Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
मनसेत जोरदार हालचाली | अमित ठाकरे नाशिकला रवाना | राज ठाकरे विद्यार्थी सेनेबाबत मोठा निर्णय घेण्याची शक्यता
दरम्यान, मनसेत मोठ्या हालचाली सुरु झाल्या असून अधिक वेळ न घेण्याचा निर्णय झाल्याचं वृत्त आहे. त्यासाठी मनसेच्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदाची थेट अमित ठाकरे यांचीच नेमणूक करण्याचा हालचाली सुरु झाल्या आहेत. त्याबाबत लवकरच मोठी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
4 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण | उपचारांसाठी लीलावती रुग्णालयात दाखल
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे यांना कोरोनाची लागण झालीय. अमित ठाकरे यांची कोरोना चाचणी केल्यानंतर, त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. सध्या अमित ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. उपलब्ध माहितीनुसार त्यांच्यावर पुढील 14 दिवस उपचार करण्यात येणार आहेत, अशी प्राथमिक माहिती आहे. अमित ठाकरे यांनी संपर्कात आलेल्यांना कोरोनाची चाचणी करून घेण्याचाही सल्ला दिलाय.
4 वर्षांपूर्वी -
मनसे नेते अमित ठाकरे उपचारासाठी लिलावती रुग्णालयात दाखल
देशभरात कोरोना वाढीचा आलेख एकिकडे उंचावत असतानाच दुसरीकडे त्यावरील प्रतिबंधात्मक उपायांच्या बळावर देशाची या विषाणूशी सुरु असणारी झुंज काही बाबतीत यश मिळवताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे त्याचच एक उदाहरण. दरम्यान, सर्वत्र कोरोनामुळं चिंतेचं वातावरण असतानाच केंद्रान या संसर्गाच्या निरीक्षणासाठी नेमलेल्या समितीनं एक दिलासादायक बाब स्पष्ट केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत
आरेतील मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी पाठिंबा दर्शविला होता. त्यांच्या या भूमिकेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्याकडून कौतुक करण्यात आले आहे. सरकारच्या चांगल्या कामाला ‘दिलसे’ पाठिंबा देणारे आपल्यासारखे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला, असे रोहित यांनी म्हटले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मुंबई व भावी पिढीसाठी गरजेच्या पर्यावरणाचं नुकसान होण्यापेक्षा कारशेडचं नुकसान परवडलं
सरकारच्या या निर्णयामुळे जो मेट्रो प्रकल्प पुढच्यावर्षी मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला असता, तो आता अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडला आहे असंही फडणवीस म्हणाले आहेत. “आरेच्या कारशेडसाठी ४०० कोटी रुपये आधीच खर्च झालेल, स्थगितीमुळे १३०० कोटी पाण्यात गेले. शिवाय ४००० कोटींचा आर्थिक भार वाढला. कांजूरमार्ग जागेचा वाद कायम राहिल्यास २४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार सरकारी तिजोरीवर पडेल. एवढे सारे करून मेट्रो प्रकल्प अनिश्चित काळासाठी लांबणीवर पडेल. आपल्या अहंकारासाठी मुंबईकरांच्या प्रवास सुखाला खिळ बसवून सरकार नेमके काय साध्य करू इच्छिते? असा सवालही फडणवीस यांनी केला आहे. ही जनतेची मोठी दिशाभूल आहे,” असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे म्हणाले.
5 वर्षांपूर्वी -
सगळ्यांच्या एकत्रीत लढ्याला यश | अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. आरे कॉलनीत होणाऱ्या मेट्रो कारशेडला स्थगिती दिल्यानंतर ठाकरे सरकारनं आता मेट्रोचं कारशेड थेड कांजूरमार्ग येथे हलवण्यात आलं आहे. शासकिय जमीनीवर हे कारशेड होणार असून त्यासाठी शून्य खर्च येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यावेळी आरे जंगलातील गेल्या वर्षांपासून पेटलेल्या मेट्रो कारशेडचा मुद्दा मार्गी लावला आहे. दरम्यान, यावर अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहेत.
5 वर्षांपूर्वी -
कोरोना योद्धे असा शाब्दिक गौरव करुन त्यांच्या समस्या सुटणार नाहीत - अमित ठाकरे
राज्यात सध्या कोरोनाविरुद्ध निकराची लढाई सुरू आहे. या लढाईत डॉक्टर्स आणि नर्सेस आघाडीवर आहेत. अत्यंत जोखमीचं हे काम असल्याने या सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धे असंही म्हटलं जात आहे. मात्र राज्य सरकार आर्थिक संकटात असल्याने या कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात करण्यात आली होती. मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी या कर्मचाऱ्यांचा पगार पूर्ववत करण्याची मागणी केली होती. त्यानंतर सरकारनेही अशी मागणी होत असल्याने पगार पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला होता. अमित ठाकरे यांनी नर्सेसच्या पगाराबद्दली फेसबुक पोस्ट लिहून अशीच मागणी केली आहे. थोडी संवेदनशीलता दाखवा असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
5 वर्षांपूर्वी -
शाळांकडून फी भरण्यासाठी पालकांवर दबाव, अमित ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
सध्या कोरोनाच्या संकटामुळे ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाले आहेत. दरम्यान, शाळांकडून फी संदर्भात पालकांवर प्रचंड दबाव टाकण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारकडून देखील यावर कोणताही नियंत्रण किंवा हस्तक्षेप नसल्याचंच पाहायला मिळत आहे. त्यामुळे सरकार दरबारी विषय पोहोचविण्यासाठी पालकांच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे यांची भेट घेऊन विषय सविस्तर त्यांच्यासमोर मांडला होता. सदर विषयाला अनुसरून अमित ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून यावर गंभीर दखल घेण्याची विनंती केली आहे.
5 वर्षांपूर्वी -
६५ हजार आशा स्वयंसेविकांच्या मानधनात वाढ कारण्याबाबतचा मुद्दा कॅबिनेटमध्ये चर्चेला
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहेत. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी त्यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहून याच मुद्यावरून प्रत्यक्ष भेट देखील घेतली होती.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरे यांनी मनसे शिष्टमंडलासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे राजकारणात सक्रीय झाले आहे. अमित ठाकरे यांनी नेतेपदी निवड झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नावर ते भूमिका मांडत आहे. आशा स्वयंसेविकांना मिळणाऱ्या मानधनाच्या मुद्द्यावर अमित ठाकरे यांनी आज राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. विशेष म्हणजे, त्याआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र लिहिले होते.
5 वर्षांपूर्वी -
आशा सेविकांच्या मासिक मोबदल्यासंदर्भात अमित ठाकरेंचं उपमुख्यमंत्र्यांना पत्र
‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवून द्यावा, अशी विनंती करणारे पत्र राज ठाकरे यांचे चिरंजीव आणि मनसे नेते अमित ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना लिहिले आहे. अमित ठाकरे यांनी फेसबुकवर या पत्राची माहिती दिली आहे. ‘आशा’ स्वयंसेविकांचा मासिक मोबदला वाढवण्याच्या मागणीसाठी आज दुपारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचीही अमित ठाकरे भेट घेणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
शिवसेनेकडून सरकारच्या नियमावलीचे उल्लंघन; मिसळ महोत्सवाचे आयोजन; मनसेकडून प्रश्न
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नागपूर आणि पिंपरी-चिंचवड येथील शाळा पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली. जनतेच्या हितासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. याबाबत घेतलेले निर्णय काल मध्यरात्रीपासून लागू होणार असल्याचेही त्यांनी म्हटले. दहावी आणि बारावीची परीक्षा वगळता शालेय परीक्षा उशिरा घेण्याबाबतही विचार सुरु असल्याचे ते म्हणाले होते.
5 वर्षांपूर्वी -
अमित ठाकरेंचा औरंगाबाद मध्यवर्ती कार्यालयात महाराष्ट्र सैनिकांशी थेट सुसंवाद
शिवजयंतीच्या निमित्ताने राज ठाकरे आणि अमित ठाकरे औरंगाबादमध्ये आले होते. काल राज ठाकरे यांचा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यावर संध्याकाळी शिव जयंतीच्या निमित्ताने अमित ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली औरंगाबादमध्ये मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले होते. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचं एकाप्रकारे हे जोरदार शक्तिप्रदर्शन मानले गेले. परंतु, तत्पूर्वी पोलिसांनी शिवजयंतीच्या मिरवणुकीला परवानगी नाकारली होती, मात्र त्यानंतर काही अटींवर आणि खबरदारी घेण्याचा सूचना देत परवानगी देण्यात आली.
5 वर्षांपूर्वी -
माहिती तंत्रज्ञान आणि पर्यावरण खात्यावर अमित ठाकरेंची नजर राहणार
राज्य सरकारवर वचक ठेवण्यासाठी मनसेने महाअधिवेशनात शॅडो कॅबिनेट स्थापणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार मनसेने शॅडो कॅबिनेटची स्थापना केली असून त्यात राज ठाकरेंनी विशिष्ट स्थरातील पदाधिकाऱ्यांना स्थान दिलं आहे. त्यामुळे इतर पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान शॅडो कॅबिनेटमधील प्रत्येक नेत्यावर संबंधित खात्याच्या कामावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात येणार आहे. तसेच शॅडो कॅबिनेटमधील हे नेते एखाद्या मंत्र्याने गैरव्यवहार केला, तर त्याचा पाठपुरावा करणार आहेत.
5 वर्षांपूर्वी -
मनसे हिंदुत्वाचा झेंडा खांदयावर घेऊन देशभर विस्तार करण्यासाठी तरुणांची राज ठाकरेंना विनंती
२०२४ मधील निवडणुका या हिंदुत्वाच्या मुद्यावर लढल्या जातील अशी सध्याची परिस्थिती सांगते. दरम्यान, मनसेने देखील भगव्याला स्वीकारून नवे बदल केल्याने त्यांना सध्या चांगले येण्याची शक्यता आहे. शिवसेना त्यांच्या कट्टर आणि पारंपरिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत गेल्याने शिवसेनेचा मूळ मतदार प्रचंड नाराज आहे. त्यात अल्पसंख्यांक धार्जिणे निर्णय घेण्यास त्यांना महाविकास आघाडी भाग पाडत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.
5 वर्षांपूर्वी -
ठाकरेंची नवी पिढी; सत्तेमुळे आदित्य यांना अधिक संधी पण अमित यांच्यापुढे केवळ आव्हानं: सविस्तर वृत्त
ठाकरे घराण्यातील नवी आणि तरुण पिढी आता पूर्णपणे राजकारणात उतरली आहे. आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे हे दोन्ही तरुण नेते आज सक्रिय राजकारणात आले असले तरी दोन्ही बाजूंचा विचार करता लोकांसमोर स्वतःला सिद्ध करण्याची सर्वाधिक संधी ही आदित्य ठाकरे यांनाच आहे आणि त्याचं मूळ कारण म्हणजे राज्याची आणि राज्यातील महत्वाच्या महानगर पालिकांची सत्ता आज शिवसेनेकडे आहे. त्यात स्वतः उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री आणि आदित्य ठाकरे स्वतः मंत्रिपदावर हेच कारण आहे.
5 वर्षांपूर्वी -
मनसे 'हिंदुत्वाची' थेट जाहिरातबाजी...'बांगलादेशींनो चालते व्हा': सविस्तर वृत्त
पनवेलमध्ये घुसखोर बांगलादेशींच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालेली दिसून येत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे बांगलादेशींना खळ खट्याकचा इशारा देण्यात आला आहे. ‘बांगलादेशीनो चालते व्हा’, असे सांगणारे पोस्टर पनवेलमध्ये पाहायला मिळत आहेत. ९ फेब्रुवारीला बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आझाद मैदान इथे मोर्चा होणार आहे. या पार्श्वभुमीवर पनवेल परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बांगलादेशींना जाहीर आव्हान दिले आहे.
5 वर्षांपूर्वी -
मराठीला नख लावाल तर मराठी म्हणून अन धर्माला हात लावाल तर हिंदू म्हणून अंगावर जाईन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसतो : राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी -
CAA - मनसेचा ९ फेब्रुवारीला मोर्चा; बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून द्या
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाषणाची सुरुवात करताना ‘जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो’ अशी करताच उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. त्यानंतर त्यांनी सोशल मीडियासंबंधी पदाधिकाऱ्यांना महत्वाची सूचना केली. संघटनात्मक पक्षाची अंतर्गत कुठलीही गोष्ट यापुढे फेसबुक, टि्वटरवर आलेली चालणार नाही. पक्षांतर्गत विषय मांडण्याची फेसबुक ही जागा नव्हे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला.
5 वर्षांपूर्वी