Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सेनेचं अमराठी राजकारण | भाजपाची फारकत | 'गेम छो' होण्यापूर्वीच मराठी माणूस मनसेकडे
राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज बाहेर गर्दी केली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी दिली. मागील विधानसभेत राज ठाकरे यांनी कौटुंबिक संबंध जपताना आदित्य ठाकरेंविरुद्ध उमेदवार दिला नव्हता. दुसऱ्या बाजूला भाजपाशी युती असल्याने अमराठी मतं आदित्य ठाकरेंना मिळाली होती. त्यात राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांना शिवसेनेत आणून त्यांच्या विरुद्धची राजकीय स्पर्धा संपुष्टात आणली होती.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरे यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या परिक्षा पुढे ढकलण्यात आला. आता या परिक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी दर्शवली होती. याबाबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंनी कोरोना काळात परिक्षा न घेण्यासंदर्भातील पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले आहे. या पत्रात आदित्य ठाकरेंनी परिक्षेच्या विषयात लक्ष घालण्याचे केले आवाहन मोदींना केले आहे.
5 वर्षांपूर्वी -
लॉकडाऊनमध्ये पार्ट्यांच्या आयोजनात पब-पार्टी गँगचे कुणी समर्थक सत्ताधारी आहेत का?
सुप्रीम कोर्टाने सुशांत सिंह प्रकरण सीबीआयकडे सोपवण्याचा आदेश देताना प्राथमिकदर्शी मुंबई पोलिसांनी कोणतंही चुकीचं काम केल्याचं सूचवत नसल्याचं म्हटलं आहे. न्यायमूर्ती ऋषिकेश रॉय यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी त्यांनी मुंबई पोलिसांनी मर्यादित तपास केला असून एफआयआर दाखल केला नसल्याचं न्यायालयाने निदर्शनास आणलं.
5 वर्षांपूर्वी -
नाईट लाईफ गॅंगला मोठं योगदान देणाऱ्या डिनो मोरियाला पद्म पुरस्कार मिळणार नाही अशी...
वेगवेगळ्या क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदित्य ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. या समितीत 5 कॅबिनेट मंत्री, 2 राज्यमंत्री, प्रधान सचिव, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी अशा 9 जणांचा यात समावेश आहे.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा - भाजपाची मागणी
सुशांतसिंह राजपूत प्रकरणात बिहार सरकारला तसे पडायचे कारण नव्हते. सुशांतचे कुटुंब म्हणजे वडील पाटण्यात राहतात. त्याच्या वडिलांशी त्याचे संबंध चांगले नव्हते. वडिलांनी केलेले दुसरे लग्न सुशांतला मान्य नव्हते. त्यामुळे वडिलांशी त्याचे भावनिक नाते उरले नव्हते. याच वडिलांना फूस लावून बिहारमध्ये एक ‘एफआयआर’ दाखल करायला लावला गेला व मुंबईत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करायला बिहारचे पोलीस मुंबईला आले. याचे समर्थन होऊच शकत नाही. बिहारचे पोलीस म्हणजे ‘इंटरपोल’ नव्हे. एका गुन्ह्याचा तपास मुंबई पोलीस करीत आहेत.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत प्रकरण | आदित्य ठाकरेंविरोधात पुन्हा ट्विटरवर जोरदार अभियान | हजारो ट्विट्स
सुशांत प्रकरणावरून भाजपने महाविकास आघाडीला कात्रीत पकडण्याची योजना आखल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपचा रोख महाविकास आघाडीवर असला तरी त्यांचं मुख्य लक्ष हे शिवसेनेचे नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे हेच असल्याचं म्हटलं जातं आहे. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील मागील काही दिवसांपासून आदित्य ठाकरे यांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं आहे. तसेच सुशांत प्रकरणात केंद्राने सीबीआय चौकशीला मान्यता दिल्यानंतर आदित्य ठाकरेंविरोधात डिजिटल अभियान जोरदारपणे सुरु झाले आहे.
5 वर्षांपूर्वी -
आदित्य आणि उद्धव ठाकरेंविरोधात आक्षेपार्ह पोस्ट? भाजप IT सेल कार्यरत होतोय?
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या विरोधात सोशल मीडियावर एका महिलेनं आक्षेपार्ह पोस्ट लिहिली होती. या प्रकरणी सुनयना होलेविरोधात सायबर विभागाने गुन्हा दाखल केला होता. पण, या महिलेला जामीन हा भाजपच्या नेत्यांची केल्याची धक्कादायक बाबसमोर आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
माझा संयम सुटला तर? तुमच्या या विधानाचा अर्थ लोकांनी कसा घ्यायचा, भाजप आक्रमक
यापूर्वी देखील भाजप तसेच चित्रपट श्रुष्टीतील अनेकांनी आदित्य ठाकरे यांना सुशांत प्रकरणावरून लक्ष केलं आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर हाच विषय ट्रेंडिंगमध्ये असल्याचं पाहायला मिळालं आहे. परिणामी आदित्य ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावरून संताप व्यक्त केला होता. याप्रकरणी त्यांनी समाज माध्यमांवर एक प्रसिद्धी पत्रक काढलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
हे गलिच्छ राजकारण! सुशांत प्रकरणाशी माझा किंवा माझ्या कुटुंबाचा काहीही संबंध नाही - आदित्य ठाकरे
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण देशभरात चर्चेचा विषय ठरलं आहे. मागील काही दिवसांपासून या घटनेच्या तपासावरून आरोप होताना दिसत आहे. सुशांत सिंह प्रकरणात राज्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. सुशांत सिंहच्या पूर्वीची असिस्टंट मॅनेजर दिशा सालियन हिने आत्महत्या केलेली नाही, तर तिची बलात्कार करून हत्या करण्यात आली आहे,” असा दावा नारायण राणे यांनी केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
२ दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे मुंबई पोलिस आयुक्तांना भेटतात आणि आज पत्रकार परिषद
ज्या राज्यात घटना घडली असेल त्याच राज्याचे पोलीस संबंधित घटनेचा तपास करतात. त्यामुळे सुशांत आत्महत्या तपासाचा अधिकार कायद्याने मुंबई पोलिसांकडे असल्याचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी म्हटलंय. यामुळे बिहार पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह झालायं. सुशांत सिंह राजपुतच्या आत्महत्येप्रकरणी मुंबईत आलेल्या बिहार पोलिसांना होम क्वारंटाईन केल्यानंतर मुंबई पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला. यावर मुंबई पोलिसांतर्फे आता स्पष्टीकरण देण्यात आलंय. रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्स्फर झाल्याच्या चर्चेलाही पुर्णविराम मिळालाय.
5 वर्षांपूर्वी -
अक्षय, आदित्य ठाकरे आणि पोलीस आयुक्तांची भेट, निराधार वृत्त प्रसिद्ध
अक्षय कुमारने मुंबई पोलिसांसाठी fitness- health tracking devices भेट दिली असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी फेसबूकद्वारे दिली. मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या जागेत या तिघांची बैठक झाली.
5 वर्षांपूर्वी -
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात एका युवा मंत्र्याचा दबाव - आ. अतुल भातखळकर
भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी शुक्रवारी एक व्हिडीओ ट्विट केला. त्यात त्यांनी म्हटलं की,”अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या तपासात राज्यातील एका युवा मंत्र्याचा दबाव असल्यामुळे मुंबई पोलीस निष्पक्ष चौकशी करू शकत नाहीत. CBI ने तात्काळ हा तपास हाती घेऊन बॉलिवूडमधील माफियांचा पर्दाफाश करावा अशी विनंती मी केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह यांना केली आहे. ”राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता पार्थ अजित पवार यांनीही अशीच मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास योग्य रितीनं करत नसल्याची शंका राज्यातील जनतेमध्ये निर्माण होत आहे.
5 वर्षांपूर्वी -
वटवृक्ष वाचवण्यासाठी पुढाकार आणि मुंबईत १२८२ झाडांची कत्तल करण्याचे प्रस्ताव मंजूर
भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामाच्या आड येणारा सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष वाचविण्याबाबत राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलला आहे. आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली.
5 वर्षांपूर्वी -
करण जोहर आणि आदित्य ठाकरे चांगले मित्र, त्यामुळे अजून चौकशी झाली नाही - कंगना रानौत
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे. दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अंतिम वर्ष परीक्षा वाद सुप्रीम कोर्टात, न्यायालयाने याचिका दाखल करून घेतली
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
#BabyPenguin ट्विटवर ट्रेंड, युवासेनेकडून पोलिसात तक्रार दाखल
ट्विटरवर #BabyPenguin हा हॅशटॅग मोठ्या प्रमाणावर ट्रेंड होत आहे. यामध्ये ठाकरे सरकारची थेट मुघल राजशी तुलना करणाऱ्या एका सोशल मीडिया युजरविरोधात मुंबई पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर हा हॅशटॅग अधिकच ट्रेंड होऊ लागला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, युवासेनेचे कायदेशीर सल्लागार धर्मेंद्र मिश्रा यांनी ट्विटर युजर समीत ठक्कर याच्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
राज्याचे बरे वाईट झाले तर आनंद होणारा हा जगातील एकमेव विरोधी पक्ष - आदित्य ठाकरे
करोनाचा प्रादुर्भाव जगभरातल्या बहुतांश देशांमध्ये वाढतो आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया या देशांनी करोना नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत ते चांगले आहेत असं WHO ने म्हटलंय. अशातच जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने करोना नियंत्रणात आणण्यासाठी मुंबईतल्या धारावी मॉडेलचंही कौतुक केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
युजीसीच्या निर्णयाविरुद्ध आदित्य ठाकरेंची टीका, राहुल गांधींचाही विरोध
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) अंतिम वर्षाच्या सप्टेंबर अखेरपर्यंत घेण्याचा आदेश काढला आहे. मात्र, युजीसीने दिलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्रात सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेणं अशक्य असल्याचं राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं होतं.
5 वर्षांपूर्वी -
कोळसा खाण: केंद्राच्या 'त्या' निर्णयाला राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचा विरोध
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या उत्तर दिशेस बफर क्षेत्रास लागून असलेल्या ‘बंदर कोल ब्लॉक’ ला कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीतून वगळण्यात यावे.या मागणीसाठी इको-प्रो तर्फे मूक निदर्शन करण्यात आली. कोल इंडियातर्फे लिलाव करण्यात येणाऱ्या ४१ कोल ब्लॉकच्या यादीत, बंदर कोल ब्लॉकचा समावेश असल्याने ताडोबा-बोर-मेळघाट वन्यप्राणी कॉरिडोर-भ्रमण मार्ग संकटात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
5 वर्षांपूर्वी -
चिमुकलीच्या मदतीसाठी आदित्य ठाकरेंचा पुढाकार, चिमुकलीच्या पित्याने मानले आभार
जन्मतःच हृदयात तीन ब्लॉक असलेल्या सहा दिवसांच्या अर्भकाला मदतीचा हात मिळाला आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नवजात बाळाच्या पित्याकडे एक लाख रुपयांची मदत सुपूर्द केली. आदित्य ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसाला खर्च टाळून गरजूंना मदत करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले होते.
5 वर्षांपूर्वी