जपानची नाओमी ओसाका 'यूएस ओपन २०१८' ची महिला विजेती

न्यूयॉर्क : चोविसाव्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या विजेतेपदाची आशा असलेल्या सेरेना विल्यम्सला अंतिम फेरीमध्ये पराभवाचा जबरदस्त मोठा धक्का बसला आहे. कारण जपानच्या नाओमी ओसाकाने धक्कादायक खेळी करून कारकिर्दीतील पहिले ग्रॅंड स्लॅम टायटल म्हणजे ‘यूएस ओपन २०१८’च महिला एकेरी विजेतेपद पटकावले आहे.
नाओमी ओसाकाने सेरेना विल्यम्सचा ६-२, ६-४ अशा फरकाने यूएस ओपन २०१८च्या महिला एकेरी विजेतेपदावर नाव कोरल आहे. वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी ग्रँड स्लॅम एकेरीचे विजेतेपद पटकावणारी नाओमी ओसाका पहिलीच जपानी खेळाडू ठरली आहे. त्याआधी उपांत्य फेरीत नाओमीने अमेरिकेच्या मार्गारेटचा पराभव करत अंतिम फेरी गाठली होती.
न्यूयॉर्कच्या अर्थर अॅश स्टेडियममध्ये ही अंतिम लढत रंगली होती. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या सेरेनाला ओसाकाने हा दुसऱ्यांदा पराभवाचा धक्का दिला आहे. याआधी तिनं ‘मियामी ओपन’ स्पर्धेत सेरेनावर मात केली होती. मार्गारेट कोर्टच्या सर्वाधिक चोवीस विजेतीपदांच्या विक्रमाची बरोबरी साधण्याची तिची संधी मात्र ओसाकामुळे हुकली आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं