आशियाई क्रीडा स्पर्धां २०१८: पी. व्ही. सिंधू अंतिम फेरीत दाखल, भारताच्या सुवर्ण आशा पल्लवित

जकार्ता : बॅडमिंटनमध्ये भारताचं किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे. कारण भारताची आघाडीची महिला बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने इंडोनेशियात सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत जपानला नमवून अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सिंधूने उपांत्य फेरीत जपानच्या अकाने यामागुचीचा २१-१७, १५-२१, २१-१० अशा संघर्षपूर्ण लढतीत विजय प्राप्त करत अंतिम फेरी गाठली आहे.
सिंधूच्या या विजयाने भारतासाठी किमान एक रौप्यपदक निश्चीत झालं आहे. अंतिम फेरीत सिंधूची गाठ चीनच्या तैपेईच्या ताई त्झु यिंगशी पडणार आहे. यिंगने उपांत्य फेरीत सिंधूची साथीदार सायनावर दोन सेट्समध्ये मात केली होती. विशेष म्हणजे उपांत्य फेरीत मिळवलेल्या या विजयाबरोबरच सिंधू बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहचणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.
आधीच्या उपांत्य फेरीत सायना नेहवालला चीनच्या तैपेईच्या ताई त्झु यिंगकडून पराभव पत्करावा लागल्यानंतर सिंधूकडून भारताला सुवर्णपदकाची आशा होती. जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूसमोर आता जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जपानच्या अकाने यामागुचीचं आव्हान होतं. तसेच या सामन्यात सिंधूला तगडं आव्हान मिळेल असं चित्र निर्माण झालं होतं.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं