मेक्सिकोत ३५व्या मिनिटाला लाथ पडताच कृत्रिम भूकंप

मेक्सिको सिटी : फिफा विश्वचषकात रविवारी झालेल्या सामन्यात मेक्सिकोने डिफेन्डिंग चॅम्पियन जर्मनी विरुद्ध ३५व्या मिनिटाला मेक्सिकोचा स्टार फुटबॉलर हिरविंग लोजानोने जोरदार किक मारत गोल करताच मेक्सिकोत चाहते जल्लोष करत नाचायला लागले आणि भूकंपमापक यंत्रावर हादरे जाणवले.
मेक्सिकोच्या भूगर्भीय आणि वातावरणीय संशोधन संस्थेच्या माहितीनुसार सकाळी ११ वाजून ३२ मिनिटांनी जेव्हा हिरविंग लोजानोने जर्मनी सारख्या तगड्या आणि गतविजेत्या विश्वचषक चॅम्पियन संघाविरुद्ध गोल केला तेंव्हाच, भूकंप मापक यंत्रावर एक मोठा हादरा जाणवला अशी नोंद करण्यात आली आहे.
समाज माध्यमांवर मेक्सिकीच्या चाहत्यांनी गोलकीपर गुलिमेरो ओचाओच्या कामगिरीचं सुद्धा तोंड भरून कौतुक केलं आहे. परंतु आनंदाच्या भारत नाचताना केलेल्या जल्लोषाने जमिनीवर इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाचवेळी हादरे बसल्याने कृत्रिम भूकंप झाल्याने निसर्गाच वेगळच उदाहरण जागा समोर आलं आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं