Special Recipe | शिंगाड्याच्या पीठाचा हलवा

मुंबई, २१ फेब्रुवारी: अनेकजण उपवास असल्यावर केवळ फलाहार घेतात. उपवासात शेंगदाणे, साबुदाणे, बटाटेही अनेकजण खातात. यावेळी शिंगाड्याच्या पीठालाही खूप मागणी असते. शिंगाड्याच्या पीठापासून उपवासाचे अनेक पदार्थ तयार केले जातात. त्यातलाच एक उपवासाचा पदार्थ म्हणजे शिंगाड्याच्या पीठाचा हलवा होय. तो कसा तयार करायचा हे जाणून घेऊ.
साहित्य:
१ वाटी शिंगाड्याचं पीठ
१ वाटी साखर
१ वाटी तूप
३ वाट्या पाणी
वेलची पावडर
सुका मेवा
कृती:
- एका तव्यात थोडं तूप गरम करून त्यात सुका मेवा परतून घ्यावा.
- सुका मेवा बाजूला काढून ठेवावा
- या तूपात थोडं आणखी तूप वाढवून शिंगाड्यात पीठ परतून घ्यावं.
- मंद आचेवर शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजून घ्या.
- एका भांड्यात ३ वाट्या पाणी उकळत ठेवावं, यात साखर टाकून पाक तयार करून घ्यावा.
- शिंगाड्याचं पीठ खरपूस भाजलं की त्यात साखरेचा पाक घालावा. मध्यम आचेवर दहा मिनिटे हे मिश्रण परतवून घ्यावं. त्यात तूपावर परतवलेला सूका मेका टाकावा आणि गरमागरम हा हलवा सर्व्ह करावा.
News English Summary: Many people only eat fruit when they are fasting. Many people also eat peanuts, sago and potatoes during fasting. Shingada flour is also in high demand at this time. Many fasting foods are made from Shingada flour. One of the fasting foods is Shingada flour halwa. Let’s learn how to make it.
News English Title: Special recipe fasting food is Shingada flour halwa news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं