कोणत्याही पत्त्यावर सरकार मोफत गॅस कनेक्शन देणार | ऑनलाईन अर्ज कसा करावा? - वाचा माहिती

नवी दिल्ली, ०७ ऑगस्ट | जर तुम्हाला मोफत एलपीजी कनेक्शन मिळवायचे असेल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार लवकरच उज्ज्वला योजनेचा दुसरा टप्पा लागू करणार आहे. सरकारी तेल कंपन्या आता उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा अंतिम मसुदा तयार करीत आहेत. जर तुम्हाला देखील या सुविधेचा लाभ घ्यायचा असेल तर आता तुम्ही घर बसल्या अर्ज करू शकता. या योजनेअंतर्गत आता ते लोक एलपीजी कनेक्शन घेऊ शकतील, ज्यांचा कायमचा पत्ता नाही.
या योजनेचा लाभ शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांना दिला जाणार:
या योजनेचा लाभ शहरांमध्ये राहणाऱ्या गरिबांना दिला जाईल. यासह जे देशाच्या विविध भागांमध्ये नोकरीमुळे जागा बदलतात, त्यांनाही या योजनेचा लाभ होईल. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या योजनेंतर्गत 1 कोटी गॅस कनेक्शन देण्याची घोषणा आधीच केली आहे.
ऑनलाईन अर्ज कसा करावा:
* तुम्हाला आधी अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
* pmujjwalayojana.com वर क्लिक करा.
* होमपेजवर डाऊनलोड फॉर्मवर जा आणि त्यावर क्लिक करा.
* डाऊनलोड फॉर्मवर क्लिक केल्यानंतर पीएम उज्ज्वला योजनेचा फॉर्म येईल.
* आता फॉर्ममध्ये तुमचे नाव, ई-मेल आयडी, फोन नंबर आणि कॅप्चा भरा.
* आता OTP जनरेट करण्यासाठी बटणावर क्लिक करा.
* त्यानंतर फॉर्म डाऊनलोड करा.
* फॉर्म जवळच्या एलपीजी गॅस एजन्सीला सबमिट करा
आता तुम्हाला हा फॉर्म तुमच्या जवळच्या एलपीजी एजन्सीकडे जमा करावा लागेल. यासह आपल्याला आधार कार्ड, स्थानिक पत्त्याचा पुरावा, बीपीएल रेशन कार्ड आणि फोटो इत्यादी कागदपत्रे द्यावी लागतील. कागदपत्र पडताळल्यानंतर तुम्हाला एलपीजी गॅस कनेक्शन मिळेल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to apply for Pradhan Mantri Ujjwala Yojana free LPG connection online news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं