Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व रुग्णालयांचे तात्काळ ऑडीट करण्याचे निर्देश
भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या इमारतीचं फायर ऑडिट झालं नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 नवजात बाळांच्या झालेल्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल आता विचारला जात आहे. दरम्यान भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयात 10 बाळांचा जीव गेल्यानंतर सरकार जागं झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, आता राज्यातील सर्व रुग्णालयांचं ऑडिट करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत | उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
नामांतराशिवाय राज्यात इतरही प्रश्न आहेत, असं पुन्हा एकदा ठणकावून सांगताना लसीकरण, कोरोना याविषयी काम करणं गरजेचं असल्याचं मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलं. ते पुण्यात बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
मी कोरोना काळात पोलिसांनी दिलेल्या सेवेला सलाम करतो - उपमुख्यमंत्री
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते पोलिसांना स्मार्ट वॉच आणि स्पोर्ट्स सायकल वाटप करण्यात आलं. त्याचसोबत अजित पवार यांच्या हस्ते ग्राम रक्षक दलाचाही शुभारंभ झाला. पोलिसांचा वचक हा सामान्य नागरिकांवर नव्हे, तर गुन्हेगारांवर असायला हवा. सामान्य नागरिकांना पोलिसांकडे मदत मागायला येताना भीती वाटता कामा नये, असं अजित पवार यांनी बोलताना सांगितलं.
4 वर्षांपूर्वी -
मुंबई महापालिका निवडणुक | उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भूमिका स्पष्ट केली
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेनेदेखील बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी तयारी केली आहे. यामुळे महाविकास आघाडी मुंबई महापालिका एकत्रित लढणार की स्वबळावर अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
4 वर्षांपूर्वी -
फडणवीस पुन्हा येईन म्हणत होते | चंद्रकांत पाटील म्हणतात मी परत जाईन - उपमुख्यमंत्री
भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण पुन्हा कोल्हापूरला जाणार असल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टोला लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजप सोडून परत या | तिन्ही पक्ष मिळून तुम्हाला पुन्हा निवडून आणू - उपमुख्यमंत्री
मागील चार महिन्यात आपल्याकडचे किती आमदार राजीनामे देऊन आमच्याकडे येतील, हे तुम्हाला कळणारही नाही, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी विधानसभेत केला. यानंतर अनेक राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. मला त्यांना सांगणं आहे की आमच्याकडून तुमच्याकडे गेलेत ते कधी राजीनामा देतील आणि आमच्याकडे येऊन निवडून येतील ते सांगता येत नाही, त्यांच्यावर लक्ष ठेवा,’ असा टोला अजित पवारांनी काल भारतीय जनता पक्षाला लगावला होता.
4 वर्षांपूर्वी -
लक्ष ठेवा | भाजपकडे गेलेले आमचे कधी राजीनामा देतील | आणि आमच्याकडून निवडून येतील
विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, विधानसभेच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी केंद्र सरकारने 30 हजार 537 कोटी अजून दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. सरकार आणि जनता मिळून कोरोनात चांगलं काम करतंय. सरकार कोविडमध्ये हतबल असल्याचा आरोप केला जातोय. सुरुवातीला केंद्र सरकारने सर्व गोष्टी पुरवल्या होत्या. नंतर मात्र प्रत्येक राज्याने हा खर्च करावा, असं सांगितलं. संकट मोठं होतं, उत्पन्न कमी झालं होतं.
4 वर्षांपूर्वी -
पोटाला चिमटा बसल्यावरच शेतकरी रागानं रस्त्यावर येतो - उपमुख्यमंत्री
मागील काही दिवस शेतकरी मोदी सरकारच्या कृषी कायद्याविरोधात जोरदार आंदलोन करत आहेत. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि गृहमंत्री अमित शहा (Union Home Minister Amit Sha and Farmers Leaders meeting on Farm Bills) यांच्यात सुरू असलेली बैठक देखील कोणत्याही तोडग्याविना संपल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला होता. मात्र केंद्र सरकार या कायद्यात सुधारणांबाबत शेतकऱ्यांना काल (९ डिसेंबर) लेखी प्रस्ताव मिळाला.
4 वर्षांपूर्वी -
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण | ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. या आधी त्यांना लागण झाल्याची माहिती येत होती. मात्र, तेव्हा त्यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आल्याची माहिती त्यांचे पुत्र पार्थ पवार यांनी दिली होती. ”माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे. राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचे काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्याश्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत असेन,”,अशी माहिती स्वतः अजित पवार यांनी दिली आहे.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह | खबरदारी म्हणून होम क्वारंटाईन
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी नुकताच भाजपला रामराम केला,ते उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील.यादरम्यान मात्र अजित पवार दिसेनासे झाल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कोरोनाची लक्षण जाणवू लागल्याचे त्यांनी क्वारंटाईन होण्याचा निर्णय होण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, अजित पवारांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. अजित पवार हे कोरोनाच्या परिस्थितीत सर्वात जास्त खबरदारी घेताना दिसले आहेत.कोरोना सृश्य लक्ष्मण जाणवल्याने अजित पवार यांनी सार्वाजनिक कार्यक्रम रद्द केले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मोदी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे देशाचा कारभार चालवतात | मग टीका मुख्यमंत्र्यांवरचं का? - उपमुख्यमंत्री
“मागील४-५ दिवसांत पडलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात झाले आहे. घरांची पडझड झाली आहे. नुकसानभरपाईपासून एकही नुकसानग्रस्त वंचित राहणार नाही याची दक्षता घेऊन वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल सादर करावा”, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. अजित पवारांनी आज (१७ ऑक्टोबर) अतिवृष्टीमुळे पंढरपूर तालुक्यात नुकसान झालेल्या पिकांची व चंद्रभागा नदीवरील येथील कुंभारघाट येथे भेट देवून पाहणी केली. कुंभारघाटावरील संरक्षित भिंत कोसळल्यामुळे सहा जण मरण पावलेल्या कुंटुबियांच्या नातेवाईकांची भेट उपमुख्यमंत्र्यांनी घेतली.
5 वर्षांपूर्वी -
पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर…
महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार टोला लगावला. पुण्यामध्ये आयोजित एका पक्षांतर्गत कार्यक्रमावेळी बोलताना पाटील यांनी, “पुणे महापालिकेतील सत्तेबाबत अजित पवारांना जर काही स्वप्न पडत असतील तर यासंदर्भात ऊर्जा वायाला घालवू नका आम्ही पण तुमचे बाप आहोत,” अशा शब्दांमध्ये पवार यांना टोला लगावला.
5 वर्षांपूर्वी -
अजित पवारांना मोठा दिलासा | राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी क्लीन चीट
महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कथित घोटाळ्याप्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट मिळली आहे. मुंबई पोलिसांकडून सत्र न्यायालयात आज क्लोजर रिपोर्ट दाखल करण्यात आला.
5 वर्षांपूर्वी -
मोठी जवाबदारी | सारथीसह मराठा समाजाशी संबंधित योजनांचा कारभार अखेर उपमुख्यमंत्र्यांकडे
राज्य सरकारने आज जीआर जारी करत सारथी संस्थेसह मराठा समाजाच्या योजना राबवण्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडील नियोजन विभागाकडे वर्ग केली आहे. सारथी संस्था आणि मराठा समाजाशी संबंधित योजनांची जबाबदारी काँग्रेसचे मंत्री विजय वड्डेटीवार यांच्या बहुजन कल्याण विभागाकडे होती. मात्र ओबीसी समाजाचे असलेले विजय वड्डेटीवार मराठा समाजाला न्याय देत नसल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून होत होता. या आरोपांनी व्यथित झालेल्या वड्डेटीवार यांनी सारथीची जबाबदारी अजित पवारांनी स्वीकारावी अशी त्यांना विनंती केली होती.
5 वर्षांपूर्वी -
पुण्यात ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता | त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे - उपमुख्यमंत्री
राज्यातील काही भागात पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन सिलिंडर मिळत नाहीत. त्याची संख्या कमी आहे हे खरे आहे. परंतू, येत्या काही काळात राज्यातील ऑक्सिजन सिलिंडरचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. राज्याती नागरिकांनीही स्वत:च्या आरोग्याची योग्य पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. आवश्यकता भासल्यास कोरोना व्हायरस चाचणी करुन घेतली पाहिजे. मास्क, सॅनिटायझर वापरायला हवे, असे अवाहनही अजित पवार यांनी केले आहे. कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची वाढती संख्या विचारात घेता अजित पवार यांनी पुण्यातील परिस्थितीचा आढावा घेतला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
5 वर्षांपूर्वी -
मी आणि देवेंद्र फडणवीस एकत्र येणार ही ब्रेकिंग न्यूज झाली- अजित पवार
“आज देवेंद्र फडणवीस आणि मी या कार्यक्रमाला एकत्र आलो आहोत. आम्ही नुसतं कार्यक्रमाला एकत्र येणार असं समजल्यावर कालपासूनच ब्रेकिंग न्यूज सुरू झाली. कदाचित चंद्रकांत पाटीलही या ठिकाणी येणार आहेत याची कदाचित त्यांना कल्पना नव्हती म्हणून त्यांचं नाव आलं नाही. नाहीतर त्यांचंही नाव सोबत आलं असतं,” असं पवार म्हणाले. “राजकीय भूमिका, राजकीय मतं वेगवेगळी असू शकतात. निवडणुका झाल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधीपक्षाचा असा भेदभाव, आरोपप्रत्यारोप न करता संकटाच्या काळात एकत्र काम करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसंच वागलं पाहिजे. सत्ताधारी आणि विरोधक मिळून एकत्र या संकटाचा सामना केला पाहिजे,” असंही त्यांनी नमूद केलं.
5 वर्षांपूर्वी -
GST थकबाकी अशीच वाढत गेल्यास २ वर्षात ती एक लाख कोटींवर जाईल - अजित पवार
वस्तू आणि सेवा कर काऊन्सिंलची ४१ वी बैठक आज होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून ही बैठक पार पडेल. केंद्रीय वित्त राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांच्याशिवाय राज्य व केंद्रशासित प्रदेशांचे वित्तमंत्री आणि केंद्र सरकार व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित असतील. अशी माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. दरम्यान कोरोना व्हायरस संकटामुळे सर्वच राज्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यात जीएसटीची भरपाई कशी करता येईल, हा बैठकीतील सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असू शकतो.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO - तुमच्या राज्यात विनापरवानगी आलो | राज्यपालांची अजित पवारांना कोपरखळी
स्वातंत्र्य दिनानिमित्ताने पुण्यात शासकीय ध्वजारोहण सोहळा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थितीत होते. अजित पवार जेव्हा राज्यपालांचं स्वागत करण्यास पोहोचले होते, तेव्हा राज्यपालांनी आपल्या शैलीत चांगलीच कोपरखळी अजितदादांना लगावली.
5 वर्षांपूर्वी -
एका ट्विटमध्ये मी चुकून श्रीकृष्णाचा पार्थ असा उल्लेख केला | पण मी ती चूक सुधारली
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. एका अभिनेत्याने आत्महत्या केली हे दुर्दैवी आहे. हे व्हायला नको होतं. पण ज्या पद्धतीने मीडियात चर्चा होत आहे त्याचं आश्चर्य वाटत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं होतं. यशवंतराव चव्हाण सेंटर येथे शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांची बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली होती.
5 वर्षांपूर्वी -
पार्थ पवारांवर प्रतिक्रिया | उपमुख्यमंत्री अजित पवार तडकाफडकी शरद पवारांच्या भेटीला
पार्थ पवार यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत सुशांतच्या मृत्यू प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली होती. परिणामी शरद पवार यांना यासंबंधी विचारण्यात आलं असता त्यांनी सांगितलं की, “नातवाच्या बोलण्याला कवडीचीही किंमत देत नाही. ते अपरिपक्व आहेत” अशी प्रतिक्रिया देऊन पार्थ पवारांना राजकीय प्रवासात संपूर्ण आयुष्यभर ऐकावं लागेल असं वक्तव्य केलं असल्याचं म्हटलं आहे.
5 वर्षांपूर्वी