IND Vs AUS ऑस्ट्रेलिया १५१ धावांत गारद; भारताकडे २९२ धावांची आघाडी

मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटीचा तिसरा दिवस ऑस्ट्रेलियासाठी अत्यंत वाईट ठरला आहे. भारतीय टीमने दिलेल्या ४४४ धावांचा पाठलाग करताना कांगारूंची खेळी अवघ्या १५१ मध्ये संपुष्टात आली आहे. बुमराहच्या भेदक गोलंदाजीपुढे ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १५१ धावांमध्ये पूर्णपणे संपुष्टात आला आहे. त्याने तब्बल ६ विकेट्स तंबूत धाडल्या.
भारताने पहिला डाव सात बाद ४४३ धावांवर घोषित केला होता. दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कांगारूंनी बिनबाद ८ धाव केल्या होत्या. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यावर बुमराहाच्या वेगवान माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी लोटांगन घेतलं. त्यात अनुभवी ओपनर फिंच केवळ ८ धावा करून तंबूत परतला. फिंच नंतर मार्कस हॅरिस सुद्धा २२ धावांवर बाद झाला. उपहारापर्यंत कांगारुंची अवस्था चार बाद ८९ धावा अशी झाली. त्यानंतर बुमराहचा भेदक माऱ्यापुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकल्याचे पाहायला मिळाले. केवळ ९२ धावांत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता. रविंद्र जाडेजाच्या गोलंदाजीवर ऑस्ट्रेलियाचा सहावा गडी मार्शला बाद झाला. मार्शपाठोपाठ मोहमद्द शामीने पॅट कमिन्सला तंबूत धाडले. त्यानंतर कर्णधार पेनला बुमराहाने बाद केले.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं