'कारगिल मॅरेथॉन': आज महाराष्ट्राचा ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ साईश्वर गुंटूक सुद्धा धावणार

कारगिल : काश्मीरच्या खोऱ्यात आज मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं आहे. सर्जिकल स्ट्राईक मागील मराठी चेहरा असलेले राजेंद्र निंभोरकर यांनी आज कारगिल मॅरेथॉनला फ्लॅगऑफ केला. याआधी आयोजित झालेल्या स्पर्धेत तब्बल काश्मीरमधील जवळपास ८०० पेक्षा अधिक आणि बाहेरून आलेल्या जवळपास २०० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता.
विशेष म्हणजे या अत्यंत कठीण अशा ‘कारगिल मॅरेथॉन’मध्ये महाराष्ट्राचा ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ साईश्वर गुंटूक’ला सुद्धा सहभागी होण्याचा मान मिळाला आहे. वयाच्या सातव्या वर्षीच देशातील अनेक मॅरेथॉन स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी करून केवळ देशातच नव्हे तर परदेशी स्पर्धकांवर सुद्धा साईश्वरने छाप पाडली आहे. अल्पावधीतच साईश्वर गुंटूक’ला लोकं ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ या नावाने ओळखू लागले. मूळचा सोलापूरचा असलेला साईश्वर केशव गुंटूकचे सातव्या वर्षातील विक्रम बघितल्यावर थक्क व्हाल असच त्याच कर्तृत्व आहे. एकदा सहज म्हणून फिरायला कोल्हापूरला आला आणि धावण्याची हौस म्हणून पहिल्यांदा त्याने कोल्हापूर येथील मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेतला आणि ती स्पर्धा त्याने सहज खिशात टाकली. परंतु तिथेच त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आणि त्यानंतर त्याने मध्य प्रदेशातील हिल मॅरेथॉन ही अवघड स्पर्धा जिंकली.
त्यानंतर साईश्वरने पुण्यातील एच २० मॅरेथॉन ही १० किलोमीटरची स्पर्धा केवळ ५८.०६ मिनिटात पार केली आणि सर्व दिग्गज स्पर्धकांना विचार करायला भाग पाडलं. त्यानंतर साईश्वरने हैद्राबाद मधील लव्ह स्पर्धेत अनेक दिग्गजांना धूळ चारली आणि मेडलवर स्वतःच नाव कोरल. तर पंजाब मधील नॅशनल सोलन हाफ डोंगरी मॅरेथॉन ही ११ किलोमीटरची स्पर्धा त्याने अवघ्या २.०३ तासात जिंकून जागतिक स्पर्धेत भाग घेणाऱ्या स्पर्धकांना डोक्याला हात लावायची वेळ आणली. त्याचवेळी पंजाबच्या क्रीडामंत्र्यांच्या हस्ते साईश्वरला ‘ज्युनिअर मिल्खासिंग’ हा किताब देऊन सन्मानित करण्यात आलं.
चिमुकल्या साईश्वरची सातव्या वर्षातील कीर्ती अशी झाली की लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘वर्षा मॅरेथॉन’ स्पर्धेत जिथे संपूर्ण देशातून म्हणजे तामिळनाडू, पंजाब, आसाम, हरियाणा, मुंबई, मध्य प्रदेश अशा अनेक राज्यातून खेळाडू भाग घेत असताना साईश्वरला त्या स्पर्धेचा ‘ब्रँड अम्बॅसिडर’ करण्यात आलं. तिथे छोट्या साईश्वरला मुख्य अतिथी हा मान मिळाला. आगामी मुंबई मान्सून आणि जम्मू मॅरेथॉन स्पर्धेत सुद्धा साईश्वर ‘ब्रँड अम्बॅसिडर’ असणार आहे. बर साईश्वर इथेच थांबला नाही कारण मुंबईमध्ये मे महिन्यात मुंबईमध्ये पार पडलेल्या ‘रन फॉर ट्राय’ मध्ये भाग घेतला आणि त्याच्या धावण्याचा वेग पाहून ऑस्ट्रेलिया, ब्राझील, इंडोनेशिया आणि आयर्लंड मधील स्पर्धक सुद्धा अवाक झाले. त्यामुळे हा छोटा जवान पुढे काय पराक्रम करू शकतो त्याचा अंदाज येऊ शकतो.
परंतु स्थानिक म्हणजे महाराष्ट्रातील होणाऱ्या अनेक मॅरेथॉन स्पर्धांमध्ये साईश्वरला आयोजक संधीच देत नसल्याने, त्याच्या पालकांनी प्रशासनातील तसेच सरकार दरबारी अनेकांच्या भेटी घेऊन मदतीची याचना केली होती. परंतु त्यांच्या अडचणींकडे सरकारने कानाडोळा केल्याने, साईश्वरच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे त्यांच्या अडचणी मांडल्या होत्या. राज ठाकरे यांनी सुद्धा साईश्वरला मदतीचं आश्वासन दिल्याने साईश्वरचे वडील केशव गुंटूक यांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. साईश्वरच्या घराची परिस्थिती अत्यंत हलाकीची असल्याने त्याच्या पालकांना त्याच्या प्रवासाचा खर्च सुद्धा झेपत नाही, असं त्याच्या वडिलांनी मत व्यक्त केलं होत. परंतु वाट्टेल ती काटकसर करून ते साईश्वरला प्रोत्साहन देत आहेत.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं