महत्वाच्या बातम्या
-
मुंबई मॅरेथॉन २०२० : १७व्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद
आशियातील सर्वात सर्वात मोठी व मानाचा ‘गोल्ड लेबल’ दर्जा मिळालेल्या मुंबई मॅरेथॉनला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे. यंदाच्या मुंबई मॅरेथॉनमध्ये गतवर्षीच्या तुलनेत नऊ हजारांनी वाढलेली धावपटूंची संख्या नागरिकांमध्ये ‘फिटनेस’चे वाढलेले महत्त्व अधोरेखित करताना दिसत आहे. त्यात कडाक्याच्या थंडीला न जुमानता मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मुंबई मॅरेथॉनला उपस्थिती लावली आहे. देश-विदेशातील नामांकित धावपटू विजेतेपद पटकावण्यासाठी सज्ज झाले असून यंदाही केनिया, इथियोपियाचे धावपटू यासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मुंबई मॅरेथॉन टीमने ‘बी बेटर’ या थीमसह, घनकचरा व्यवस्थापनासाठी उचललेले विशेष पाऊल पाहता यंदाची ‘टीएमएम २०२०’ पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला आहे.
5 वर्षांपूर्वी -
भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत निधन
भारताचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू नाडकर्णी यांचे मुंबईत वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच आज त्यांची प्राणज्योत मालवली. बापूंच्या निधनाने एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातील जुनाजाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.
5 वर्षांपूर्वी -
इंदूर कसोटी: भारताचा बांगलादेशवर डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय
बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताने एक डाव आणि १३० धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताने पहिल्या डावात ३४३ धावांची विजयी अशी आघाडी घेतली होती. या डोंगरा ऐवढ्या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा दुसरा डाव २१३ धावात संपुष्ठात आला. तिसऱ्या दिवशी सकाळी भारताने पहिला डाव घोषित केला. त्यानंतर ३४३ धावांचा डोंगर घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव देखील कोसळला. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील मुस्ताफिझूर रेहमान (६४) वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभी करता आली नाही. या विजयासह भारताने कसोटीमध्ये घरच्या मैदानावर सलग १३व्या विजयाची नोंद केली आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.
6 वर्षांपूर्वी -
महान कुस्तीपटू भारत केसरी दादू चौगुले यांचे निधन
देश-विदेशातील अनेक मल्लांशी भिडत त्यांना लाल माती आणि मॅटवर अस्मान दाखविणारे पैलवान ‘रुस्तम-ए-हिंद’ दादू चौगुले यांचे प्रदीर्घ आजाराने खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. दादू चौगुले यांनी दोन वेळा राष्ट्रकुल स्पर्धेत रौप्य पदकांची कमाई त्यांनी केली होती. या बरोबरच ‘रुस्तुम ए हिंद’, ‘महान भारत केसरी’ अशा पुरस्कारांनीही त्यांना सन्मानीत करण्यात आले. भारत सरकारने मानाच्या मेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारानेही त्यांचा यथोचित सन्मान केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पुणे कसोटीत भारताचा द. आफ्रिकेवर दणदणीत विजय
भारतीय संघानं विराट कोहलीच्य नेतृत्वाखाली पुण्यातील कसोटी मालिकेत विजय मिळवत मालिकेवर कब्जा केल आहे. भारतानं तीन कसोटी सामन्यांची मालिका २-० नं आपल्या नावावर केली आहे. यासोबत टीम इंडियानं कसोटी क्रिकेटमध्ये एका नव्या विक्रमाची नोंद केली आहे. भारतीय संघानं घरच्या मैदानावर आतापर्यंत ११ कसोटी मालिका जिंकल्या आहेत. आतापर्यंत कोणत्याही संघाला १० पेक्षा जास्त मालिका घरच्या मैदानावर जिंकता आलेल्या नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
विराटचा झंजावात, लारा-सचिनचे विक्रम मोडीत
क्रिकेटच्या मैदानावर दर सामन्यागणिक विक्रम करणारा भारतीय संघाचा कर्णधार व जागतिक दर्जाचा फलंदाज विराट कोहली यानं आज क्रिकेटविश्वातील नवं शिखर ‘सर’ केलं. कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये दीड शतक ठोकण्याचा सर डॉन ब्रॅडमन यांचा विक्रम विराटनं आज मोडला. एवढ्यावरच न थांबता, कसोटीतील सातवं द्विशतक ठोकून त्यानं मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व टीम इंडियाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यांचा द्विशतकांचा विक्रमही मोडला. तसंच, कसोटीतील ७ हजार धावा पूर्ण केल्या. विराटच्या या खेळाच्या जोरावर भारतानं पुणे कसोटीत ६०० धावांचा डोंगर उभारला आहे.
6 वर्षांपूर्वी -
वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धाः अमित पंघल फायनलमध्ये
भारतीय बॉक्सर अमित पांघलने जागतिक बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अशी कामगिरी करणारा अमित पहिला पुरुष बॉक्सर ठरला आहे. २०१८ साली झालेल्या आशियाई खेळांमध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या अमितने ५२ किलो वजनी गटात उपांत्य फेरीत कझाकस्तानच्या साकेन बिबॉसिनोव्हचा पराभव केला. दुसरीकडे ६३ किलो वजनी गटात भारताच्या मनिष कौशिकला मात्र उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला.
6 वर्षांपूर्वी -
कुस्तीपटू विनेश फोगट २०२० टोकियो ऑलिम्पिकसाठी पात्र
भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटनं जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत अमेरिकेच्या सारा हिल्डेब्रँटचा पराभव करत टोकियोमध्यो होणाऱ्या ऑलिम्पिकसाठी आपले स्थान पक्के केले आहे. अशी कामगिरी करणारी विनेश फोगट पहिली कुस्तीपटू बनली आहे. ५३ किलो वजनी गटात विनेशनं ही कामगिरी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
ऑस्ट्रेलियाचा ऍशेसवर कब्जा, इंग्लंडला १८५ रननी लोळवलं
अॅशेस कसोटी क्रिकेट मालिकेत ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यात इंग्लंडला १८५ धावांनी धूळ चारली. जागतिक कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी विराजमान असलेल्या पॅट कमिन्सने रविवारी लौकिकाला साजेशी कामगिरी करत संघाला विजय मिळवून दिला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने प्रतिष्ठेचा अॅशेस करंडक त्यांच्याकडेच राखून पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली. २०१७ च्या अॅशेस मालिकेत ऑस्ट्रेलियाने ४-० असे यश मिळवले होते.
6 वर्षांपूर्वी -
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल US ओपनचा चॅम्पियन
स्पेनचा स्टार खेळाडू राफेल नदाल (Rafael Nadal)याने पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत ‘अमेरिकन ओपन’ (US Open २०१९) स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या दानिल मेदवेदेवला पराभूत केलं. जवळपास पाच तास चाललेल्या या सामन्यात नदालने मेदवेदेवचा ७-५, ६-३, ५-७, ४-६, ६-४ असा पराभव केला.
6 वर्षांपूर्वी -
US Open: फेडररला पराभवाचा धक्का; तर नदालची स्पर्धा चौथ्यांदा जिंकण्याच्या दिशेने कूच
टेनिसमधील ‘बापमाणूस’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रॉजर फेडररचं अमेरिकन ओपनमधील आव्हान आज उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. बेबी फेडरर, अर्थात ग्रिगोर दिमित्रोव्हनं पाच सेटच्या थरारक सामन्यात फेडररचा पराभव केला. फोरहँडसह अन्य काही फटके फेडररच्याच स्टाईलने खेळत असल्यानं दिमित्रोव्हला बेबी फेडररही म्हटलं जातं. या ‘बेबी’नं आज ‘बाबा’ला पार दमवल्याचं पाहायला मिळालं.
6 वर्षांपूर्वी -
भारत वेस्ट इंडिज कसोटी मालिका; यजमानांना व्हाईटवॉश
टी-२०, वन-डे पाठोपाठ विराट कोहलीच्या भारतीय संघाने जेसन होल्डरच्या वेस्ट इंडिज संघावर कसोटी मालिकेतही निर्विवाद वर्चस्व मिळवलं आहे. अँटीग्वा कसोटीत बाजी मारल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जमैका कसोटीतही विंडीजला झटपट गुंडाळत सामना आपल्या खिशात घातला. भारतीय संघाने कसोटीत २५७ धावांनी बाजी मारत मालिकेत २-० अशी सरशी साधली. पहिल्या डावात शतक आणि दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या हनुमा विहारीची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. दुसऱ्या डावात भारताकडून मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले.
6 वर्षांपूर्वी -
भारताची वेस्ट इंडिजवर ५९ धावांनी मात
कर्णधार विराट कोहलीचे दमदार शतक आणि भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर डकवर्थ लुईस नियमानुसार 59 धावांनी मात केली. या विजयासह भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
6 वर्षांपूर्वी -
मी फक्त संघासाठी नाही तर देशासाठी देखील खेळतो : रोहित शर्मा
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा यांच्यातील वादाच्याच चर्चा गेल्या आठवडाभर रंगल्या. पण, कॅप्टन कोहलीनं या सर्व वृत्ताचं खंडन करताना संघात ऑल इज वेल असल्याचे सांगितले. वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी झालेल्या पत्रकारपरिषदेत कोहलीनं या अफवा असल्याचे स्पष्ट केले. या सर्व वादावर रोहितनं आतापर्यंत कोणतही विधान केलं नव्हतं, परंतु बुधवारी त्यानं समाज माध्यमांवर एक पोस्ट टाकून स्वतःचं मत व्यक्त केलं.
6 वर्षांपूर्वी -
आजपासून इंग्लंड-ऑस्ट्रेलियात ‘अॅशेस’ मुकाबला
वर्ल्ड कप स्पर्धेतील जेतेपदानंतर इंग्लंड संघाने पारंपरिक अॅशेस मालिकेसाठी दंड थोपटले आहेत. गुरुवारपासून सुरु होणाऱ्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघाने अंतिम ११ सदस्यीय संघ जाहीर केला. पण, या संघात वर्ल्ड कपमधील इंग्लंडचा सर्वात यशस्वी गोलंदाज जोफ्रा आर्चरला संधी मिळालेली नाही. त्याच्यासह सॅम कुरन आणि ऑली स्टोन यांना अंतिम अकरामध्ये स्थान पटकावता आलेले नाही. कर्णधार जो रूटने हा संघ जाहीर केला.
6 वर्षांपूर्वी -
अजिंक्य रहाणेच्या घरी लवकरच नवा पाहुणा येणार!
भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा उप कर्णधार अजिंक्य रहाणे च्या घरी लवकरच एका छोट्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. अजिंक्यने पत्नी राधिका सोबतचा एक फोटो इंस्टाग्राम वर पोस्ट करून, अजिंक्य बाबा होणार आहे ही आनंदाची बातमी जाहीर केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून पाकिस्तानचा डावखुरा गोलंदाज मोहम्मद आमीर निवृत्त
पाकिस्तान क्रिकेट टीमचा डावखुरा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर याने वयाच्या अगदी २७व्या वर्षी आंतराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून आपली निवृत्ती जाहीर केली. हि घोषणा त्यांनी शुक्रवार २६ जुलै २०१९ रोजी केली. २००९ मध्ये श्रीलंके समोर कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मोहम्मद आमीर यांचं वय १७ वर्षे होतं.
6 वर्षांपूर्वी -
अभिमानास्पद! गोल्डन गर्ल हिमा दासने जिंकले ५ सुवर्णपदक
झेक रिपब्लिकमध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत गोल्डन गर्ल आणि धावपटू हिमा दासने सुवर्ण धमाकाच केला आणि देशाची शान जगभरात उंचावली आहे. कारण आता अजून एका सुवर्ण पदकाला गवसणी घातली आहे. हिमाने आता ४०० मीटर धावण्याच्या प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. यापूर्वी हिमाने ४ सुवर्ण पटकावली आहेत. त्यामुळे आता तिच्या खात्यात एकूण ५ सुवर्ण पदकं झाली आहेत. भारतासाठी अशी भव्य कामगिरी करणारी ती पहिलीच धावपटू ठरली आहे.
6 वर्षांपूर्वी -
इंग्लंडचा ‘जागतिक’ विजय! क्रिकेटला मिळाला नवा विश्वविजेता
आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धा २०१९ च्या अंतिम सामन्यात सुपर ओव्हरच्या माध्यमातून इंग्लंड नवा विश्वविजेता ठरला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने ५० षटकात एकूण २४१ धावांच लक्ष इंग्लंड टीमसमोर ठेवलं होतं. या आव्हानाचा पिच्छा करताना इंग्लंडनेदेखील देखील तेवढ्याच म्हणजे २४१ धावाच केल्या. परिणामी सामन्यात सुपर ओव्हर खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. सुपर ओव्हरमध्येही सामना अनिर्णित राहिला. त्यामुळे सर्वाधिक चौकार-षटकारांच्या निकषावर इंग्लंडला यावेळचा विश्वविजेता म्हणून घोषित करण्यात आले.
6 वर्षांपूर्वी -
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप २०१९; आज इंग्लंड - न्यूझीलंड अंतिम सामना
काही दिवसांपूर्वी भारताचा प[पराभव करत न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठली आणि यंदा क्रिकेटला नवा विश्वविजेता मिळणार हे नक्की झालं. मागील दीड महिन्यांपासून सुरु झालेल्या क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये आज अंतिम सामना रंगणार आहे. सदर सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या संघांमध्ये होत आहे. या दोन्ही संघांनी अद्याप वर्ल्ड कप जिंकलेला नाही म्हणून आज जो संघ जिंकेल तो संघ इतिहास घडवणार आहे.
6 वर्षांपूर्वी