Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
BREAKING | परमबीर सिंह यांच्याविरोधात मुक्त चौकशीचे ACB'ला राज्य सरकारकडून आदेश
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला (ACB) मुक्त चौकशीचे आदेश दिले आहेत. पोलिस निरीक्षक अनूप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्यावर 2 कोटी रुपयांची लाच मागितल्याचा आरोप केला होता. त्यासोबतच सिंह यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे अनेक गंभीर आरोप कले होते.
4 वर्षांपूर्वी -
वाझेंनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब देशमुख नव्हे तर परमबीर सिंग? | मग संभ्रम पसरवतंय कोण?
मुंबई पोलिस दलातील निलंबित आणि विवादित अधिकारी सचिन वाझे याने सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडे मोठे खुलासे केल्याचं सांगण्यात येत आहे. अशावेळी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे वकील अॅड. कमलेश घुमरे यांनी पत्रकार परिषद घेत सचिन वाझे प्रकरणात काही आरोप केले आहेत. त्यात सचिन वाझे यांनी नाव फोडलेले ‘नंबर वन’ साहेब अनिल देशमुख नाही, तर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग असल्याचा आरोप घुमरे यांनी केलाय. अनिल देशमुख हे परमबीर सिंग यांच्या विरोधात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार होते. मात्र ते राहून गेलं. आधी त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देण्यासाठी आम्ही पुढे आलो, असंही घुमरे यांनी म्हटलंय.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख दिल्लीला रवाना | ईडीच्या नोटिशीविषयी कायदेशीर सल्ला घेण्याची शक्यता
आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेच्या तपशिलासह सहा मुद्द्यांवर सविस्तर तपशील मागितला आहे. त्यासंबंधित आवश्यक कागदपत्रांनिशी पुढील चौकशीवेळी हजर राहण्याची सूचना त्यांना करण्यात आल्याचे ईडीतील सूत्रांनी सांगितले.
4 वर्षांपूर्वी -
२४ तासात चौकशीसाठी हजर राहा | नाहीतर घरी येऊन चौकशी - ईडीचं उत्तर
ईडीच्या कचाट्यात सापडलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून समन्स बजावून आज (२९जून) सकाळी ११ वाजता चौकशीसाठी बोलावलं होतं. मात्र, अनिल देशमुख यांनी वय, आजारपण आणि कोरोनाच्या धोक्याचं कारण पुढे करत ईडीच्या चौकशीला हजर राहण्यास नकार दिला. यासंदर्भात त्यांनी ईडीला पत्र देखील लिहिलं होत दरम्यान, या पत्राला ईडीने उत्तर देत २४ तासांत ईडी कार्यालयात चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
ED'चं ठरलंय? देशमुखांना चौकशीनंतर..? | गृहमंत्री वळसे पाटील, आव्हाड आणि मुंबई पोलीस आयुक्त वर्षावर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या ईडी चौकशीच्या (ED) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे दिग्गज मंत्री वर्षा बंगल्यावर दाखल झाले. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड हे शरद पवारांच्या जवळचे मंत्री वर्षा बंगल्यावर पोहोचले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे सुद्धा वर्षावर उपस्थित आहे. इथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत महत्त्वाची बैठक होत आहे.
4 वर्षांपूर्वी -
चौकशीस गैरहजर राहण्यासाठी अनिल देशमुखांचे ईडीला पत्र | ईसीआयआरची प्रत देण्याची विनंती
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज इडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. परंतु, अनिल देशमुख आज पुन्हा एकदा ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर राहिले नाहीत. त्यांनी ईडीला लिहिलेल्या पत्रात आपले वाढते वय आणि कोरोनाचा धोका असे कारण सांगत चौकशीतून सूट मिळवण्याची मागणी केली आहे. पत्र लिहिल्यानंतर काही वेळातच त्यांच्या वकिलांनी ईडी कार्यालय गाठले आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे समन्स | आज चौकशीसाठी राहणार हजर
ईडीने महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना समन्स बजावले आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी आज देखमुखांची चौकशी केली जाणार आहे. 100 कोटी रुपये वसूल प्रकरणात ईडीकडून तपास केला जात असताना, मुंबईतील काही बार मालकांना चौकशीसाठी बोलावले होते. या चौकशीदरम्यान मुंबईतील 10 बार मालकांनी अनिल देशमुख यांना प्रत्येकी 4 कोटी रुपये दिले असल्याची कबुली दिल्याचा दावा ईडीने केला आहे. शुक्रवारी ईडीने अनिल देशमुख यांच्या मुंबई, नागपूर व इतर ठिकाणी छापेमारी केली होती. यानंतर अनिल देशमुख यांचे स्वीय सहायकास (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली. त्यांच्या चौकशीनंतर ईडीकडून देशमुख यांना समन्स पाठवले होते. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती.
4 वर्षांपूर्वी -
देशमुखांच्या प्राथमिक चौकशीचे CBI'ला हायकोर्टाचे आदेश होते | ED'ला मध्ये आणून अटकेची टांगती तलवार?
100 कोटी कथित वसुलीप्रकरणाच्या आरोपावरुन माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत आहेत. देशमुख यांच्या दोन्ही स्वीय सहाय्यकांना ईडीने अटक केल्यानंतर, आता स्वत: अनिल देशमुख यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. ईडीने अनिल देशमुख यांना समन्स बजावलं आहे. त्यांना ईडी कार्यालयात चौकशीला हजर राहायचं आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं. त्या पत्रात अनिल देशमुख यांनी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याकरवी 100 कोटी रुपयांची वसुलीचं टार्गेट दिल्याचा आरोप आहे. यानंतर कोर्टाच्या आदेशाने याप्रकरणाची चौकशी सुरु आहे.
4 वर्षांपूर्वी -
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. महिनाभरानंतर अनिल देशमुख यांच्या निवासस्थानावरील ही दुसरी धाड आहे. यापूर्वी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर आता ईडीने नागपुरातील घरी छापेमारी केल्याने, अनिल देशमुख बॅकफूटवर गेले आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्याविरुद्ध पत्र लिहून 100 कोटी वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुखांच्या कथित वसुलीप्रकरणात राज्य सरकारचं सहकार्य नाही | CBI चा हायकोर्टात दावा
भ्रष्टाचार प्रकरणी करण्यात येणारा तपास केवळ माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यापुरताच मर्यादित नाही. त्यात सचिन वाझे, परमवीर सिंह व सर्व संबंधित व्यक्तींची चौकशी करण्यात येणार आहे. मात्र, राज्य सरकार आवश्यक ती कागदपत्रे देण्यास नकार देत आहे, असे सीबीआयने काल (२१ जून) उच्च न्यायालयाला सांगितले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर नोंदवलेल्या एफआयआरमधील काही परिच्छेद वगळण्यासाठी राज्य सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
4 वर्षांपूर्वी -
मी अन्वय नाईक प्रकरणी कारवाई केली आणि मोहन डेलकर आत्महत्येनंतर SIT नेमली म्हणून....
मला प्रसार माध्यमांच्या माध्यमातुन अशी माहिती मिळत आहे की, ईडीकडुन आता माझी चौकशी होणार आहे. मी न केलेल्या गुन्हयाची शिक्षा देण्याचे काम राजकीय हेतुपोटी सुरु आहे. मी गृहमंत्री असतांना मधल्या काळात काही महत्वाचे निर्णय घेतल्यामुळे केंद्र सरकार नाराज असून शकते आणि त्यामुळे माझी चौकशी सिबीआय व ईडीच्या माध्यमातुन होत आहे. पण एक आहे “सत्य परेशान हो सकता है लेकीन पराजीत नही” असे मत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्यक्त केले.
4 वर्षांपूर्वी -
पैसे दिल्याचं आरोपकर्ते परमबीर सिंग आणि सचिन वाझे सुद्धा म्हणत नाहीत, मग CBI, ED कारवाई कशाला? - काँग्रेस
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात ईडीने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल केला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Param Bir Singh) यांनी अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप केला आहे. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला आहे. या गुन्हाच्या अनुषंगाने ईडीने आता तपास सुरु केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी अनिल देशमुखांची हायकोर्टात धाव
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांप्रकरणी सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करण्याच्या मागणीसाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल (३ मे) उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे अतिशय गंभीर आरोप केले होते.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग म्हणालेले वाझेला सांगितले पण त्याने ते ऐकले नाही, जर अपराधच घडला नाही तर धाडी कसल्या? - काँग्रेस
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मालमत्तांवर सीबीआयने टाकलेल्या छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस चांगलीच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी या कारवाईवरून मोदी सरकारवर संशय व्यक्त केला आहे. सुप्रीम कोर्टाने केवळ प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मग गुन्हा आणि धाडी का टाकल्या असा भाजपवर हल्लाबोल करण्यात आला आहे.
4 वर्षांपूर्वी -
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या इतर मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख यांना सीबीआय'कडून समन्स | बुधवारी चौकशी होणार
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज(सोमवार) सीबीआयकडून बजावण्यात आलं आहे. यानुसार आता अनिल देशमुख यांची बुधवार १४ एप्रिल रोजी चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख आणि राज्य सरकारची याचिका सर्वोच्च न्यायालायने फेटाळली
परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांवर हायकोर्टाने आपली बाजू ऐकूनच घेतली नाही. त्यामुळे सीबीआयकडून होऊ घातलेली आपली चौकशी रोखावी, अशी मागणी अनिल देशमुख यांनी केली होती. मात्र, याप्रकरणात सीबीआय चौकशीचा निर्णय योग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय उचलून धरला. त्यामुळे आता अनिल देशमुख यांना सीबीआयच्या चौकशीला सामोरे जाण्याशिवाय गत्यंतत उरलेले नाही. सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय महाविकासआघाडी सरकारसाठीही मोठा धक्का मानला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
सचिन वाझे आज पत्र देणार आणि तिसरी विकेट काढणार हे भाजपला आधीच माहिती होतं - अनिल परब
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
पत्राची सत्यता पडताळून मगच कारवाईचे कोर्टाचे आदेश | हुद्दा-पद नसतानाही स्वाक्षरीत API
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी -
पवारांची मनधरणीसाठी देशमुखांनी मागितली होती २ कोटींची खंडणी | वाझेंच्या पत्रात दावा
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बचे पडसाद अद्याप शमलेले नाहीत. तोच सचिन वाझेंनेही एक लेटर बॉम्ब टाकला आहे. या पत्रात सचिन वाझे यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील अजून एका मंत्र्यावर गंभीर आरोप केला आहेत. नियुक्तीसाठी अनिल देशमुखांनी 2 कोटी रुपये मागितल्याचा आरोप सचिन वाझे यांनी या पत्रात केलाय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हे पत्र सचिन वाझे यांनी लिहिलं आहे. ते पत्र आता NIA कोर्टाला दिलं जाणार आहे. अद्याप हे पत्र जमा करण्यात आलेलं नसल्याचं कळतंय.
4 वर्षांपूर्वी