महत्वाच्या बातम्या
-
केरळच्या पूरग्रस्तांसाठी मनसेच्या अनेक शाखांमधून लोकसहभागातून मदत रवाना
रळच्या संपूर्ण इतिहासात झाला नसेल इतका पाऊस केरळमध्ये काही दिवसांपासून पडत होता आणि त्यामुळे संपूर्ण राज्यच ठप्प झाल्यासारखी स्थिती होती. या महापूरामुळे २.२३ लाख जनता आणि ५०,०० कुटुंबे बेघर झाली आहेत. तसेच या सर्व बाधित लोकांना १,५६८ मदत केंद्रांमध्ये हलवण्यात आल्याची माहिती सुद्धा विजयन यांनी दिली आहे.
7 वर्षांपूर्वी -
पुण्यात ओंकारेश्वर पूलापासून ‘अंनिस’ची ‘जवाब दो’ रॅली
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज तब्बल ५ वर्ष पूर्ण होत आहेत. परंतु इतका काळ उलटून सुद्धा हत्येमागील सूत्रधार मोकाटच असल्याने त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज पुण्यात विठ्ठल रामजी शिंदे पूल, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल, साने गुरुजी स्मारक या मार्गावर ‘अंनिस’ तर्फे ‘जवाब दो’ रॅली काढण्यात आली आहे.
7 वर्षांपूर्वी -
मुंबई गणेश मंडळांसाठी अमित ठाकरें व महाराष्ट्र सैनिक मैदानात; मुख्यमंत्र्यांच्या भेटीला
मुंबईतील आणि गिरगावातील गणेश मंडळांसाठी राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे आखाड्यात उतरले असून, त्यांनी गणेश मंडळांच्या व्यथा आणि प्रश्न घेऊन थेट मुख्यमंत्री निवास गाठलं आहे. अमित ठाकरे यांच्या बरोबर महाराष्ट्र सैनिकांच्या एका शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्र्यांची त्यांच्या वर्षा निवास्थानी भेट घेतली आहे.
7 वर्षांपूर्वी -
केरळ'साठी मदत निधीच्या नावाने पेटीएम'चे मालक विजय शेखर शर्मा यांचं नोटबंदीनंतर पुन्हा प्रोमोशन-ब्रॅण्डिंग
संपूर्ण केरळला पावसाने काही दिवस झोडपले असून सर्वत्र पुराचे साम्राज्य असून त्यात लाखो लोकं बेघर झाले आहेत तर शेकडो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. केरळला सर्वच थरातून मदत होत असताना त्यात केंद्र सरकार, अनेक राज्य सरकार आणि सामान्यांकडून मदतीचा ओघ सुरु असताना एक कटू अनुभव आल्याचे दृश्य आहे. कारण देशातील एका अब्जाधीशाने अशा संवेदनशील विषयात सुद्धा स्वतःच्या कंपनीचे प्रोमोशन आणि ब्रॅण्डिंग करत हात धुतले आहेत.
7 वर्षांपूर्वी -
‘क्यूँके ये सडक किसीके बापकी नहीं?' जाहिराती मागील मूळ संकल्पना एका मराठमोळ्या तरुणीची
जनजागृती! शहरात वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांची जनजागृती करण्यासाठी एक अनोख्या पद्धतीची जाहिरात सध्या प्रसिद्ध होत आहे. त्यात अभिनेता अक्षय कुमार वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्या लोकांना थांबवतो, तर हेल्मेट न घालणाऱ्या मुलाला थांबवून विचारतो ‘ये रोड तुम्हारे बाप की नहीं? तो बिना हेल्मेट पहने गाडी क्यूँ चला रहें हो?’ ‘याद रखो ट्रॅफिक नियमोंका पालन करो क्यूँके सडक किसीके बापकी नहीं.’ असे म्हणत अक्षय कुमारने वाहतूक नियम पाळण्यासंबंधीचा संदेश आणि जनजागृती करण्याची मोहीम आखली आहे.
7 वर्षांपूर्वी -
सत्यमेव जयते वाॅटर कप साताऱ्याच्या टाकेवाडी गावाने पटकावला
अामिर खानच्या पानी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते वाॅटर कप स्पर्धेचा पारिताेषिक वितरण समारंभ पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलता पार पडला. यंदाचा प्रथम क्रमांक साताऱ्यातील टाकेवाडी या गावाने पटकावला आहे. आज पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या पारिताेषिकाचे वितरण विजेत्यांना करण्यात अाले. बालेवाडी येथील क्रीडासंकुलात हा पारिताेषिक वितरण समारंभ पार पडला.
7 वर्षांपूर्वी -
'पाणी अडवा, पाणी जिरवा’ घोषनेच ‘माणसं आडवा आणि त्यांची जिरवा’ झाल्याने गावांचा विकास रखडला
आज पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. दरम्यान राज ठाकरे यांनी पाण्याबद्दलची जनजागृती जर अमीर खान पार पडणार असेल तर सरकार नक्की काय करत असा प्रश्न उपस्थित केला.
7 वर्षांपूर्वी -
वॉटर कप; राज ठाकरेंनी मांडलेलं सिंचन क्षेत्रातील वास्तव उपस्थितांना रुचलं, पण अजित पवारांना का झोंबल?
काल पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र चर्चा रंगली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याच्या सिंचन क्षेत्रातील मांडलेल वास्तव, जे अजित पवारांना झोंबल्याचे पाहायला मिळालं.
7 वर्षांपूर्वी -
मशिदींवरील लाऊडस्पीकरने ध्वनीप्रदुषण होते का? तपास करण्याचे राष्ट्रीय हरित लवादाचे आदेश
मशिदींवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनीप्रदुषण होते का त्याबाबत चौकशी करण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत. कारण पूर्व दिल्लीतील सात मशिदींवर लाऊडस्पीकर लावण्यात आले आहेत आणि त्यामुळे ध्वनीप्रदुषण होत असल्याची तक्रार राष्ट्रीय हरित लवादाकडे संबंधितांकडून करण्यात आली होती.
7 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्रनामा न्यूज'साठी तुमचा ब्लॉग लिहा! आम्ही प्रसिद्ध करू तुमचे विचार
महाराष्ट्रातील तरुण तरुणींना लिखाणाची आवड असल्यास ते त्यांचे ज्वलंत विचार आमच्या माध्यमातून दशभर पोहोचवू शकतात. महाराष्ट्रनामा न्यूज तुमचे विचार नक्कीच प्रसिद्ध करेल. लोकशाही पद्धतीने तुमचे व्यक्त करा आणि तुमच्या विचारांना दिशा करून देण्याची सुवर्ण संधी आम्ही तुम्हाला देत आहोत.
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेच्या मुंबई महानगर पालिके'विरुद्ध राज ठाकरे आणि मुंबईतील गणेश मंडळ एकत्र
मुंबई महापालिकेने लादलेल्या जाचक अटींमुळे गणपती मंडळांना खूप अडचणींचा सामना करावा लागत असल्याने संपूर्ण प्रकरण राज ठाकरे यांच्या दरबारी गेले आहे. आज मनसे अध्यक्ष स्वतः गिरगावच्या खेतवाडीत पोहचले आणि गणेश मंडळांच्या समस्या समजून घेतल्या आहेत.
7 वर्षांपूर्वी