घरच्या घरी हा फायदेशीर आणि बजेट व्यवसाय करा आणि मिळवा नफा | नक्की वाचा

मुंबई , ०८ जुलै | पळसाच्या पानांची पत्रावळ संपुष्टात आली आहे. पत्रावळी आणि द्रोणाचा वापर लग्नकार्यात, छोटया-मोठया समारंभात उपयोग होतो. कमी जागा आणि?कमी भांडवल लागणारा हा व्यवसाय आहे.
कागदी पिशव्या:
महाराष्ट्र सरकारने पॉलिथीनच्या कॅरी बॅगवर पूर्णपणे बंदी घातल्याने कागदी पिशव्याचे चलन फार जोरात वाढले आहे.
कापडी पिशव्या:
बाजारात तरटाच्या, ज्युटच्या, रेक्झिन अशा प्रकारची कापडं किलोच्या भावाने मिळतात. त्याचा विविध आकाराच्या ऑर्डरपणे पिशव्या बनवाव्यात.
पापड आणि सांडगे:
कुटिर उद्योगात पापड हा उद्योग घरोघरी केला जातो. पापडांमध्ये प्रकारही बरेच आहेत. तांदळाचे, ज्वारीचे, नाचणीचे, उडीदाचे, साबुदाण्याचे तसंच पापडामध्ये कुरडया हा प्रकारही केला जातो. गव्हाच्या, तांदळाच्या कुरडया असे अनेक प्रकार केले जातात.
मसाले :
मसाले तयार करण्याचे प्रशिक्षण घेतलं की वेगवेगळ्या जातीत लागणा-या मसाल्यांचे प्रकार करून मोठया प्रमाणात विक्री करता येते. याशिवाय घरगुती फरसाण, चिवडा, दिवाळी फराळ, लाडू, मोदक, मेणबत्ती, अगरबत्ती, लाकडी खेळणी अशा अनेक कलेला आपण उद्योगात आणू शकतो.
एखाद्या उद्योगात टिकून राहायचं असेल, व्यवसायात यशस्वी व्हायचं असेल, तर सतत व्यवसायाचा विकास करत राहणे गरजेच आहे. व्यवसायासाठी आपल्याला काही महत्त्वपूर्ण परवाने जरुरी आहेत ते जाणून घेऊ या :
* लघु उद्योग नोंदणी प्रमाणपत्र डी.जी.टी नोंदणी
* ट्रेडमार्कसाठी वस्त्रोउद्योग आयुक्त/अन्न आणि औषध
* नियंत्रक/महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांकडून ना हरकत प्रमाणपत्र.
* उद्योगधंद्याच्या नोंदणीसाठी : जिल्हा उद्योग केंद्रात लघु उद्योगाची नोंदणी केली जाते.
यंत्रसामग्रीसाठी:
लघुउद्योग सेवा संस्था साकीनाका, कुर्ला यांच्याकडे यंत्रसामग्री व उपकरणाची माहिती मिळते.
कच्च्या मालासाठी:
उद्योग सहसंचालक धर्मादाय आयुक्त भवन, वरळी यांच्यामार्फत मुंबईतल्या उद्योगासाठी मार्गदर्शन मिळतं
जागा किंवा शेडसाठी:
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाकाली केव्हज रोड, अंधेरी. यांच्यामार्फत औद्योगिक वसाहती उभारण्यात आलेल्या आहेत त्यांच्यामार्फत प्लॉट किंवा तयार गाळे काही अटींवर उद्योजकांना देण्यात येतात.
लघुउद्योजकांच्या उत्पादनाची खरेदी:
उद्योग सहसंचालक, सेंट्रल स्टोअर्स परचेस ऑर्गनायझेशन.
ना हरकत दाखला:
ग्रामपंचायत, नगरपालिका, महापालिका.
बिस्कीट, शितपेय, औषधे, सौंदर्य, प्रसाधने इत्यादी:
कमिशनर ऑफ फ्रुट अॅण्ड ड्रग्ज अॅडमिनिस्ट्रेशन, गृहनिर्माण भवन, वांद्रे (पूर्व)
बेकरी, भाजके पोहे व गिरणीसाठी:
जिल्हा अन्नधान्य पुरवठा अधिकारी, जिल्हाधिकारी.
स्फोटक वस्तूंचे उत्पादन:
चीफ कंट्रोलर अॅण्ड एक्सक्युझिव्ह ओल्ड हायकोर्ट बिल्डिंग, नागपूर
कंपनीच्या रजिस्ट्रेशनसाठी:
रजिस्ट्रार ऑफ कंपनीज, १००, नेताजी सुभाषचंद्र रोड, मुंबई
फॅक्टरीच्या रजिस्ट्रेशनसाठी:
चीफ इन्स्पेक्टर ऑफ फॅक्टरीज
महाराष्ट्र शासन, एअर कंडिशन मार्केट, ताडदेव, मुंबई
पेटंट नोंदणीसाठी:
रजिस्ट्रर ऑफ पेटंटस् ऑफिस, २१४ सक्र्युलर रोड, कोलकाता-१७
गुणमुद्रा नोंदणी:
इंडस्ट्रीयल रिसर्च लॅबोरेटरी, सायन चुनाभट्टी रोड, मुंबई -७०
ट्रेडमार्क नोंदणी:
रजिस्ट्रार ऑफ ट्रेडमार्कस, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऑफिसेस, महर्षी कर्वे रोड, पुणे
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: Home based business details in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं