बाला रफिक शेख ठरला यंदाचा महाराष्ट्र केसरीचा मानकरी

जालना : बाला रफिक शेखने गतविजेत्या अभिजीत कटकेवरला चितपट करत यंदाचा ‘महाराष्ट्र केसरी’ होण्याचा बहुमान पटकावला आहे. बुलढाण्याच्या बाला रफिक शेखने अभिजितवर ११-३ अशी मात केली. या सामन्यानंतर एका मातीतल्या पैलवानाने मॅटच्या पैलवानाला चितपट केल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, सुरुवातीला अभिजीत कटकेने पहिल्या मिनिटात जोरदार हल्ला चढवला होता. परंतु, त्यानंतर बाला रफिक शेखने दमदार पुनरागमन केले. बाला रफिकने जोरदार आक्रमण करत अभिजितवर २ गुण कमावले. त्यामुळे पहिल्या काही मिनिटांमध्ये बाला रफिक शेखने अभिजितवर २-१ अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर पुन्हा बाला रफिक शेखने १ गुण मिळवत ३-१ अशी चांगली आघाडी मिळवली.
पुण्याच्या अभिजीत कटकेने २५,००० प्रेक्षकांच्या हजेरीत मोठा आक्रमक खेळ करत प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेत सलग तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल झाला होता. मागील वर्षी भूगाव येथे चॅम्पियन ठरणाऱ्या अभिजीत कटकेने महाराष्ट्र केसरी वजन गटाच्या गादी गटात सुवर्णपदक जिंकले होते.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं