ऑलिम्पिक | हरियाणाच्या 11 खेळाडूंची शाळेपासूनच तयारी होती | गुजरातमध्ये कोचला इन्सेंटिव्ह प्रकारच नाही

नवी दिल्ली, ०९ ऑगस्ट | टोकियो ऑलिम्पिक रविवारी संपले. भारताला एका सुवर्णासह ७ पदके मिळाली, जी १२१ वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आहे. परंतु अनेक प्रश्नही आहेत. १३१ कोटींची लोकसंख्या असलेल्या देशाला केवळ ७ पदके का? गेल्या २१ वर्षांत देशाने २० पदके जिंकली. यात ११ एकट्या हरियाणाने पटकावलीत. या वेळी ६ वैयक्तिक पदकांपैकी ३ हरियाणाच्या खेळाडूंनी जिंकली. हॉकीच्या पदकातही हरियाणाच्या खेळांडूचा वाटा आहे. १२७ खेळाडूंच्या पथकात हरियाणाचे ३० खेळाडू होते.
हरियाणात पहिल्यापासून क्रीडा संबंधित पायाभूत सुविधा आणि मजबूत पाया:
हरियाणात क्रीडा नर्सरी आहेत. शाळा-कॉलेज स्तरावर राष्ट्रीय पदक विजेत्याला ६ लाख रुपयांपर्यंत रोख बक्षीस मिळते. अडीच कोटींची लोकसंख्या असलेल्या हरियाणात साईची २२ केंद्रे आहेत. २३ कोटी लोकसंख्येच्या यूपीत २० केंद्रे, ८ कोटींच्या मप्रत १६, एवढ्याच लोकसंख्येच्या राजस्थानमध्ये १०, छत्तीसगड आणि गुजरातमध्ये फक्त ३-३ साई केंद्रे आहेत. हरियाणाचे मागील ३ वर्षांचे सरासरी क्रीडा बजेट ३०० कोटींपेक्षा जास्त आहे. यंदा ३९४ कोटी रु. राजस्थानमध्ये ते १०० कोटीच आहे. दुसऱ्या बाजूला मोदींनी हे ऑलिम्पिक वर्ष असतानाही देशाच्या स्पोर्ट्सचा बजेट २३० कोटीने घटवून ते किती क्रीडा प्रेमी आहेत याची प्रचिती देशाला दिली आहे.
हरियाणात आंतरराष्ट्रीय पदक जिंकणाऱ्या खेळाडूच्या कोचलाही २० लाखांपर्यंतचे इन्सेंटिव्ह मिळते. खेळाडूच नव्हे, कोचलाही प्रशिक्षणासाठी विदेशात पाठवले जाते. मप्र, राजस्थान, गुजरात, बिहार, छत्तीसगडमध्ये अशी कुठलीही सुविधा नाही. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकल्यास ६ कोटी, रौप्यसाठी ४ कोटी व कांस्यसाठी २.५ कोटी दिले जातात. तयारीसाठी १५ लाख रुपये मिळतात. राजस्थानमध्ये फक्त ५ लाख रुपये मिळतात. २००० च्या ऑलिम्पिकमध्ये कर्णम मल्लेश्वरीने पदक जिंकले होते, तेव्हापासूनच हरियाणाने ऑलिम्पिकसाठी खेळाडूंना घडवण्याची तयारी सुरू केली होती. हा त्याचाच परिणाम आहे.
प्रगत देश आणि ऑलिम्पिक
महाशक्तीचे रहस्य महिलाशक्ती : अमेरिकी महिलांनी पुरुषांपेक्षा ८०% जास्त व चिनी महिलांनी ८४% जास्त पदके जिंकली. एकापेक्षा जास्त पदक जिंकणारे बनले गेमचेंजर : अमेरिकेच्या २९ अॅथलिट्सनी ६७ पदके जिंकली. चीनच्या २९ अॅथलिट्सनी एकापेक्षा जास्त पदके जिंकली. परंतु त्यांचे एकूण मेडल ४१ झाले. म्हणजे अमेरिकेपेक्षा २६ कमी. अमेरिकी अॅथलिट्स २८ सुवर्ण, तर चीनचे अॅथलिट २३ सुवर्ण जिंकू शकले.
१२५ वर्षांत अमेरिकेने सर्वाधिक २,६३६ पदक जिंकले. चीन ६३४ पदकांसह चौथ्या स्थानी आहे. भारत ३५ पदकांसह ५४ व्या स्थानी. एकूण १० सुवर्ण, यात ८ हॉकीचे आहेत. नीरजच्या सुवर्णाने भारत अॅथलेटिक्समध्ये प्रथमच १८ व्या स्थानी, ७ सुवर्णांसह अमेरिका टॉप, दुसऱ्या स्थानी इटली
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Olympic sports infrastructure is very poor in India news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं