Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरेंचं राजकीय वजन वाढवायला गेले, आता अदानींच वजन झिरोच्या दिशेने, कनेक्शन जाणून घ्या
Adani Group Crisis | जानेवारी महिन्यात देशातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींनी मुंबईत मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती आणि त्याचे फोटो देखील मीडियापर्यंत पोहोचविण्यात आले होते. त्याभेटीमागे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुक आणि शिवसेनेतील फूट याचा संदर्भ होता असं राजकीय विश्लेषकांनी म्हटले होते.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Crisis | अदानी समूहाचे मुंबईतील 3 मोठे प्रकल्प संकटात, जगभरात अदानी ग्रुपवरील चौकशा वाढल्या
Adani Group Crisis | अमेरिकन शॉर्ट सेलर फर्म हिंडेनबर्गच्या संशोधन अहवालानंतर अदानी समूहाच्या अडचणी वाढत आहेत. अब्जाधीश गौतम अदानी आपल्या कॉर्पोरेट आयुष्यातील सर्वात वाईट संकटाशी झुंज देत आहेत. या गटाला एकापाठोपाठ एक मोठा धक्का बसत आहे. दरम्यान, आता अदानींचे अनेक प्रकल्प, ज्यावर अब्जावधी रुपये खर्च केले जात आहेत, ते सर्व संशयाच्या भोवऱ्यात सापडले असून त्याबद्दल सर्व प्रकारचे प्रश्न विचारले जात आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Adani Group Crisis | वाट्टोळं होण्याच्या दिशेने? ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज रेग्युलेटर ASIC अदानी ग्रुपवरील आरोपांची चौकशी करणार
Adani Group Crisis | सिडनी मॉर्निंग हेराल्डने दिलेल्या वृत्तानुसार, अदानी समूहाने ऑफशोअर टॅक्स हेवनचा चुकीच्या पद्धतीने वापर केल्याचा आरोप करणाऱ्या हिंडेनबर्ग रिसर्चच्या अहवालाची ऑस्ट्रेलियन सिक्युरिटीज अँड इन्व्हेस्टमेंट कमिशन (एएसआयसी) सखोल चौकशी करत आहे. गेल्या आठवड्यात अमेरिकेतील हिंडेनबर्ग रिसर्च या शॉर्टसेलरने अदानी समूहाविषयी धक्कादायक अहवाल प्रसिद्ध करताना कॉपोरेट जगातील सर्वात मोठा घोटाळा असा थेट उल्लेख केला होता. ज्यामध्ये अतिरिक्त कर्जाच्या पातळीचा उच्चांकाचा देखील समावेश होता, ज्यामुळे कंपनीच्या शेअरच्या मूल्यात 65 अब्ज डॉलरची घसरण झाली होती.
2 वर्षांपूर्वी