Ind vs NZ 3rd T20I : न्यूझीलंड'समोर विजयासाठी १८० धावांचे आव्हान

हॅमिल्टन: तिसऱ्या टी-२० सामन्यात न्यूझीलंडने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. रोहित शर्मा आणि के एल राहुलने भारताला आक्रमक सुरूवात करून दिली. रोहित शर्मी-राहुलने ८९ धावांची भागिदारी केली. सलामीची जोडी फुटल्यानंतर भारताच्या ठरावीक अंतराने विकेट पडल्या. शिवम दुबेला कर्णधाराने तिसऱ्या स्थानावर पाठवले. मात्र, त्याला याचा फायदा घेता आला नाही.
न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताचा हिटमॅन रोहित शर्माला एक खास विक्रम स्वत:च्या नावावर केला. सेडन पार्कवर झालेल्या २३ चेंडूत ५० धावांची धमाकेदार खेळी केली. या अर्धशतकासह त्याने क्रिकेटमधील एक विक्रम केला. रोहितने आजच्या तिसऱ्या सामन्यात २३ चेंडूत ३ षटकार आणि ५ चौकारांसह अर्धशतक केले. यासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून त्याच्या १० हजार धावा पूर्ण झाल्या आहेत.
विराट व श्रेयस अय्यर यांनी किवी गोलंदाजांचा समाचार घेतला. श्रेयस १७ धावांवर माघारी परतला. विराटनं 25वी धाव घेताच आणखी एका विक्रमाला गवसणी घातली. टीम इंडियाकडून ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधाराचा मान कोहलीनं पटकावला. त्यानं महेंद्रसिंग धोनीला ( १११२) मागे टाकले. या विक्रमात दक्षिण आफ्रिकेचा फॅफ ड्यु प्लेसिस ( १२७३) आणि केन विलियम्सन ( ११३४) आघाडीवर आहेत. बेन्नेटनं 19व्या षटकात कोहलीला बाद केले. त्यानं २७ चेंडूंत ३८ धावा केल्या. भारतानं २० षटकांत ५ बाद १७९ धावा केल्या.
View this post on Instagram
LO and Behold! ?? The Hitman is on song in Hamilton ?? #TeamIndia #NZvIND
Web Title: India vs New Zealnd 3rd T20i Rohits stunning 50 Pandey Jadejas finish help India Post.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं