Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
काही महिन्यांपासून अनेक राज्य भाजप मुक्तीच्या दिशेने सुसाट: सविस्तर वृत्त
दिल्लीकर मतदारांनी भारतीय जनता पक्षाचा ध्रुवीकरणाचा प्रयत्न फोल ठरवत आम आदमी पक्षाच्या (आप) विकासाच्या धोरणाला एकतर्फी कौल दिला. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला भरघोस मते देणाऱ्या दिल्लीने विधानसभेत मात्र सलग तिसऱ्यांदा ‘आप’ला निवडून दिले. ‘आप’च्या या लाटेत भारतीय जनता पक्षाचा धुव्वा उडाला तर काँग्रेसच्या हाती पुन्हा एकदा भोपळा आला आहे.
5 वर्षांपूर्वी -
अमित शहा! करंट लगा क्या?...दिल्लीत आप कार्यकर्त्यांनी पोस्टर्स झळकावले
दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपला धक्का देत अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत विजयाची हॅट्रिक करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. आतापर्यंतच्या कलानुसार दिल्लीतील विधानसभेच्या ७० जागांपैकी आम आदमी पार्टी ५८ आणि भारतीय जनता पक्ष १२ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही.
5 वर्षांपूर्वी -
दिल्ली निवडणुका: भाजपा पिछाडीवर तरी २०१५'च्या तुलनेत मतांच्या टक्केवारीत वाढ
दिल्ली भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात लावलेल्या पोस्टरवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा फोटो दिसत आहे. यासोबतच पोस्टरवर, विजयामुळे आम्हाला गर्विष्ठ होत नाही आणि पराभवामुळे आम्ही निराश होत नाही असा संदेश लिहिण्यात आलेला आहे. मतमोजणीआधी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून, दिल्लीमध्ये सरकार बनेल असा विश्वास व्यक्त केला जात होता. मनोज तिवारी यांनी भारतीय जनता पक्षाला ५५ जागा मिळतील असं म्हटलं होतं. पण मतमोजणीला सुरूवात होताच आपने स्पष्ट आघाडी घेतल्याचं समोर आल्यानंतर भारतीय जनता पक्षाकडून हे पोस्टर लावण्यात आलं आहे. यामुळे एकप्रकारे भारतीय जनता पक्षाने पराभव स्वीकारण्याची तयारी केल्याचं म्हटलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
देशभरात NRC लागू करण्यावरून मोदी सरकारची पलटी? केंद्रीय गृहमंत्रालयाची महत्वाची माहिती
केंद्र सरकारच्या विचाराधीन असलेल्या एनआरसी कायद्याविरोधात सध्या देशातील बहुतांश भागात तीव्र आंदोलने सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात एनआरसी लागू करण्याबाबत गृहमंत्रालयाने लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण देशात एनआरसी लागू करण्याचा निर्णय आतापर्यंत झालेला नाही, अशी माहिती गृहमंत्रालयाने आज लोकसभेत दिली.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवालांच्या विकास कामांपुढे भाजप हतबल; देशाच्या गृहमंत्र्याचा चक्क पॅम्प्लेट वाटपात सहभाग
अवघ्या काही दिवसांवर आलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीला भाजपने आता हिंदू-मुस्लीम आणि भारत-पाकिस्तान असाच रंग देण्याची पुरेपूर योजना आखली आहे. दिल्लीतील शाहीन बागेत सीएए, एनआरसीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाच्या आडून भारतीय जनता पक्षाने संपूर्ण निवडणूक हिंदू-मुस्लिम आणि पाकिस्तान अशी रंगवली आहे. अगदी उदाहरण द्यायचे झाल्यास केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी मागच्या सोमवारी आपल्या प्रचारसभेत भाजप समर्थकांना ‘गोली मारो’च्या घोषणा द्यायला उद्युक्त केल्यानंतर, दुसऱ्याच दिवशी दिल्लीचे लोकसभेतील खासदार प्रवेश वर्मा यांनीही दिल्लीत भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यास आपल्या मतदारसंघातील सरकारी जमिनींवरील सर्व मशिदी हटविण्याची घोषणा केली. त्यात स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनवेळा युद्धात पराभूत झालेल्या पाकिस्तानला हरवायला ३ दिवसही लागणार नाहीत, अशी ग्वाही एनसीसीच्या विद्यार्थ्यांना संबोधित करताना दिली, ज्याचा उल्लेख करण्याची वास्तविक कोणतीही गरज नव्हती.
5 वर्षांपूर्वी -
गृहमंत्रालयाच्या उत्तराने गृहमंत्री तोंडघशी; 'तुकडे-तुकडे गँगची माहिती नाही' असं RTI'ला उत्तर
देशात ‘टुकडे-टुकडे गँग’ सक्रिय असल्याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाकडे कोणतीही माहिती उपलब्ध नाही, असे उत्तर माजी पत्रकार व कार्यकर्ते साकेत गोखले यांनी माहिती अधिकारांतर्गत विचारलेल्या प्रश्नावर गृह मंत्रालयाने दिले आहे. ‘टुकडे-टुकडे गँग’ देशातील अशांततेला जबाबदार आहे, असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. या अनुशंगानेच गोखले यांनी अशा गँगबाबत माहिती मागितली होती.
5 वर्षांपूर्वी -
VIDEO: हे कसले पॉलिटिकल किडे? मोदी छत्रपती शिवाजी महाराज तर अमित शहा तानाजी
आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराची जोरदार तयारी सुरु केली आहे. परंतु दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरुन तानाजी चित्रपटातील दृष्यांना मॉर्फिंग करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तसेच तानाजी मालुसरे यांच्या चेहऱ्यांवर गृहमंत्री अमित शहा यांचा चेहरा लावण्यात आल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यात वर्तविण्यात येत आहे.
5 वर्षांपूर्वी -
जे.पी. नड्डा भाजपाचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष
भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदी जे. पी. नड्डा यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी राधामोहन सिंह यांनी जे. पी. नड्डा यांच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षासाठी आज दुपारी १२.३० पर्यंत अर्ज दाखल करण्याची वेळ होती. यावेळी जे. पी. नड्डा यांच्याशिवाय अन्य कोणत्याही नेत्याने अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे जे. पी. नड्डा यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
भारतावर जेवढा आपला अधिकार तेवढाच पाकिस्तानातून आलेल्या शरणार्थींचाही: अमित शहा
जेएनयूमधील आंदोलनाच्या मुद्द्यावरून भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज, रविवारी जबलपूरमधील सभेत काँग्रेस नेते राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. जेएनयूमध्ये देशविरोधी घोषणा देणाऱ्यांना तुरुंगात टाकण्यात येईल, असा इशारा शहा यांनी दिला.
5 वर्षांपूर्वी -
सर्वेक्षण: केजरीवाल सरकारच्या विकासकामांमुळे मोदी-शहांच्या भाजपचा सुपडा साफ होणार
बहुचर्चित दिल्ली विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी आम आदमी पक्ष मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा सत्ता मिळविणार हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील ७० जागांपैकी ५९ जागांवर आम आदमी पक्षाचा विजय होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारी आणि खाजगी क्षेत्रातील २५ कोटी कामगारांचा उद्या मोदी सरकारविरोधात संप
मोदी सरकारच्या कामगारविरोधी आणि जनतेच्या इच्छेविरोधी धोरणांच्या विरोधात ८ जानेवारी रोजी देशभरातील कामगार संघटनांच्या संयुक्त कृती समितीने देशव्यापी संप आणि आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनामध्ये २५ कोटी भारतीय सहभागी होतील असं समितीने सोमवारी स्पष्ट केलं आहे. विशेष म्हणजे या संपामध्ये शिवसेनेची भारतीय कामगार सेना देखील सहभागी होणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
भाजपच्या १०० स्मार्ट सिटी शोधून सापडेना अन शहा दिल्लीत फुकट वायफाय'च्या शोधात
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ८ फेब्रुवारी रोजी दिल्लीत मतदान पार पडणार असून ११ फेब्रुवारी रोजी मतमोजणी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. आजपासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणाही निवडणूक आयोगाने यावेळी केली. दिल्लीत एक कोटी ४६ लाख मतदार आहेत. दरम्यान निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याआधीच दिल्लीत मात्र राजकीय वातावरणं चांगलंच तापलं आहे. सोबतच दोन मुद्द्यांवर गूढ कायम आहे. एक म्हणजे या निवडणुकीत भाजपाचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असणार आहे ? आणि दुसरं म्हणजे सुधारित नागरिक्तव कायद्याचा निवडणुकीत काय परिणाम होईल?.
5 वर्षांपूर्वी -
JNU हल्ला: मोदी आधुनिक हिटलर तर शाह तडीपार’; पुण्यात विद्यार्थ्यांची पोस्टरबाजी
जेएनयूमधील हिंसाचाराच्या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील गरवारे कॉलेजबाहेर विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आधुनिक हिटलर असल्याचे पोस्टर्सही आंदोलकांनी हाती घेतले होते. यावेळी आंदोलक विद्यार्थ्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा उल्लेख ‘तडीपार’ असा केलेले फोटो हाती पकडले होते. सुरक्षित शिक्षण हा आमचा अधिकार असल्याचे पोस्टर्स विद्यार्थ्यांनी दाखवले. या आंदोलनात विद्यार्थ्यांबरोबरच विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या हे विशेष.
5 वर्षांपूर्वी -
महाराष्ट्र आणि झारखंडच्या दाव्यानंतर शहांचा दिल्लीत व बंगालमध्ये सत्ता येण्याचा दावा
महाराष्ट्रात आणि झारखंडमध्ये अतिआत्मविश्वास नडल्यानंतर देखील अमित शहांचा शतप्रतिशतचे दावे अजून कमी होताना दिसत नाहीत. महाराष्ट्रात देखील एकटी भाजप १५० चा आकडा पार करून युती २२० पेक्षा अधिक जागा जिंकेल असे छातीठोकपणे सांगत होते. तर दुसरीकडे महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्ष जवळपास नष्ट होऊन, आघाडीला केवळ २० जागा मिळतील असे भीषण दावे भाजपचे नेते करताना दिसले. मात्र राष्ट्रवादीच्या सभांना ग्रामीण भागात मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांना आधीच धास्ती होती आणि मात्र निकाल त्याच धास्तीप्रमाणे लागले आणि आघाडी जवळपास शंभरीच्या घरात पोहोचली. त्यात शिवसेनेने देखील ऐतिहासिक धक्का दिला आणि संपूर्ण गणितच पालटलं.
5 वर्षांपूर्वी -
केजरीवाल सरकार मोदी सरकारच्या विकास कामांचं क्रेडिट स्वतःकडे घेत आहे: अमित शहा
राजधानी दिल्लीत होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांकडून एकमेकांवर आरोपांच्या फेरी झडण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारी दिल्ली विकास प्राधिकरणद्वारा आयोजित एका कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्यावर कडाडून टीका केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
मोदी-शहांवरील अतिआत्मविश्वास भाजपाला नडतो आहे? सविस्तर वृत्त
झारखंड विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाने हिंदी भाषिक पट्ट्यातील अजून एक महत्वाचं राज्य गमावलं आहे. यावर सध्या भारतीय जनता पक्षामध्ये पक्षांतर्गत खलबतं सुरु असून मुख्य कारणं शोधण्याची प्रक्रिया पार पडत असल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर प्राथमिक स्तरावर अनेक धक्कादायक विषय समोर येत असून तीच प्राथमिक स्तरावर पराभवाची कारणं असल्याची खात्री वरिष्ठांना आहे.
5 वर्षांपूर्वी -
झारखंड: मतदाराने मोदी-शहा जोडीसहित भाजपला नाकारलं; काँग्रेस-झामुमोची मुसंडी
झारखंड विधानसभेच्या ८१ जागांवरील मतमोजणी आज सुरु झाली. या निवडणूकीत मुख्यमंत्री रघुवीर दास यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर रघुवीर दास यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न धुळीस मिळवण्याची तयारी हेमंत सोरेन यांनी केलेली दिसतेय. पहिला कल ९ वाजता येणार होता, ज्यामध्ये एकूण ६७ मतदारसंघ नक्षलग्रस्त भागात येतात. त्यामुळे पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला होता. एकूण २४ केंद्रावर मतमोजणी होणार आहे. १ हजार २१५ उमेदवारांचे भवितव्य आज ठरणार आहे.
5 वर्षांपूर्वी -
तरुणानों, मोदी-शाह यांनी तुमचं भविष्य उद्ध्वस्त केलं - राहुल गांधी
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर सडकून टीका केली आहे. मोदी आणि अमित शहा देशाचं विभाजन करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या दोघांनी भारताचं भविष्य नष्ट केलं, असा घणाघातही केला आहे.
5 वर्षांपूर्वी -
EXIT POLL: महाराष्ट्रानंतर झारखंडमध्ये भाजपाची सत्ता जाणार; मोदी-शहांना झटका
झारखंड विधानसभा निवडणुकीचा निकाल २३ डिसेंबर रोजी लागणार आहे. त्यापूर्वीच एक्झिट पोलचा अंदाज जाहीर झाला आहे. एक्झिट पोलच्या अंदाजानुसार झारखंडमधून भारतीय जनता पक्षाला सत्तेतून पायउतार व्हावं लागणार आहे. तर राज्यात जेएमएम-काँग्रेस आघाडीचं सरकार येण्याची चिन्हे असून भारतीय जनता पक्षासाठी हे निकाल धक्कादायक असल्याचं मानलं जात आहे.
5 वर्षांपूर्वी -
पवारांनी शिवसेनेसमोर मुख्यमंत्रिपदाचे दाणे टाकले आणि त्यांनी ते टिपले: अमित शहा
एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमित शहा यांनी अनेक मुद्यांना हात घातला आहे. तुम्ही नवे पंतप्रधानपदाचे दावेदार असू शकतात का? नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी तुम्हाला तयार केलं जात आहे का? असे सवाल अमित शाह यांना करण्यात आले. यावर बोलताना आपल्यापेक्षाही दिग्गज नेते पक्षात असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
5 वर्षांपूर्वी