नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिल्या मॅचमध्ये रिलायन्स एन्ड आणि अदानी एन्डची चर्चा

अहमदाबाद, २४ फेब्रुवारी: जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असे अशी ओळख असलेल्या गुजरातच्या मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नावं देण्यात आलं आहे. स्टेडियमचं नामकरणं नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद असं करण्यात आलं आहे. याच मैदानावर आजपासून भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना प्रकाशझोतात रंगणार आहे.
अहमदाबादमधील मोटेरा स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना आजपासून खेळला जाणार आहे. प्रकाशझोतात होणाऱ्या पिंक बॉल क्रिकेट सामन्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली असून, सामना खेळवण्यापूर्वी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्टेडियमचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय क्रीडा मंत्री किरण रिजिजू आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह उपस्थित होते.
दरम्यान, सरदार वल्लभभाई पटेल यांच्य नावाला बगल देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाला प्राथमिकता दिल्याने भाजपवर समाज माध्यमांवर जोरदार टीका होताना दिसत आहे. याच विषयाला अनुसरून ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी एक फोटो ट्विट करत मोदी सरकारला टोला लगावला आहे. कारण नरेंद्र मोदी स्टेडियमवरील पहिल्या मॅचमध्ये रिलायन्स एन्ड आणि अदानी एन्डची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे.
So, Modi got the Sardar Patel stadium in Ahmedabad named after himself! And the 2 ends of the stadium after his 2 favourite cronies Ambani & Adani! Wah! What a sixer Modiji! pic.twitter.com/t1Y6bFIW1S
— Prashant Bhushan (@pbhushan1) February 24, 2021
News English Summary: So, Modi got the Sardar Patel stadium in Ahmedabad named after himself! And the 2 ends of the stadium after his 2 favourite cronies Ambani and Adani Wah! What a sixer Modiji said Prashant Bhushan.
News English Title: Prashant Bhushan criticised over renaming stadium name as Narendra Modi stadium news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं