आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९; आज इंग्लंड - न्यूझीलंड अंतिम सामना

लंडन : काही दिवसांपूर्वी भारताचा प[पराभव करत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आणि यंदा क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार हे नक्की झालं. मागील दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आज अंतिम सामना रंगणार आहे. सदर सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होत आहे. या दोन्ही संघांनी अद्याप वर्ल्ड कप जिंकलेला नाही म्हणून आज जो संघ जिंकेल तो संघ इतिहास घडवणार आहे.
दोन्ही संघांनी साखळी फेरीत शानदार कामगिरी करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला होता. सेमीफायनलमध्ये इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला तर न्यूझीलंडने टीम इंडियाला नमवत फायनल गाठली आहे. असाच खेळ सुरु ठेवून फायनल जिंकून विजेतेपद मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करणार आहेत. या सामन्यात इंग्लंडकडून जेसन रॉय, जो रूट, मॉर्गन, जॉनी बेयरस्टो यांना चांगली कामगिरी करावी लागेल तर ट्रेंट बोल्ट, हेनरी, फर्गुसन यांना इंग्लंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागणार आहे.
न्यूझीलंडकडून कर्णधार विलियम्सन आणि रॉस टेलर यांच्याकडून चांगल्या अपेक्षा आहे तर इंग्लंडकडून जोफ्रा आर्चर, मार्क वूड आणि क्रिस वोक्स यांना न्यूझीलंडच्या फलंदाजांवर अंकुश ठेवावा लागणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात पाऊस काही व्यत्यय घालणार का ते देखील महत्वाचं ठरणार आहे. त्यात भारतीय क्रकेटप्रेमी आज कोणाच्या बाजूने चिअर करणार ते देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र यजमान इंग्लंड होमपीचवर तगडं आवाहन निर्माण करणार हे निश्चित आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं