Sarkari Yojana | शरद पवार ग्रामसमृध्दी योजना अनुदान योजना अर्ज - संपूर्ण प्रक्रिया

मुंबई, ०३ जुलै | गाय व म्हैस यांकरिता पक्का गोठा बांधणे, जनावरांसाठी गोठ्यांची जागा हि ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असल्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होउन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. याठिकाणी मौल्यवान मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चार आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्र असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठयासाठी ७७,१८८ रुपये खर्च येईल. यासाठी ६ गुरांची पूर्वीची तरतूद रद्द करून २ गुरे ते ६ गुरे याकरिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी ६ च्या पटीत म्हणजे १२ गुरांसाठी दुप्पट आणि १८ गुरूपेक्षा जात गुरांसाठी ३ पट अनुदान देय राहील.
* २ गुरे ते ६ गुरे यासाठी अनुदान :- ७७१८८/-
* ६ ते १२ गुरे यासाठी अनुदान :- १५४३७६/-
* १८ पेक्षा जास्त तिप्पट :- २३१५६४
गाय व म्हैस यांच्याकरिता पक्का गोठा बांधणे:
* अनुदान रक्कम : 77,188 रूपये/-
2) शेळीपालन शेड बांधणे:
* अनुदान रक्कम : 49,284 रूपये /-
3) कुक्कुटपालन शेड बांधणे:
* अनुदान रक्कम : 49,760 रूपये /-
4) भू-संजीवनी नाडेप कंपोस्टींग
* अनुदान रक्कम : 10,537 रूपये /-
Sharad Pawar Gram Samrudhi Yojana योजनेसाठी अर्ज करतांना खालील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे:
* आधार कार्ड
* बँक पासबुक झेरॉक्स
* जातीचा दाखला
* पासपोर्ट साईज फोटो
* अर्जदार अपंग असल्यास अपंगत्वाचा दाखला
* 7/12 उतारा
* एकुण जमिनीचा दाखला (8अ उतारा)
* भुमिहिन शेतकरी असल्यास ग्रामपंचायत नमुना क्रमांक 8
* रहिवासी प्रमाणपत्र
* लाभार्थीने निवडलेले काम हे लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायतमध्ये येत नसल्यास दोन्ही ग्रामपंचायत मध्ये ग्रामसभा ना हरकत ठरावाची प्रत
या योजनेमधून खालील बाबींसाठी अनुदान देण्यात येणार आहे:
गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:
* शेळीपालन शेड बांधणे
* कुक्कूटपालन शेड बांधणे
* भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग
अर्ज कुठे करावा ?
आपल्या गावच्या ग्रामपंचायत मध्ये याचा अर्ज करावा लागतो. यासाठी ग्रामपंचायत ग्रामसभा ठराव त्याचप्रमाणे खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक आहे.
गाय व म्हैस याकरिता पक्का गोठा बांधणे:
जनावरांसाठी गोठ्यांची जागा ही ओबडधोबड आणि खाचखळग्यांनी भरलेली असते तसेच ती अस्वच्छ असत्याने जनावरांना विविध आजार होतात. गाई आणि म्हशींची कास निकामी होऊन शरीरावर खालच्या बाजूस जखमा होतात. तसेच मूत्र व शेण साठवता न आल्याने वाया जाते. यासाठी या ठिकाणी चारा आणि खाद्यासाठी चांगली गव्हाण बांधणे तसेच मूत्र संचय टाके बांधण्यात येतील. स्वत:ची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असलेले लाभार्थी यासाठी पात्र असतील. एका गोठ्यासाठी 77 हजार 188 रूपये खर्च येईल. यासाठी 6 गुरांची पुर्वीची तरतूद रद्द करून 2 गुरे ते 6 गुरे या करिता एक गोठा व त्यानंतर अधिक गुरांसाठी 6 च्या पटीत म्हणजे 12 गुरांसाठी दुप्पट आणि 18 गुरांपेक्षा जास्त गुरांसाठी 3 पट अनुदान देय राहणार आहे.
शेळीपालन शेड बांधणे:
शेळ्यांमेढ्यांकरिता चांगल्या प्रतीचे शेड बांधल्यामुळे या जनावरांचे आरोग्य देखील चांगले राहणार असून वाया जाणारे मल, मूत्र शेतीमध्ये उत्कृष्ट सेंद्रिय खत म्हणून वापरले जाऊ शकेल. शेळी ही गरीबांची गाय समजली जाते. शासनाचे अनुदान न मिळाल्यास एका भूमीहिन शेतकऱ्याला स्वत:च्या पैशातून 10 शेळ्या विकत घेणेही शक्य होत नाही. 10 शेळ्यांचा गट हा शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे ग्राह्य धरला जातो, पण कमी शेळ्या असतील तर शेत मजुराला त्याचा फायदा होत नाही. ही बाब लक्षात घेता किमान 2 शेळ्या असलेल्या भूमीहिन मजुरांना व शेतकऱ्यांना या योजेला लाभ देता येऊ शकणार आहे. एका शेडसाठी 49 हजार 284 रूपये खर्च येतो. हे शेड सिमेंट व विटा व लोखंडी तुळ्यांच्या आधाराने बांधण्यात येईल. एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 शेळ्यांकरिता 3 पट अनुदान मंजुर करण्यात येईल.
कुक्कूटपालन शेड बांधणे:
कुक्कूटपालनामुळे ग्रामीण भागातील कुटुंबांना पूरक उत्पादनाबरोबर आवश्यक पोषक अशा प्राणिजन्य प्रथिनांचा पुरवठा होतो. मात्र निवारा चांगला नसल्याने कुक्कूटपक्षांचे आरोग्य नेहमीच खालावलेले असते. चांगल्या निवाऱ्यामुळे रात्रीच्यावेळी त्यांचे तसेच त्यांच्या पिल्लांचे आणि अंड्यांचे प्राण्यांपासून संरक्षण होते. प्रत्येक शेडला 49 हजार 760 रूपये खर्च अपेक्षित आहे. 100 पक्षी यशस्विरीत्या सांभाळणाऱ्या लाभार्थींनी पक्षांची संख्या 150 च्या वर नेल्यास मोठ्या शेडसाठी दुप्पट निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग:
शेतातील कचऱ्यावर कंपोस्टींगव्दारे प्रक्रिया केल्यास जमिनीच्या आरोग्यात सुधारणा होऊन कृषी उत्पादनात भर पडते. सेंद्रिय पदार्थात सुक्ष्म जिवांची संख्या मोठ्या प्रमाणावर असते. त्याचा फायदा जमिनीला होतो. याकरिता शेतात एक नाडे बांधण्यासाठी ही योजना आहे. या नाडेपमध्ये सेंद्रिय पदार्थ, कचरा, शेणमाती, आणि मातीचे एकावर एक थर रचले जातात. 2 ते 3 महिन्यात काळपट तपकीरी भुसभुशीत, मऊ, दुर्गंधी विरहीत कंपोस्ट तयार होते. या नाडेपच्या बांधकामासाठी 10 हजार 537 रूपये खर्च साधारण येतो.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक बातमी प्रकाशित / प्रसारित केलेली केवळ आपल्या माहितीसाठी आहेत. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Maharashtra state Sharad Pawar Samriddhi Yojana 2021 sarkari scheme news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं