शेतकऱ्यांसाठी खुशखबर | राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणार अनुदानावर मशीन - वाचा सविस्तर

मुंबई, २४ जून | शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत शेतकऱ्यांना गवत कापण्यासाठी ५० टक्के अनुदानावर मशीन मिळणार आहे. या योजना संदर्भात अधिक माहिती जाणून घेवूयात. महाराष्ट्र शासन कृषी पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय विकास, मत्स्यव्यवसाय विभागाच्या वतीने केंद्र सहाय्यित राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत वैरण व पशुखाद्य या उप अभियानांतर्गत गवताचे गठ्ठे तयार करण्याच्या मशीनचे ५० टक्के अनुदानावर वितरण. म्हणजेच ( जनजाती क्षेत्र उप योजना ) या योजनेसाठी नवीन लेखशीर्षास मान्यता प्रदान करण्यात आली आहे. राष्ट्रीय पशुधन अभियानांतर्गत या योजनेसाठी ५० टक्के अनुदान हे केंद्र शासनाकडून मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय दिनांक २३ जून २०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध आहे.
शेतकरी बांधवांनी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेचा लाभ घ्यावा:
राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत मिळणाऱ्या या अनुदानाचा शेतकरी बांधवानी लाभ घ्याव. अनेक शेतकरी बांधव शेती व्यवसाय करत असताना त्यासोबत जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय करत असतात. सोबतच शेतीच्या कामासाठी गुरे देखील असतात. तर अशा या गुरांना वैरण कापण्यासाठी विळा किंवा इतर पारंपारिक अवजारे वापरली जातात त्यामुळे शेतकरी बांधवांचा वेळ वाया तर वाया जातोच शिवाय यासाठी कष्ट देखील भरपूर करावे लागते. अशावेळी राष्ट्रीय पशुधन अभियान योजनेमुळे शेतकऱ्यांना गुरांसाठी वैरण कापण्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या मशीनसाठी ५० टक्के अनुदान देण्यात येणार आहे. त्यामुळे राष्ट्रीय पशुधन अभियान हि योजना शेतकरी बांधवांना लाभदायी ठरणार आहे.
शेतीसाठी जोडधंदा हवाच:
शेतकरी बंधुंनो राष्ट्रीय पशुधन अभियान या योजनेची माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. थोडी इतरही माहिती लक्षात घ्या. शेती करत असतंना केवळ शेतीवर अवलंबून न राहता शेतीसोबतच जोडधंदा सुद्धा करायला पाहिजे. नैसर्गिक आप्पातीमुळे शेतीमध्ये नुकसान झाल्यास शेतीपूरक व्यवसाय असेल तर त्यमुळे तग धरण्यास शेतकरी बांधवांना मदत होऊ शकते. त्यामुळे शेळी पालन व्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय शेतकरी करू शकतात. त्याच बरोबरीने गाई म्हशी घेवून दुग्ध व्यवसाय देखील सुरु करू शकता.
पशुसंवर्धन विभागांच्या विविध योजनांची माहिती घेण्यासाठी अधिकृत वेबसाईटला भेट द्या:
शेतीपूरक जोडधंदा करण्यासाठी तुम्ही जर शासकीय अनुदानाची मदत घेऊ इच्छित असल तर तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागास भेट द्या. पशुसंवर्धन विभागांतर्गत शेतकरी बांधवांसाठी विविध योजना सुरु असतात या योजनांची माहिती घेवून अर्ज केल्यास तुम्हाला या शासकीय योजनांचा लाभ मिळू शकतो. पशुसंवर्धन विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर देखील या योजनांची माहिती असते.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा.
News Title: Rashtriya Pashudhan Abhiyan Yojana for farmers in Maharashtra news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं