ग्रामीण तरुणांसाठी नाविन्यपूर्ण योजनेची माहिती | असा मिळतो शेळीपालन योजनेचा लाभ - वाचा माहिती

मुंबई, ३१ जुलै | केवळ माहितीच नाही तर ज्या शेतकऱ्याला या योजनेअंतर्गत शेळी पालन योजनेचा लाभ मिळालेला आहे त्या शेतकऱ्याने कोणकोणती कागदपत्रे सादर केलेली आहेत याविषयी आपण या ठिकाणी माहिती जाणून घेणार आहोत.
नाविन्यपूर्ण योजना ची माहिती जाणून घ्या:
ग्रामीण भागामध्ये शेतीला पूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन व्यवसाय मोठ्या प्रमाणत केला जातो. शेळी पालन व्यवसायामुळे ग्रामीण भागातील अनेक युवकांना रोजगार मिळालेला आहे. शेती व्यवसाय करत असतांना जर शेळी पालन व्यवसाय, दुग्धव्यवसाय किंवा कुक्कुटपालन व्यवसाय केल्यास शेती व्यवसायामध्ये जर नुकसान झाले तर या व्यवसायामध्ये ते नुकसान काही प्रमाणत भरून काढता येते. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत याचा लाभ मिळू शकतो.
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांना शेळी गट वाटप:
बऱ्याच शेतकरी बांधवांना शेळी पालन व्यवसाय सुरु करण्याची इच्छा असते परंतु आर्थिक अडचणीमुळे ते तो व्यवसाय करू शकत नाहीत किंवा नाविन्यपूर्ण योजना ची माहिती त्यांना नसण्याची शक्यता असते. शेळी पालन व्यवसाय करण्यासाठी शासकीय मदत घेऊ इच्छित असाल तर नाविन्यपूर्ण योजना ची माहिती तुम्हाला असायलाच हवी.
शेळीपालन योजनेचा अर्ज डाउनलोड करा किंवा लिंक कॉपी करून ब्राऊझरवर पेस्ट करून डाउनलोड करा: https://www.maharashtranama.com/wp-content/uploads/शेळी-पालन-योजनेचा-अर्ज-1.pdf
नाविन्यपूर्ण योजना सारख्याच इतर योजनांचा देखील शेतकरी बांधवांनी लाभ घ्या:
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळी पालन योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करून शेतकरी अनुदानासाठी अर्ज करू शकतात. नाविन्यपूर्ण योजना सारख्याच इतर योजना देखील ग्रामीण भागामध्ये राबविल्या जातात त्या योजनेतून देखील शेळी खरेदी करण्यास अनुदान मिळू शकते. त्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधा. शेळीपालन व्यवसायास चालना मिळावी यासाठी अनेक योजना शासन राबवीत असते आणि त्या योजनांचा शेतकरी बांधवांनी लाभ घेतल्यास शेळी पालन व्यवसाय सरू करण्यासाठी शासनाकडून आर्थिक मदत मिळू शकते.
नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळीपालन योजनेसाठी खालील पद्धतीने लाभ दिला जातो:
शेतकरी बंधुंनो नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळीपालन योजनेसाठी कशा पद्धतीने लाभ दिला जातो. तुमची जर नाविन्यपूर्ण योजना अंतर्गत शेळीपालन अनुदान योजनेसाठी निवड झाली तर कोणकोणती कागदपत्रे सादर करावी लागतात या विषयी संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. ( पुढील लेख पण वाचा
पशुसंवर्धन विभाग योजना व लागणारी कागदपत्रे:
शेतकरी बंधुंनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना शेळी गट वाटप केले जातात. नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना दुधाळ जनावरांचे वाटप, शेळी गट वाटप, मासल कुक्कुट वाटप इत्यादी योजनांचा लाभ दिला जातो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या तालुक्यातील पशुसंवर्धन कार्यालय येथे माहिती घ्यावी लागते.
* शेळीपालन योजनेची अमलबजावणी करण्यासाठी दैनिक वर्तमानपत्रामध्ये किंवा पशुसंवर्धन कार्यालयाच्या दर्शनी भागामध्ये शेळीपालन योजना व इतर योजना सुरु झाल्याची सूचना लावण्यात येते.
* शेतकरी बांधवांनी योजना सुरु झाल्यापासून शेवट दिनांकाच्या आत विहित नमुन्यामध्ये ( किंवा अर्ज ऑनलाईन असेल तर ऑनलाईन पद्धतीने) अर्ज सादर करणे अपेक्षित असते.
* विहित नमुन्यामध्ये मुदतीच्या आत अर्ज सादर केला असेल आणि त्या लाभार्थ्याची शेळीपालन योजनेसाठी निवड झाल्यास त्यांना एक पत्र पाठविण्यात येते. पत्र कसे असते हे जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल खालील बटनावर टच करा किंवा क्लिक करा.
पशुसंवर्धन विभागाला डिमांड ड्राफ्ट जमा करणे:
एखाद्या शेतकरी बांधवाला शासनाच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने पत्र मिळाल्यानंतर योजनेचा लाभ घेण्यासाठी एक डीडी म्हणजेच डिमांड ड्राफ्ट जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या नावे लिहावा लागतो. शेळीपालन योजनेचा अर्ज भरतांना तुम्ही ज्या प्रवर्गातून अर्ज केला असेल (SC/ST/Open/Other ) त्या प्रवर्गाच्या लागू असलेल्या सवलतीनुसार एक रक्कम पशुसंवर्धन विभागाच्या नावे बँकेत जमा करावी लागते. उदाहरणार्थ जर लाभार्थी खुल्या प्रवर्गातील असेल तर ५० टक्के आणि अनुसूचित जातीमधील असेल तर २५ टक्के एवढी हि रक्कम असू शकते.
१०० रुपयाच्या बॉंड पेपरवर बंधपत्र सादर करावे लागते:
लाभार्थ्याला १०० रुपयाच्या बॉंड पेपरवर एक बंधपत्र द्यावे लागते. शेळ्या खरेदी करण्यासाठी लाभार्थ्याला एक तारीख दिली जाते आणि पशुसंवर्धन विभागाच्या वतीने निवडलेल्या ठिकाणहून लाभार्थीला शेळ्या खरेदी करून दिल्या जातात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Sheli Palan Yojana benefits in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं