Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
इनकमिंग सुरूच | अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेश
सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत.
5 वर्षांपूर्वी -
अरे कशाचा दाऊद..दाऊद करत बसलास | अजित पवारांची पत्रकाराला खोचक प्रतिक्रिया
कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राहिम सध्या पाकिस्तानमधील कराची शहरात असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे त्याला कोणत्याही परिस्थितीत भारतात आणा, अशी विनंती राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. रोहित पवार यांनी ट्विटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करुन ही मागणी केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
असलेलं नीट सांभाळता येत नाही आणि निघालेत स्मार्ट सिटी करायला - अजित पवार
सध्या मुसळधार पाऊसामुळे मुंबईची तुंबई झाल्याचे सर्वत्र पाहायला मिळत आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळे मालाडमध्ये भिंत कोसळून दुर्घटना झाली आणि या दुर्घटनेवरून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिवसेना – भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधत महापौरांना तुंबलेली मुंबई दिसत नाही तसेच हा सत्तेचा माज आणि सरकारचा बेजबाबदारपणा आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.
6 वर्षांपूर्वी -
सुजयला निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो - अजित पवार
काल पुण्यामध्ये बोलताना अजित पवार यांनी सुजय विखे पाटलांवर सनसनाटी आरोप केला. सुजय विखे पाटील यांना राष्ट्रवादीचे तिकीट देऊन निवडून आणण्याची जबाबदारी मी स्वतः स्विकारायला तयार होतो, परंतु सुजय विखे यांनीच या प्रस्तावाला नकार दिला. सुजयला आता माझ्या समोर आणा, हे जर खोटं असेल तर म्हणाल ते करायची माझी तयारी आहे.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
राष्ट्रवादीच्या बैठकी नंतर अजित पवार यांची पत्रकार परिषद
6 वर्षांपूर्वी