महत्वाच्या बातम्या
-
अनधिकृत बांधकामामुळे अशा घटना घडतात पण त्याला पालिका जबाबदार नाही - संजय राऊत
मुंबई: मालाडमध्ये भिंत कोसळून झालेली दुर्घटना हि महापालिकेचं अपयश नाही तर तो एक अपघात आहे असं वक्तव्य सेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मालाडमध्ये भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 18 जणांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. संजय राऊत यांच्यामते पावसाळा सुरु होण्या आगोदर उद्धव ठाकरेंनी स्वतः मुंबईभर फिरून नालेसफाईची पहाणी केली होती.
6 वर्षांपूर्वी -
प्लॅस्टिक बंदीमध्ये फ्लेक्सचा समावेश करावा, नेटकऱ्यांची मागणी - सोशल व्हायरल
प्लॅस्टिकबंदीवर मात्र नेटकऱ्यांनी पर्यावरण मंत्री रामदास कदम आणि महाराष्ट्र सरकारला ट्रोल केलं आहे. नेटकऱ्यांच्या मते प्लॅस्टिकबंदीमध्ये फ्लेक्स बॅनरचा देखील समावेश करावा. आज गल्लोगल्ली आणि रस्त्याच्या दुतर्फा आपल्याला फ्लेक्सच – फ्लेक्स दिसतात. कुठे भाऊंचा वाढदिवस, कुठे राजकीय अभिनंदन तर कुठे राजकीय श्रेयाच्या नावाने लागलेले फ्लेक्स. इतकंच काय तर आजकाल लोकांनी लहानग्यांच्या वाढदिवसाचे फ्लेक्स देखील लावायला सुरुवात केली आहे. हे इतरत्र लावलेले फ्लेक्स शहरांच्या सौंदर्यात डाग होताना दिसत आहेत.
6 वर्षांपूर्वी -
छत्रपती शिवाजी महाराज फेम अमोल कोल्हे यांच्या भाषणाला नरेंद्र मोदींनी दिली दाद
शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील यांना पराभूत करत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पुण्याच्या शिरूर मतदार संघातून विजयी झालेले राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार, छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्यरक्षक संभाजी फेम अमोल कोल्हे यांचा उल्लेख करत नरेंद्र मोदींनी त्याच्या लोकसभेतील पहिल्या आकर्षित भाषणाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
वीरपत्नींनी केली फेसबुक - व्हॉट्सअँप योध्यांची कानउघडणी
वीरपत्नींनी केली फेसबुक – व्हॉट्सअँप योध्यांची कानउघडणी
6 वर्षांपूर्वी -
माध्यमांशी संवाद साधतांना शहीद निनाद यांच्या पत्नी विजेता मांडवगणे
माध्यमांशी संवाद साधतांना शहीद निनाद यांच्या पत्नी विजेता मांडवगणे
6 वर्षांपूर्वी -
स्क्वॉड्रन लीडर निनाद अनिल मांडवगणे यांना त्यांच्या चिमुकलीने दिलेला निरोप पाहून मन भारावलं
भारत-पाकिस्तान तणावा दरम्यान भारतीय वायू दलाचे हेलिकॉप्टर काश्मीरमध्ये क्रॅश झाले आणि त्यात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे शहीद झाले. जम्मू-काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात शहीद झालेले स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
VIDEO - विद्यार्थी-पालकांनो नक्की ऐका; शिक्षण महत्वाचं! पण तेच आयुष्य आहे का? विचार करा!
सध्याची जीवघेण्या स्पर्धेमध्ये गुंतलेली शिक्षणपद्धती पालकांसोबतच विद्यार्थ्यांसाठी मोठं आवाहन ठरली आहे. याच शिक्षणपद्धतीत पालक आणि विद्यार्थी दोघेही सारखेच भरडले जात आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस पालक आणि विद्यार्थीदेखील ताणतणावाखाली आयुष्य जगताना सहज नजरेस पडतं. परंतु, शिक्षण म्हणजेच आयुष्य आहे का? ही विचार करायला लावणारी गोष्ट आज प्रत्येक घराशी निगडित आहे.
6 वर्षांपूर्वी -
विद्यार्थी-पालकांनो; शिक्षण महत्वाचं! पण तेच आयुष्य आहे का? विचार करा!
विद्यार्थी-पालकांनो; शिक्षण महत्वाचं! पण तेच आयुष्य आहे का? विचार करा!
6 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उपोषणवर, मोदी सरकारची डोकेदुखी वाढली
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आज महात्मा गांधी पुण्यतिथीपासून पुन्हा मोदी सरकारच्या विरोधात पुन्हा उपोषणच्या मार्गाने एल्गार पुकारला आहे. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन सुद्धा राळेगणसिद्धीच्या दौऱ्यावर जाणार होते. परंतु, तत्पूर्वीच गिरीश महाजन राळेगणसिद्धीला येऊन काहीच फरक पडणार नसून अण्णा तरीदेखील उपोषणाला बसणारच आहेत असे सांगून त्यांना भेटण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
चपराक! लोकसभा निवडणुकांशी संबंध जोडून लेखिका गीता मेहतांनी 'पद्मश्री' नाकारला
सुप्रसिद्ध वरिष्ठ लेखिका गीता मेहता यांनी नुकताच घोषणा करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार घेण्यास केंद्र सरकारला स्पष्ट नकार दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुका तोंडावर असल्यामुळे सदर मानाचा पुरस्कार स्विकारण्याची ही योग्य वेळ नसल्याचे कारण गीता मेहता यांनी पुढे केले आहे. विशेष म्हणजे गीता मेहता या ओडिशाचे विद्यमान मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्या मोठ्या बहिण आहेत.
6 वर्षांपूर्वी -
मनसे दणका, तुलसी जोशींनी आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेचा प्रश्न सोडवला
मनसे दणका, तुलसी जोशींनी आर्थिक फसवणूक झालेल्या महिलेचा प्रश्न सोडवला
6 वर्षांपूर्वी -
हम तो फकीर आदमी है? भाजप अति-श्रीमंत झाला, तब्बल ४३७ कोटींच्या देणग्या
देशातील विविध कॉर्पोरेट कंपन्यांकडून भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक मोठ्या प्रमाणावर देणग्या मिळत असल्याची माहिती समोर आली आहे. देशभरातील विविध राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या शपथपत्रात दिलेल्या अधिकृत माहितीच्या आधारे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सनं अर्थात ‘एडीआर’ ही आकडेवारी सार्वजनिक केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई : नेहरूनगर - पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
मुंबई : नेहरूनगर – पोलिसांनी ज्या महाराष्ट्र सैनिकाला अटक केलं, त्यानेच पोलिसांची व्यथा मांडली
6 वर्षांपूर्वी -
२७ लाख भाडे! मराठी आजींची शिवसेनेच्या मुंबई महापालिकेकडून लुबाडणूक तर मनसे मदतीला: सविस्तर
मुंबई महानगरपालिकेच्या KEM रुग्णालयात तब्बल ३७ वर्षे सेवा करणा-या परिचारिकेने सेवानिवृत्त झाल्यानंतर, कुटुंबाला राहण्यास हक्काचे घर नसल्याने त्या पतीसोबत स्टाफ क्वाटर्समध्ये मागील ४ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. परंतु, या ४ वर्षांचे तब्बल २७ लाख रुपये इतके प्रचंड भाडे मुंबई महापालिकेने आकारल्याने या गरीब आजींना रोज रडू कोसळत आहे. तब्बल २७ लाख रूपये भाडे आकारत शिवसेनेची सत्ता असलेली मुंबई महानगरपालिका आणि रुग्णालय प्रशासन या गरीब आजींना लुबाडत आहे का ? असा सवाल मनसेच्या नितीन नांदगावकर यांनी उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
#MeToo: स्त्रिया अत्याचार होतो तेव्हाच आवाज का उठवत नाहीत? सिंधुताईंचा रोखठोक सवाल
‘मी-टू’ मोहिमेंतर्गत मागील काही दिवसांपासून मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यात अनेक कलाकार, राजकारणी आणि पत्रकारांची सुद्धा नाव पुढे आल्याने मोठी खळबळ माजली होती. दरम्यान १०-१५ वर्षांनी बाहेर येणारी ही प्रकरणं बघून अनेकांनी संशय सुद्धा व्यक्त केला होता. परंतु काही दिवसामध्ये या मोहिमेचा अतिरेक होत आहे असे वाटू लागल्याने ही मोहीम जास्त दिवस टिकणार असे एकूणच वातावरण झाले आहे. आता सामाजिक क्षेत्रातील एक मोठं नाव म्हणजे सिंधुताईंनी सुद्धा या विषयावर मत व्यक्त केलं आहे.
7 वर्षांपूर्वी -
पंतप्रधानांच्या भेटीसाठी निघालेल्या तृप्ती देसाईंना अटक
सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांना पुणे पोलिसांकडून अटक करण्यात आलं आहे. केरळमधील शबरीमाला मंदिर प्रकरणी आणि महिलांच्या प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले असताना सुद्धा महिलांना प्रवेश दिला जात नाही. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेण्यासाठी तृप्ती देसाई शिर्डीला निघाल्या होत्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साईबाबा समाधी शताब्दी उत्सवासाठी नगरजिल्ह्यात म्हणजे शिर्डीला येणार आहेत.
7 वर्षांपूर्वी -
लालबाग राजा मुजोर कार्यकर्त्यांची दादागिरी, थेट आयपीएस अधिकाऱ्यावर धावले
गणेश उत्सव संपल्यावर या कार्यकर्त्यांना आजूबाजूची लोक सुद्धा विचारत नसतील, परंतु लालबागचा राजा विराजमान होताच या कार्यकर्त्यांमध्ये आपणच या शहराचे सर्वेसेवा असल्यासारखे भासू लागते. एखादी मालदार पार्टी, दिग्गज उद्योगपती किंवा मातब्बर राजकारणी लालबागच्या राजाच्या भेटीला आले की एकदम त्याच क्षणी हातांच्या माळ गुंफत रॉयल वागणूक दिली जाते. बाकी हेच हात सामान्य भाविकांवर, वृद्ध महिलांवर, पोलीस महिलांवर उगारण्यासाठीच वापरले जातात.
7 वर्षांपूर्वी -
अशा लोकांमुळे भारत जागोजागी अस्वच्छ होतो
अशा लोकांमुळे भारत जागोजागी अस्वच्छ होतो
7 वर्षांपूर्वी -
गणेशोत्सवा निमित्त कोकणवासीयांसाठी नगरसेवक मुरजी पटेल यांच्या मार्फत मोफत बस सेवा
मुंबईतील कोकणवासीयांसाठी गणेश उत्सव म्हणजे आनंदाची पर्वणीच. परंतु अंधेरी पूर्वेकडील त्याच कोकणवासीयांसाठी दिलासा देणारी बातमी आहे. अंधेरी पूर्व येथील भाजपचे नगरसेवक मुरजी पटेल यांच्या ‘जीवन ज्योत प्रतिष्ठान’ तर्फे कोकणच्या चाकरमान्यांची ही अडचण लक्षात घेऊन कुडाळ, वेंगुर्ले, सावंतवाडी, कणकवली आणि देवगडला जाणाऱ्या तब्बल ३५ पेक्षा अधिक खासगी बसेस मोफत रवाना करण्यात आल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी -
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं वयाच्या ९५ व्या वर्षी निधन
ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचे काल बुधवारी रात्री दिल्लीत निधन झाले. काल दिल्लीतील एका इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. देशातील आणीबाणीच्या काळात कुलदीप नय्यर यांनी तुरंगवास सुद्धा भोगला होता.
7 वर्षांपूर्वी