मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ

पुणे, १५ जुलै | सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी बरेच शेतकरी उत्सुक दिसत आहेत. लोड शेडींगमुळे गरजेच्या वेळी पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची हि अडचण लक्षात घेवून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकर्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ दिला जात आहे.
या योजने अंतर्गत ७५ हजार नग वाटपाचे उद्दिष्ट:
पहिल्या टप्प्यात २५ हजार नग सौर कृषी पंप आस्थापित करण्यात आलेले आहेत. दुसऱ्या व तिसऱ्या एकत्रित टप्प्यात ७५ हजार नग सौर कृषीपंप आस्थापित केले जाणार आहेत. मित्रांनो या संदर्भातील जी. आर. म्हणजेच शासन निर्णय नुकताच दिनांक १२ जुलै २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे. सौर कृषी पंप योजना जी. आर. संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात.
अनेक शेतकरी बांधव या योजनेसाठी उत्सुक:
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी अनेक शेतकरी बांधवांनी अर्ज केलेले आहेत आणि काही करण्यास इच्छुक आहेत. सर्वसाधारण गटांच्या लाभार्थ्यांकारिता राज्यशासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून १० टक्के देण्यात येणार आहे. सौर कृषी पंप योजनासाठी सर्वसामान्य घटकाच्या लाभार्थ्यांना शासन हिश्यापोटी २०२१-२२ मध्ये अनुदान वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आला आहे.
आतापर्यंत सौर कृषी पंप योजना अंतर्गत 25000 सौर कृषी पंप स्थापित:
राज्यशासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत टप्प्याटप्प्याने एक लक्ष सौर कृषी पंप स्थापित करण्याचे नियोजित आहे. पहिल्या टप्प्यात 25000 सौर कृषी पंप स्थापित करण्यात आले असून, दुसर्या व तिसर्या एकत्रित टप्प्यात 75 हजार नग सौर कृषी पंप स्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आलेले आहे. सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अनुदानातून दहा टक्के हिस्सा देण्यात येणार आहे. दहा टक्के लाभार्थी हिस्सा व उर्वरित 80 टक्के महावितरण कडील ॲक्रो खात्यात वाढीव वीज विक्रीतील करांमधून परस्पर जमा होणाऱ्या रकमेतून अदा करण्यात येणार आहे.
46 कोटी 54 लाख निधी वितरीत करण्याचा शासन निर्णय:
सौर कृषी पंप योजनेसाठी सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्याच्या हिश्यापोटी रुपये 46 कोटी 54 लाख रक्कम अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित प्रकाशगड मुंबई यांना वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत असून सदर निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. या संदर्भातला शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आलेला आहे.
जीआर येथे पाहू शकता किंवा पिढीला कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करा आणि पहा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/Solar-Pump-Yojna.pdf
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Mukhyamantri Saur Krushi Pump Yojana 2021 details in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं