अभिमानास्पद! गोल्डन गर्ल हिमा दासने जिंकले ५ सुवर्णपदक

नवी दिल्ली : झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्डन गर्ल आणि धावपटू हिमा दासने सुवर्ण धमाकाच केला आणि देशाची शान जगभरात उंचावली आहे. कारण आता अजून एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. हिमाने आता ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. यापूर्वी हिमाने ४ सुवर्ण पटकावली आहेत. त्यामुळे आता तिच्या खात्यात एकूण ५ सुवर्ण पदकं झाली आहेत. भारतासाठी अशी भव्य कामगिरी करणारी ती पहिलीच धावपटू ठरली आहे.
झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तिनं ४०० मीटर अंतर ५२.०९ सेकंदात पूर्ण करत सुवर्णपदकावर नाव कोरले आहे. याआधी तिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत ४ सुवर्णपदके पटकावली आहेत. त्यामुळे मागील वीस दिवसांत तिचं हे पाचवं सुवर्णपदक आहे.
Finished 400m today on the top here in Czech Republic today ????♀️ pic.twitter.com/1gwnXw5hN4
— Hima MON JAI (@HimaDas8) July 20, 2019
दरम्यान, आसाममध्ये सध्या पूरपरिस्थिती आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी हिमा दासने आपल्याला मिळणाऱ्या मानधनातून अर्धी रक्कम पूरग्रस्तांसाठी दान म्हणून दिली होती. तिच्या या निर्णयामुळे तिचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं