Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
सेनेत गृहकलह वाढवण्यासाठी फडणवीसांनी आदित्य यांच्या उपमुख्यमंत्री पदाबाबत भाष्य केलं? सविस्तर
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेपर्यंत पोहचत आहेत. मात्र ही यात्रा सुरु झाल्याप्पासून आदित्य ठाकरे हेच शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील अशी चर्चा आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष आता विधानसभा निवडणुकीवर लागले आहे. त्यातच मुख्यमंत्रीपदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये चढाओढ पहायला मिळत आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्रीपदासाठी पुढे केलेले पहायला मिळत आहे.
6 वर्षांपूर्वी -
अमरनाथ यात्रेच्या भाविकांना परतण्याचे आदेश; जण आशीर्वाद यात्रेवर असलेल्या आदित्य ठाकरेंचा संताप
दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरमधील अमरनाथ यात्रेला जात असलेल्या भाविकांना आणि पर्यटकांना परतण्याचे आदेश केंद्र सरकाने शुक्रवारी दिले. या निर्णयावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे. दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भाविकांना आणि पर्यटकांना अमरनाथ यात्रा सोडावी लागण्याचा घेण्यात आलेला निर्णय संतापजनक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. दरम्यान, केंद्र सरकार आणि आपले लष्कर नक्कीच दहशतवाद्यांचा खात्मा करेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
6 वर्षांपूर्वी -
खेकड्यांमुळे धरण कसे फूटू शकते? विद्यार्थ्याचा आदित्य ठाकरेंना सवाल
युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या जनआशीर्वाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारांनी शिवसेनेला मतदान केले त्यांचे आभार मानण्यासाठी आणि ज्यांनी शिवसेनेला मतदान केले नाही त्या मतदारांचे मन जिंकण्यासाठी आदित्य ठाकरेंनी आज सोलापुरातून यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात केली आहे. यावेळी वालचंद महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, ‘युवासेनाप्रमुख म्हणून तुमचे प्रश्न पुढे नेण्यासाठी मला ते ऐकणे गरजेचे आहे म्हणूनच मी युवा संवाद हा कार्यक्रम घेतला आहे, असे म्हणत, १८ ते १९ वर्षाच्या वयात मनात जे प्रश्न आहेत ते विचारायला विद्यार्थी घाबरत नाहीत’, याचे आदित्य ठाकरेंनी कौतुक केले.
6 वर्षांपूर्वी -
नॅशनल पार्क व आरे: अप्रत्यक्ष हा होईना, आदित्य ठाकरेंना ब्लूप्रिंट'मधील राज यांचा तो मुद्दा पटला असावा: सविस्तर
आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
आरे कॉलनी: आता वृक्षरोपण करण्यापेक्षा, झाडांची बेसुमार कत्तल होताना कुठे होते? स्थानिकांचा सवाल
आदित्य ठाकरे यांच्याउपस्थितीत १,१०० एकाच वेळी अकराशे रोपे लावली. या वेळी बोलताना आदित्य म्हणाले, आज मी लावलेले हे विकासाचे झाड आहे. पर्यावरणाच्या रक्षणासाठी आहे. सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्र आले पाहिजे. तसेच आमचे खत सगळीकडे चांगले आहे. आधी पावसाचे इनकमिंग होऊ दे, असेही ठाकरे म्हणाले.
6 वर्षांपूर्वी -
शरद पवारांच्या टिकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
आगामी विधानसभा निवडणूक दोन महिन्यांवर असताना शिवसेना- भारतीय जनता पक्षामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांचे पक्ष प्रवेश जोरदार सुरू आहेत. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी टीका केली होती. यावर, आमचे खत चांगलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र हिरवागार आणि भगवा होणार, असा टोला आदित्य ठाकरे यांनी शरद पवारांना लगावला.
6 वर्षांपूर्वी -
तो विद्यार्थी नाही तर शिवसैनिक; त्याला आदित्य यांच्यात छत्रपती शिवाजी महाराजांची झलक दिसली
सध्याच्या कॉर्पोरेट पद्धतीच्या राजकारणात पेड आणि मॅनेज प्रकार असणार हे साहजिकच आलं. नरेंद्र मोदींच्या बाबतीत देखील अनेक इव्हेंट’मधील घटनांना वास्तवात घडल्यासारखे दाखवून होकारात्मक हवा निर्मिती केल्याचे अनेक प्रकार पाहायला मिळाले. त्यात नरेंद्र मोदींच्या परदेशात संपन्न झालेल्या इव्हेंटमध्ये मोदींना प्रश्न विचारणारे अनेक लोक हे भाजपचे पदाधिकारी असल्याचं उघड झालं होतं.
6 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करुन देणारचं : आदित्य ठाकरे
शिवसेनेचे नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे सध्या जन आशीर्वाद यात्रेनिमित्त महाराष्ट्रभर दौरा करत आहेत. त्यांच्या पहिल्या टप्प्यातील दौऱ्यात ते नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात झालेल्या सभेत शेतकऱ्यांना आम्ही सरकट कर्जमाफी देणारच असं वक्तव्य आदित्य ठाकरे यांनी केले आहे.
6 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केल्याने आदित्य व शिवसेनेचेही नुकसान
सध्या शिवसेनेकडून युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांना राज्यभर प्रमोट करण्याचे आणि ब्रँड आदित्य सामान्यांच्या माथी मारण्याचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. त्यानिमित्त राज्यभर आदित्य ठाकरे यांच्या नावाने इव्हेंट आयोजित केले जात असून, त्यासाठी एका नामांकित खासगी कंपनीला काम देण्यात आले असून, त्यांच्या योजनेनुसारच सर्व नियोजन सुरु आहे. त्यासाठी जागोजागी आदित्य संवाद सुरु करण्यात आले असून, त्यासाठी तंत्रज्ञानाची देखील मदत घेतली जाते आहे.
6 वर्षांपूर्वी -
मोदी ब्रँड निर्मितीचे 'तेच' कॉर्पोरेट मॉडेल आदित्य ठाकरेंवर राबवलं जातं आहे; अर्थात फलदायी ठरणार: सविस्तर
मोदी ब्रँड अर्थात होकारात्मक असो किंवा नकारात्मक पण आजच्या घडीला देशातील सर्वाधिक चर्चेला जाणारा विषय आहे. मात्र ते गुजरात पुरता मर्यादित असलेलं राजकीय ब्रँड अचानक २०१४ पूर्वी पंतप्रधान पदाच्या चर्चेत कसं आणि एकदम देशावर राज्य कसं करू लागलं याचा अभ्यास केल्यास, ती एक शिस्तबद्ध आखली गेलेले योजनाच होती आणि आजच्या घडीला त्याला ‘राजकारणाचं कॉर्पोरेट मॉडेल’ म्हटलं तरी चालेलं. मात्र तत्पूर्वी भाजपने किंवा आरएसएस सारख्या संघटनांनी त्या क्षेत्रातील तज्ज्ञ नेमले आणि त्यांचे सल्ले स्वतः ऐकून ते प्रत्यक्ष अंमलात आणले असंच एकूण आहे. कारण आजच्या घडीला शिवसेना वगळता इतर कोणत्याही पक्षात तज्ज्ञांच्या मतांची किंमत शून्यच असावी असंच म्हणावं लागेल. कारण इतर पक्षात तज्ज्ञ नेमून, त्यांच्या सल्ल्याने योजना अमलात आणण्यापेक्षा तंज्ञानाच ज्ञान देण्याचे प्रकार सुरु असावेत, मात्र आज शिवसेना त्याला अपवाद ठरली आहे असंच म्हणावं लागेल.
6 वर्षांपूर्वी -
तक्रारी होत्या खरीप विमा कंपनीच्या; उद्धव ठाकरेंचा मोर्चा 'रब्बी' विमा कंपनीवर
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होणार होती म्हणून केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
तेव्हा 'वाघ झोपला होता'; नेटिझन्सकडून सेनेच्या निवडणूकपूर्व 'इशारा मोर्चाची' खिल्ली
मागील ५ वर्षात कित्येक शेतकऱ्यांचे मोर्चे कोसो दुरून पायी चालत आले आणि मंत्रालयावर तसेच मुंबईमध्ये धडकले. तेव्हा मुंबईत असून देखील उद्धव ठाकरे यांनी स्वतः सत्तेत असून देखील त्यांची प्रत्यक्ष भेट न घेता पक्षातील प्रतिनिधी धाडले होते. मात्र आदित्य संवाद सुरु झाल्यापासून आणि आदित्य ठाकरे यांच्या ‘जण आशीर्वाद’ यात्रेला जळगावातून सुरुवात होत असल्याने केवळ वातावरण निर्मिती म्हणून पीकविमा कंपन्यांकडून राज्यातील शेतकऱ्यांची अडवणूक केली जात असल्याचा आरोप शिवसेनेकडून उद्धव ठाकरे स्वतः मैदानात उतरणार आहेत.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडे 'जन आशीर्वाद' यात्रेसाठी वेळ; पण तिवरे धरणातील बाधितांना भेटण्यास वेळ नाही?
चिपळूण येथील तिवरे धरण २ दिवसांपूर्वी रात्री ९ च्या सुमारास फुटलं. त्या दुर्घटनेत एका वाडीतील तब्बल २४ जण वाहून गेले. दरम्यान आतापर्यंत १८ जणांचे मृतदेह शोधपथकाच्या हाती लागले असून नशिबाने एकजण जिवंत आढळला आहे. मात्र अनेकांचा अजून थांगपत्ता लागलेला नाही. धरण फुटल्यामुळे एकूण १३ घरं वाहून गेल्यानं अनेक कुटुंबाची मोठी आर्थिक हानी देखील झाली आहे. धरण दुरुस्तीचा प्रस्ताव केवळ लालफितीत अडकला नसता, तर हा अनुचित प्रकार टाळता आला असता. तसेच, धरणाला पडलेल्या भगदाडीच्या तक्रारीची दखल प्रशासनाने घेतली असती, तर आज १८ गावकऱ्यांचा जीव वाचला असता. मात्र सत्तेत विराजमान असून आणि स्वतःला कोकणचे कैवारी समजणारे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे येथे फिरकलेच नाहीत.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंची 'जन आशीर्वाद' यात्रा फडणवीसांना शहं देण्यासाठीच, भाजपात चर्चा रंगली
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आदित्य ठाकरे यांना शिवसेनेकडून थेट सत्तेत महत्वाच्या पदावर विराजमान करण्याच्या हालचाली जोरदारपणे सुरु असल्याची चर्चा रंगली आहे. त्याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच शहं देण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार असल्याचे वृत्त आहे. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून ‘जन आशीर्वाद यात्रे’ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार असून एकप्रकारे आदित्य ठाकरे यांना थेट मंत्रालयात सत्तेत विराजमान करण्याच्या योजना शिवसेनेने आखल्या आहेत.
6 वर्षांपूर्वी -
विधानसभेत फडणवीसांना शह? लवकरच आदित्य ठाकरे यांचा 'जन आशीर्वाद' दौरा
शिवसेनेचं सध्या आदित्य ठाकरे अभियान जोरदारपणे सुरु आहे. प्रशांत किशोर यांच्या लोकसभा निवडणुकांपूर्वीच्या मातोश्री भेटीनंतर या सर्व घटनांना अधिक गती आल्याचं पाहायला मिळालं. एकूणच आदित्य ठाकरे प्रत्यक्ष राजकारणात आणण्यासाठी शिवसेनेत मोठी योजना सुरु असून भाजपकडे कानाडोळा करून आणि त्यांच्यावर जास्त विश्वास न ठेवता ‘आदित्य अभियान’ सुरु आहे. प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानेच आदित्य संवाद सारखे इव्हेंट आयोजित करण्यात आले होते असं राजकीय जाणकार सांगतात. विधानसभेच्या अनुषंगाने शिवसेनेतील सर्व वरिष्ठ नेत्यांना डावलून आदित्य ठाकरे यांनाच सर्वोच्च स्थानी विराजमान करण्याचा मातोश्रीने जणू चंगच बांधला असल्याचं समजतं.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई: माहिम कॉजवेवरील ३ पात्र मराठी कुटुंबांना शिवसेनाप्रणित महापालिकेने केले बेघर
वांद्रे येथील चमडावाडी नाल्यातील बाधित बेहरामपाड्यातील अपात्र कुटुंबांचेही माहुलमध्ये तात्पुरती पुनर्वसन करून झोपड्यांवर कारवाई करणार्या महापालिकेने माहिम कॉजवे येथील ३ पात्र बांधकामांवर शुक्रवारी कारवाई केली आहे. परंतु सदर कारवाई करताना या पात्र मराठी कुटुंबांचे कोणतेही पुनर्वसन न करता उलट त्यांना बेघर करण्यात आल्याचं समजतं. विशेष म्हणजे ही कारवाई जी- उत्तर विभागाऐवजी चक्क त्यांच्या हद्दीत शिरुन एच-पश्चिम येथील वांद्र्यातील महापालिकेच्या अधिकार्यांनी केल्याचं वृत्त आहे. मुंबई महापालिकेला उघडे पाडणारा हा प्रताप वांद्र्यातील अधिकार्यांनी केला आहे.
6 वर्षांपूर्वी -
प्लास्टिक कचरा येतो, पण समुद्रकिनारी डंपरने 'डंप' केल्यासारखा चिखल आलाच कुठून?
एका बाजूला दादर-माहीम चौपाटीवरचा रोजचा कचरा उचलण्यासाठी प्रशासनाला २०१८ मध्येच लघुनिविदा काढण्याची वेळ आली होती. समुद्रात टाकलेला कचरा भरतीच्या लाटांमधून पुन्हा किनारपट्टीवर येत असल्याने किनारे स्वच्छ ठेवण्यासाठी पालिकेला वर्षभरात कोटय़वधी रुपये खर्च करावे लागतात. माहीम-दादरचा पाच किलोमीटरचा किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी महापालिकेने निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी सर्वात कमी बोली लावणाऱया मे. विशाल प्रोटेक्शन फोर्स यांना पुढील सहा वर्षांसाठी तब्बल १२ कोटी रुपयांचे कंत्राट देण्यात येणार होते. या कंत्राटानुसार किनारा स्वच्छ ठेवण्यासाठी पावसाळय़ात दर दिवसाला ६५ हजार रुपये तर पावसाळय़ानंतरच्या दिवसांत दरदिवशी ३५ हजार रुपये देण्यात येणार होते. दरवर्षी त्यात पाच टक्क्यांनी वाढ करण्यात येणार होती.
6 वर्षांपूर्वी -
आदित्य ठाकरेंकडून महापालिकेच्या भोंगळ कारभारावर पांघरून घालण्याचा प्रयत्न
मुंबईची तुंबापुरी झाल्यानंतर अखेर आज आदित्य ठाकरे प्रसार माध्यमांच्या समोर प्रकट झाले आणि उणिवा स्वीकारण्यापेक्षा त्यांनी पालिकेच्या कामचुकार कारभाराची पाठराखण केल्याचे पाहायला मिळाले. मागील २ दिवसाच्या पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पावसाला सुरवात होताच हालपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. अशातच युवसेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महापालिकेची पाठराखण केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
वरिष्ठांना वेटिंग लिस्टवर ठेवून 'आदित्य महाराष्ट्र तुझी वाट पाहत आहे' अभियान सुरु
देशभरात लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले आणि भाजप सरकार बहुमताने सत्तेत विराजमान झाले. मोदी त्सुनामीत शिवसेनेची सुद्धा लॉटरी लागली, मात्र भाजप बहुमताने सत्तेत विराजमान झाल्याने शिवसेनेची बार्गेनिंग पावर जवळपास संपुष्टात आली आहे. त्यामुळे केंद्रात भविष्यात देखील काहीच हाताला लागणार नाही याचा पक्ष नैतृत्वाला मनातून का होईना साक्षात्कार झाला असणार.
6 वर्षांपूर्वी -
मैत्री करताना आपण लिंगाचा विचार करत नाही: दिशा पटानी
बॉलिवूडमधील कलाकरांना जितकी प्रसिद्धी मिळते तितकंच त्यांना समाज माध्यमांवरील ट्रोलिंगला देखील मोठ्या प्रमाणावर सामोरं जावं लागतं. नुकतंच अभिनेत्री दिशा पटानीला युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरेंसोबत पाहण्यात आले होते. दरम्यान या गोष्टीमुळे दिशाला समाज माध्यमांवर भयंकर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. या ट्रोलिंगमध्ये मुख्यतः बॉलिवूड कलाकार टायगर श्रॉफचा उल्लेख होता. ‘एक था टायगर’पासून ते ‘टायगर जिंदा है’ अशा अनेक कंमेंट्स नेटकाऱ्यांनी केल्या आणि दिशा पटानीला हैराण करून सोडले होते. या सगळ्या ट्रोलिंगला दिशाने देखील प्रतिउत्तर दिलं आहे.
6 वर्षांपूर्वी