मराठी भाषा निवडण्यासाठी पर्याय दिलेला आहे, जर तुम्हाला मराठी भाषा निवडायचे असेल तर इंग्लिश वर सिलेक्ट करून त्याखाली मराठी भाषेचा पर्याय निवडा.
* त्यानंतर डाव्या बाजूला तुम्हाला शासनाच्या विविध सेवा आहेत त्या दिसतील, तिथे तुम्हाला “ग्रामविकास व पंचायत राज विभाग” हा पर्याय निवडायचा आहे.
* हा विभाग निवडल्यानंतर त्याअंतर्गत उपलब्ध असलेल्या सेवांची यादी दिसेल यामध्ये जन्म नोंद दाखला, मृत्यु नोंद दाखला, निराधार असल्याचा दाखला, दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला असे बरेच पर्याय दिसतील. त्यातील “दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ” या पर्यायावर क्लिक करायचे आहे, नंतर पुढे जा वर क्लिक करायचे आहे.
* त्यानंतर “महाऑनलाईन” हे एक नवीन पेज ओपन होईल त्यामध्ये “दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला-अर्जदाराची माहिती:
येथे अर्जदाराची माहिती हे पेज ओपन होईल त्यामध्ये अर्जदाराने स्वतःची पूर्ण माहिती भरायची आहे यामध्ये जिल्हा, तालुका, ग्रामपंचायतीचे नाव, अर्जदाराचे पूर्ण नाव (इंग्रजी), आधार क्रमांक, दारिद्र्य रेषेखाली दाखला किती वर्षाचा पाहिजे तो कालावधी टाकायचा आहे, (उदा.2014-2015), यादी क्रमांक (यादी क्रमांक या ठिकाणी तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये जाऊन ग्रामसेवक यांच्याकडे यादी क्रमांक मागायचा आहे. Parent Name (पालकांचे नाव ) हि सर्व माहिती टाकायची आहे, व “समावेश करा” या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
* समावेश करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रीन वर एक मॅसेज येईल “तुमचा अर्ज यशस्वीरीत्या जतन करण्यात आला” आहे.व त्यामध्ये तुमचा अर्ज क्रमांक असेल तो जतन करून ठेवायचा आहे.
* नंतर “ओके” या पर्यायावर क्लिक करा. हा दाखला तुम्हाला ५ दिवसामध्ये भेटतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to apply for BPL certificate online in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं