भारताची रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनावर मात

हॉकी चॅम्पियन ट्रॉफीमध्ये भारताने सलग दुसरा विजय संपादन केला आहे. पहिल्या सामन्यात कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तानला ४-० अशी मात दिल्यानंतर आता थेट रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीनाला २-१ असा धक्का दिला आहे.
रिओ ऑलिम्पिक विजेत्या अर्जेंटीना संघाने सुरुवातीपासून आक्रमक खेळी करत भारतीय हॉकी टिमवरील दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु भारताच्या बचावफळीने अर्जेंटिनाच्या टीमच्या आक्रमक खेळीला चांगलंच प्रतिउत्तर दिल.
अखेर सामन्याच्या १७व्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रीत सिंहने पेनल्टी कॉर्नवर अचूक गोल करत भारतीय टीमला १-० अशी आघाडी मिळवून दिल्याने भारताच्या विजयाच्या अशा पल्लवित झाल्या. परंतु काही वेळात अर्जेंटिनाची टीम पुन्हा आक्रमक खेळीत उतरली आणि भारतावर दबाव वाढविण्याचे तंत्र वापरू लागली.
परंतु भारतीय टीमचा गोलपोस्टचा बचाव उत्तम असल्याने अर्जेंटिनाचे आक्रमण फिके झाले. पुन्हा मनदीपने गोलपोस्टमध्ये बॉल अचूक डागत भारताला २-० अशी आघाडी मिळवून दिली. परंतु अर्जेंटिनाच्या गोंझोले पेयाटने पेनल्टी कॉर्नरवर गोल करुन अर्जेंटिनाच्या खात्यात एक गोल टाकून भारताविरुद्ध २-१ अशी गोलसंख्या केली. भारताच्या बचावफळीने उत्तम खेळ केल्याने भारताने अर्जेंटिनावर २-१ अशी मात केली. भारताचा पुढील सामना ऑस्ट्रेलियन टीम बरोबर होणार आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं