गणेशने कुस्ती जिंकलीच आणि उपस्थितांची मनंही जिंकली!

पुणे: पिळदार शरीरयष्टी, धोबीपछाड, तरे तरेचे डावपेच आणि जोरदार आदळ-आपट अनुभवन्याचा आनंद म्हणजे कुस्ती स्पर्धा.
एकमेकांना चितपट करण्याचा कसलेल्या पैलवानांचा प्रयत्न आणि भन्नाट तावा-तावाने शक्ती पणाला लावून आणि डावपेच आखून प्रतिस्पर्धीला नामोहरम करण्याचा प्रयत्न. परंतु हे सर्व करत असताना हि कुस्तीतील खिलाडूवृत्ती आणि प्रामाणिक पणे जास्त अनुभवी स्पर्धकाला दिलेला सन्मान.
महाराष्ट्राच्या कसलेल्या कुस्तीगीराकडून आज हीच खिलाडूवृत्ती महाराष्ट्र केसरी स्पर्धा २०१७ मध्ये अनुभवायला मिळाली.
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आज महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात उतरला. चंद्रहारच्या खजिन्यात 2007 आणि 2008 सालच्या महाराष्ट्र केसरीची गदा आहे. प्रतिस्पर्धी विजेता पैलवान गणेश जगताप सामना जिंकल्या जिंकल्या, थेट चंद्रहार पाटीलच्या पाया पडला.
आपणच पराभूत केलेल्या पैलवानेचे आशीर्वाद घेतल्याने, उपस्थित शौकिनांनी गणेशच्या खिलाडूवृत्तीचं कौतुक केलं. स्पर्धा जिंकल्यावर अनुभवी प्रतिस्पर्धीच्या पाया पडून आशीर्वाद घेत गणेशने कुस्ती तर जिंकलीच पण कुस्तीमींची मनंही जिंकली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं