Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी कुठं गेले ? अजित पवार
महाराष्ट्रावर सध्या दुष्काळाच भयंकर संकट ओढवलं असून त्याला अनुसरून आज एनसीपी पक्षाचे विधिमंडळ पक्षनेते अजित पवार, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. दरम्यान, जर आज राज्यावर दुष्काळ ओढवला असेल तर जलयुक्त शिवार योजनेचे ७,५०० कोटी नेमके गेले कुठं? असा प्रश्न पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
7 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही, पहिल्यांदा अापल्या वडीलांचं स्मारक बांधावं
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर राम मंदिरावरून बोचरी टीका केली आहे. मुंबईची सत्ता शिवसेनेच्या हातात असताना अनेक वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांचे स्मारक उभारता अाले नाही. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुखांनी पहिल्यांदा अापल्या जन्मदात्या वडीलांचं स्मारक बांधावं. त्यानंतर जनतेला त्यांच्याबद्दल खात्री पटेल. लाेकांना राम मंदिराच्या नावाने भावनिक आवाहन करून राजकरण करण्याचा खेळ सुरु आहे असं अजित पवार म्हणाले. शिवसेना पक्ष प्रमुखांमध्ये जर धमक असेल तर त्यांनी अयाेध्येला राम मंदिर बांधण्याची तारीख जाहीर करावी, असे खुलं अाव्हानच अजित पवारांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
7 वर्षांपूर्वी -
जो संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काय काम नसते, मग महागाई काय समजणार?
जो स्वतः संसार करत नाही, मग अशा माणसाला महागाई काय समजणार अशी बोचरी टीका माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली आहे. देशात प्रचंड महागाई वाढली आहे आणि जो स्वतः संसार करत नाही त्याला घरी गेल्यावर काही काम नसते असं अजित पवार म्हणाले आणि उपस्थितांना हसू आवारता आलं नाही.
7 वर्षांपूर्वी -
पवारांची तिसरी पिढी राजकारणात? पार्थ अजित पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार?
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच पक्ष जोमाने तयारीला लागले आहेत. दरम्यान, आगामी निवडणुकीत अनेक राजकीय दिग्गज त्यांची पुढची पिढी राजकारणाच्या आखाड्यात उतरविण्याची शक्यता आहे. त्यात ठाकरे कुटुंब आणि पवार कुटुंब म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील अविभाज्य घटक हे सर्वश्रुत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे याआधीच सक्रिय राजकारणात आहेत, तर राज ठाकरेंचे चिरंजीव अमित ठाकरे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पक्षाच्या जाहीर कार्यक्रमात मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
वॉटर कप; राज ठाकरेंनी मांडलेलं सिंचन क्षेत्रातील वास्तव उपस्थितांना रुचलं, पण अजित पवारांना का झोंबल?
काल पुण्यामध्ये पाणी फाऊंडेशनच्या ‘सत्यमेव जयते वॉटर कप’ स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा मोठ्या थाटात पार पडला. या कार्यक्रमाला राज्यातील अनेक मान्यवर नेत्यांनी उपस्थिती लावली होती. मात्र चर्चा रंगली ती मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्याच्या सिंचन क्षेत्रातील मांडलेल वास्तव, जे अजित पवारांना झोंबल्याचे पाहायला मिळालं.
7 वर्षांपूर्वी -
VIDEO; माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांची बारामतीत घोषणाबाजी..एक मराठा..लाख मराठा
बारामतीतील `गोविंदबाग`या शरद पवारांच्या बंगल्यासमोर आज मराठा आंदोलकांनी आरक्षणासाठी ठिय्या धरला. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादीचे नेते तसेच माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आंदोलनकर्त्यांमध्ये सामील झाले. त्यांनी थेट ‘एक मराठा…लाख मराठा’ अशा घोषणा देत मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला.
7 वर्षांपूर्वी -
मराठा आरक्षण - सद्भावना यात्रा २०१६ मेटे व अजित पवार
मराठा आरक्षण – सद्भावना यात्रा २०१६ मेटे व अजित पवार
7 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचे मंत्री व आमदार सध्या संभ्रामवस्थेत असून काय करावं हे त्यांना सुचत नाही: अजित पवार
मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यर्त्यांसाठी मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आलं असता उपस्थितांना संबोधित करताना माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजप आणि शिवसेनेचा चांगलाच समाचार घेतला. तसेच लोकसभेत अविश्वास प्रस्तावावेळी रंगलेल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा त्यांनी नेमकं बोट ठेवलं.
7 वर्षांपूर्वी -
हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अजित पवारांची बापटांवर टीका
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट आणि मंत्र्यांवर सडकून टीका केली. हे असले मंत्री या वयात काय बोलावे ते कळत नाही अशा आमदाराला येथून निवडून दिले आहे. हे मंत्री दुपारचे झोपा काढतात, अशी अप्रत्यक्ष बोचरी टीका अजित पवार यांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्यावर कसबा विधानसभा मतदारसंघातीळ राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केली.
7 वर्षांपूर्वी -
अजित पवार म्हणजे शिवरायांचा अपमान करणाऱ्या छिंदमची अवलाद : शिवसेना
शिवसेनेला गांडूळाची उपमा देणाऱ्या अजित पवारांवर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी राजीनामा द्यावा : अजित पवार
महाराष्ट्र राज्याचे मंत्री आणि बेळगांव प्रश्नि ते महाराष्ट्रचे समन्वय मंत्री असून सुध्दा बेळगाव मध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गाण्याचा प्रकार चंद्रकांत पाटलांनी केल्यामुळे त्यांनी आता राजीनामा द्यावा अशी मागणी केली आणि चंद्रकांत पाटलांचा निषेध ही नोंदविला.
7 वर्षांपूर्वी -
तर मी पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही: अजित पवार
महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस ची सत्ता आल्यास मी अजित पवार तुम्हाला वचन देतो की माझ्या राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप देईन आणि तसं नाही करू शकलो तर पवारांची औलाद म्हणून सांगणार नाही.
7 वर्षांपूर्वी