Special Recipe | खमंग आणि चविष्ट सुक्के चिकन खाऊन तर बघा

मुंबई ३ मे : आपण चिकनचा रस्सा नेहमी खातो पण सुक्के चिकन खाण्यात सुद्धा मज्जा आहे.अत्यंत चविष्ट आणि खमंग अश्या सुक्क्या चिकनची पाककृती आपण खालीलप्रमाणे बघणार आहोत
साहित्य:
१ किलो चिकन
५-६ माध्यम आकारचे कांदे
३ टोमॅटो
१ टेबल स्पून आलं लसूण पेस्ट
१ टी स्पून हळद
३ टी स्पून गरम मसाला
१ टी लाल तिखट
१ टेबल स्पून चिकन मसाला
२ टी स्पून मालवणी मसाला ( आवश्यकतेनुसार)
१ लिंबू
चवीपुरतं मीठ
कोथिंबीर
कृती:
१. प्रथम एका पातेल्यात चिकन स्वछ धुवून घ्यावे. त्यात हळद ,मीठ ,आलं लसणाची पेस्ट ,लिंबू लावून १५-२० मिनिटे मुरत ठेवावे.
२. एका कढईमध्ये तेल घालून त्यात कांदा मऊ आणि गुलाबी होईपर्यंत परतावा.
३. परतलेल्या कांदयात टोमॅटो टाकून शिजवून घ्यावे .
४. नंतर त्यात मुरलेलं चिकन टाकावे आणि झाकण ठेवून ५-१० मिनिटे वाफवावे .
५. ५-१० मिनिटे झाल्यावर लाल तिखट,चिकन मसाला आणि आवश्यकतेनुसार मालवणी मसाला टाकून एकजीव करावे आणि पुन्हा चिकन २५-३० मिनिटे शिजवावे. गरज वाटल्यास थोडे पाणी घालावे .
६. चिकन पूर्णपणे शिजल्यानंतर वरून कोथिंबीर पेरावी .
हे सुक्के चिकन पोळी किंवा तांदूळ -ज्वारीच्या भाकरी सोबत छान लागते
News English Summary: We always eat chicken broth but it is also fun to eat dried chicken.
News English Title: Yummy and tasty dried chicken news update article.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं