Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख अखेर जेलबाहेर, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसह कार्यकर्त्यांची फौज स्वागतासाठी
Anil Deshmukh | महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख यांची 14 महिन्यांनी जामिनावर सुटका झाली आहे. काहीच वेळापूर्वी अनिल देशमुख आर्थररोड जेलबाहेर आले आहेत. अनिल देशमुख यांच्या स्वागतासाठी राष्ट्रवादीचे बडे नेते आणि कार्यकर्ते जेलबाहेर जमा झाले होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, सुप्रिया सुळे तसंच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनिल देशमुख यांचं स्वागत केलं.
2 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांना हायकोर्टचा मोठा दिलासा, सुटकेचा मार्ग मोकळा, 24 तासात येणार तुरुंगाबाहेर
Anil Deshmukh | राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयने त्यांच्या जामिनाला स्थगिती देण्यासाठी दाखल केलेली याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली आहे. अनिल देशमुख यांची ऑर्थर रोड कारागृहातून उद्या सुटका होणार आहे. अनिल देशमुख यांना मुंबई हायकोर्टाने 12 डिसेंबर रोजी एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सशर्त जामीन मंजूर केला होता. पण या निर्णयाला सीबीआयने आव्हान देत मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती.
2 वर्षांपूर्वी -
बिग ब्रेकिंग! अनिल देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याचं मत कोर्टाने नोंदवलं, CBI प्रकरणातही जामीन मंजूर, पण...
Anil Deshmukh | 100 कोटी वसुली प्रकरणामध्ये अखेर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना जामीन मंजूर झाला आहे. सीबीआयने या प्रकरणात जामीन अर्जावर आज मुंबई उच्च न्यायालय निकाल दिला आहे. देशमुख यांच्याविरोधात पुरावे नसल्याची मत कोर्टाने नोंदवलं आहे. त्यामुळे देशमुख आता 13 महिन्यानंतर जेलबाहेर येणार आहे. 1 लाखांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर केला आहे.
2 वर्षांपूर्वी