इंग्लंडला नमवलं; आता क्रोएशिया जगज्जेतेपदासाठी फ्रान्स'ला टक्कर देणार

रशिया : फिफा विश्वचषक २०१८ स्पर्धेमध्ये पहिल्या सेमिफायनलमध्ये फ्रान्सने बेल्जिअमवर मात करून अंतिम फेरी गाठली तर दुसरीकडे क्रोएशियाने इंग्लंडला २-१ असं नमवून पहिल्यांदाच थेट विश्वचषकाची फायनल गाठली आहे. आता विश्वचषक विजेतेपदासाठी क्रोएशिया आणि फ्रान्स मध्ये लढत होणार आहे.
क्रोएशिया आणि इंग्लंड मधील सामन्यात उत्तरार्धात चित्र पालटले. कारण पूर्वार्धात १-० ने पुढे असलेल्या इंग्लंडच्या संघाची नंतर मात्र क्रोएशियाच्या आक्रमक खेळीने पीछेहाट होताना दिसली. क्रोएशियाच्या आक्रमक खेळीने अखेर इंग्लंडला या सामन्यात पराभूत होण्याची वेळ आली आहे. सामन्याच्या सुरुवातीला इंग्लंडने आक्रमक खेळ केला आणि सामान्यांच्या ५व्या मिनिटाला फ्री किकवर इंग्लंडने पहिला गोल केला.परंतु उत्तरार्धात क्रोएशियाने जोरदार खेळी करत ६८व्या मिनिटाला पेरिसीचने गोल केला आणि सामन्यात बरोबरी केली. परंतु अतिरिक्त ३० मिनिटाच्या वेळेत सामन्याच्या १०९व्या मिनिटाला क्रोएशियाकडून आणखी १ गोल करत २-१ अशी आघाडी घेतली आणि ती शेवट पर्यंत कायम ठेवली .
विशेष म्हणजे क्रोएशियाने प्रथमच विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक दिली आहे. आता १५ जुलै रोजी क्रोएशिया आणि फ्रान्स दरम्यान जगज्जेतेपदासाठी अंतिम सामना रंगणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं