Special Recipe | चिकन लॉलीपॉप बनवा घरच्याघरी - पहा रेसिपी

मुंबई, ०१ ऑगस्ट | चिकन लॉलीपॉप हे मुंबई आणि पुणे सारख्या गजबजलेल्या शहरांमध्ये एखाद्या चायनीस सेंटरपासून ते सामान्य हॉटेलमध्ये सहज उपलब्ध असणार खाद्य आहे. सहसा सामान्य लोकं चिकन लॉलीपॉपचा आनंद हॉटेल किंवा चायनीस सेंटरवरच अनुभवतात. मात्र आता तुम्ही तेच चिकन लॉलीपॉप बनवू शकता घरच्याघरी. चला तर पाहूया संपूर्ण रेसिपी,
संपूर्ण साहित्य:
* 300 ग्रॅम लाॅलीपाप
* 1 टीस्पून व्हिनीगर
* 1 टीस्पून काळीमीरी पुड
* 1 टेबलस्पून लाल तिखट
* 2 टीस्पून आललसुण मिरची पेस्ट
* 1 टीस्पून सोया साॅस
* 1 टीस्पून चिली सॉस
* 1 टीस्पून टोमॅटो केचप
* 3 टेबलस्पून काॅर्न फ्लोअर
* 1/2 कप मैदा
* 1 अंडे
* 1/2 टीस्पून मीठ
* तळण्यासाठी तेल
संपूर्ण कृती:
१. लाॅलीपाप स्वच्छ धुवून घ्यावेत नी निथळत ठेवा.
२. आता चिकन ला व्हिनीगर,काळीमीरी पुड,लाल तिखट,आललसुण पेस्ट,मीठ व सगळे साॅस चांगले लावून 30 मिनिटे मॅरीनेट करण्यासाठी ठेवावे.
३. 30 मिनिटे झाली आहेत आता ह्यात एक अंडे फोडून टाका,काॅर्न फ्लोअर टाका व थोडा थोडा मैदा टाकून मिसळून घ्या.
४. कढईत मंद गॅस वर तेल तापत ठेवा तापले कि गॅस मध्यम करा नी लाॅलीपाॅप तळून घ्या.तळलेले लाॅलीपाॅप टिशू पेपर वर ठेवा म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल.
५. मस्त चमचमीत कुरकुरीत लाॅलीपाॅप तयार आहेत.शेजवान चटणी बरोबर छान लागतात.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
Recipe Title: Chicken lollipop recipe in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं