भारतीय बॉक्सर मेरी कोम जागतिक क्रमवारीत अव्वल

नवी दिल्ली: वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत प्रसिद्ध भारतीय महिला बॉक्सर मेरी कोम हिने ४८ किलो वजनी गटात विजेतेपद प्राप्त केले होते. या विजेतेपदानंतर वर्ल्ड चॅम्पियन स्पर्धेत ६ विजेतेपद पटकावण्याचा विक्रम तिच्या नावावर झाला होता. त्यात आता पुन्हा भारतीय क्रीडा जगातला अभिमानास्पद अशी बातमी मिळाली आहे. कारण, मेरी कोम हिने वर्ल्ड चॅम्पियन रँकिंग अर्थात “AIBA’ मध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.
तिच्या कामगिरीत सातत्य राहिल्याने हे शक्य झाल्याचे क्रीडा समीक्षक सांगत आहेत. विशेष म्हणजे मेरीसाठी २०१८ हे वर्ष खूपच चांगले ठरले होते. कारण राष्ट्रकुल स्पर्धा आणि पोलंडमधील इंटरनॅशनल बॉक्सिंग स्पर्धेत या अत्यंत महत्वाच्या अशा दोन्ही स्पर्धांमध्ये तिने सुवर्णपदकाला गवसणी घातली होती. त्याच बहारदार कर्तृत्वाच्या जीवावर तिला नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या इंटरनॅशनल बॉक्सिंग क्रमवारीत ७०० गुणांसह ४८ किलो वजनी गटातील अव्वल प्राप्त झाले आहे. दरम्यान, २०२०च्या ऑलिम्पिक स्पर्धेत खेळण्यासाठी मेरी कोम हिला ५१ किलो वजनी गटातून सामना खेळावा लागणार आहे. कारण ४८ किलो वजनी गट अद्याप २०२० च्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे आवाहन सुद्धा खडतर असणार आहे यात शंका नाही.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं