महत्वाच्या बातम्या
-
खुशखबर | दलित, अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गासाठी तत्काळ घरगुती वीज जोडणी योजना
महावितरणकडून १४ एप्रिल ते ६ डिसेंबर या कालावधीत अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील नागरिकांना घरगुती नवीन वीज जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये लाभार्थी अर्जदारांना वीज जोडणीसाठी ऑनलाइन किंवा ऑफलाइन अर्ज करण्याची सोय आहे. लाभार्थींना या योजनेमधून घरगुती वीज जोडणी घेण्यासाठी महावितरणकडे एकूण ५०० रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. ही रक्कम देखील पाच समान मासिक हप्त्यांमध्येच वीज बिलातून भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
फायद्याची बातमी | केंद्र सरकार मुलींच्या लग्नासाठी देतंय 51,000 रुपयांची भेट | जाणून घ्या प्रक्रिया
मोदी सरकारने मुलींसाठी अनेक योजना चालवल्या आहेत. या योजनांचा उद्देश मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देणे आहे. या योजनांमध्ये प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा सुद्धा समावेश आहे. देशात अल्पसंख्यांक समाजात मुस्लिम समाजाची लोकसंख्या सर्वात जास्त आहे. अल्पसंख्यांक समाजामध्ये विशेषता मुस्लिम समाजात मुलींमध्ये उच्च शिक्षणाची स्थिती खुपच वाईट आहे. अशावेळी प्रधानमंत्री शादी शगुन योजनेचा देशातील अल्पसंख्यांक समाजातील मुलींच्या उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी पिक कर्ज योजना | जाणून घ्या कसं मिळणार कर्ज - वाचा सविस्तर
शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तीन लाखापर्यंत बिनव्याजी पिक कर्ज मिळणार आहे. डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के व्याजदर आकारला जाणार आहे. व्याज सवलतीमध्ये दोन टक्क्यांनी वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांना या योजनेचा खूप मोठा फायदा होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोठी संधी | प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना २०२१ | करा ऑनलाईन अर्ज
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना हि योजना एक जिल्हा एक उत्पादन या धर्तीवर २०२० ते २०२१ पासून पुढील ५ वर्षे राज्यात राबविली जाणार आहे. हि योजना प्रभावीपाने राबविण्यासंदर्भात सर्वसाधारण प्रवर्गासाठी १३,७३,४८,३७४ रुपये निधी वितरीत करण्याबाबतचा शासन निर्णय नुकताच महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्यासाठी विशेष माहिती | शेत जमीन मोजणी ऑनलाईन अर्ज कसा कराल? | वाचा, शेअर करा
आज आपण जाणून घेणार आहोत ते शेत जमीन मोजणी अर्ज संबधी. शेत जमीन मोजणीसाठी ऑफलाईन अर्ज व ऑनलाइन अर्ज संदर्भात बऱ्याच शेतकरी बांधवांना या लेखामुळे नक्कीच फायदा होणार आहे. शेत जमीन मोजणी अर्ज कसा करतात तो अर्ज कोठून डाउनलोड करावा, त्याची प्रिंट कशी काढावी आणि तो अर्ज कोणाकडे सादर करावा हि संपूर्ण माहिती या लेखामध्ये आपण समजून घेणार आहोत. त्याचप्रमाणे जर तुम्हाला शेत मोजणीसाठी ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्यासाठी आपले सरकार या वेबसाईटवर युजर आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगीन कसे करावे हे बघणार आहोत. तुमच्याकडे युजर आयडी आणि पासवर्ड नसेल तर नवीन युजर आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी नोंदणी कशी करावी या संदर्भात अगदी तपशीलमध्ये माहिती सांगणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
गावाकडली खुशखबर | महामंडळाकडून बियाणे परमिट वाटप सुरु | जाणून घ्या कसं मिळवाल
बियाणे परमिट वाटप सुरु झालेले आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेवूयात. बियाणे अनुदान योजनेचा ऑनलाईन अर्ज भरला होता त्यांना कृषी विभागाकडून बियाणे परमिट वाटप करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु झालेले आहे. बियाणे खरेदी करण्याचा परमिट कसे असते, कोणकोणत्या बियाण्यांसाठी हे परमिट वाटप सुरु झालेले आहे, कोणत्या बियाण्यासाठी शेतकऱ्याला किती रक्कम भरावी लागणार आहे. हे परमिट किती दिवस चालते, तुम्हालाही असे परमिट मिळाले असेल तर पुढील प्रक्रिया काय करावी याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी अन ग्रामीण बेरोजगारांसाठी | शेळी पालन शासकीय कर्ज योजना २०२१ - वाचा आणि लाभ घ्या
मित्रांनो शेळी पालन कर्ज योजना संदर्भात माहिती जाणून घेवूयात. शासनाच्या वतीने शेळी/मेंढी गट वाटप राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय योजना अंतर्गत लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला जातो. तुम्ही जर शेळीपालन व्यवसाय करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. कारण आता तुम्हाला शेळी पालन कर्ज योजना साठी अनुदान मिळणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
शेती विषय | मोठ्या कमाईसाठी सरकारी रोपवाटिका योजना २०२१ | ऑफलाईन व ऑनलाईन अर्ज
रोपवाटिका योजना २०२१ संदर्भातील माहिती. पंचायत समिती कृषी विभाग योजना सतत चालू असतात, परंतु बऱ्याच शेतकरी बांधवांना या योजनांची माहिती नसण्याची शक्यता असते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे आणि या संदर्भातील बातमी दिनांक ९ जून २०२१ च्या दैनिक पुण्यनगरी वर्तमान पत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलेली आहे. अहिल्यादेवी रोपवाटिका योजनेसाठी लागणारा अर्ज या लेखाच्या सर्वात शेवटी दिलेला आहे पेजला खाली स्क्रोल करून तो pdf अर्ज डाउनलोड करून घ्या.
4 वर्षांपूर्वी -
खुशखबर | सोलर पावर प्लांट उभारायचा आहे? | तालुका तपासा आणि असा करा अर्ज
शेतकरी बंधुंनो आजच्या लेखामध्ये सोलर पावर प्लांट संबधी माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यातील विविध तालुक्यामध्ये एनटीपीसी विद्युत व्यापार निगम लिमिटेडच्या वतीने सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारण्यासंदर्भात अर्ज मागविण्यात आले आहेत. दैनिक लोकमतमध्ये या संदर्भातील जाहिरात देण्यात आलेली आहे ती जाहिरात डाउनलोड करण्याची लिंक या लेखाच्या सर्वात खाली देण्यात आलेली आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७ जून २०२१ आहे. तुमच्या तालुक्यामध्ये कोणत्या ठिकाणी हे सोलर पावर प्लांट प्रोजेक्ट उभारले जाणार आहेत त्याची देखील तुम्ही माहिती घेऊ शकता त्या संदर्भातील माहिती (PDF File) सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ती तुम्ही डाउनलोड करून शकता.
4 वर्षांपूर्वी