Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
बाजू ऐकून न घेताच निर्णय दिला | देशमुखांची सुप्रीम कोर्टात 290 पानांची विशेष अनुमती याचिका
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी मुंबई हायकोर्टाने CBIने करावी असे आदेश दिले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्री पदावरून पायउतार व्हावे लागले होते. पण आता मुंबई हायकोर्टाने दिलेल्या निर्णयाला राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. आज (६ एप्रिल) ही याचिका दाखल करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख किंवा महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात गेल्यास मी विरोध करणार - जयश्री पाटील
अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राच्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर देशमुख तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. सीबीआय चौकशी टाळता यावी यासाठी त्यांनी दिल्लीत ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी यांच्यासोबत रात्री नऊ ते दहा दरम्यान चर्चा केली. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाची केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत करण्यात यावी, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर या घडामोडी घडल्या.
4 वर्षांपूर्वी -
अनिल देशमुख सुप्रीम कोर्टात अर्ज दाखल करण्यापूर्वीच सीबीआयची धावाधाव | CBI आज मुंबईत
मुंबईतील बार, हुक्का पार्लर चालकांकडून दरमहा १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास सांगितल्याच्या मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्या आरोपांप्रकरणी अखेर अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी गृहमंत्र्यांवरील आरोपांची चाैकशी करण्याचे आदेश सीबीआयला दिल्यानंतर देशमुख यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला. रात्री राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राजीनामा मंजूर केला.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा | कोर्टाच्या आदेशानंतर निर्णय
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या मोठ्या अडचणीत सापडले आहेत. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपयांची खंडणी गोळा करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. त्यांनी तसे पत्र लिहित ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही दिले होते. दरम्यान, आज (५ एप्रिल) मुंबई हायकोर्टानं गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची प्राथमिक चौकशी करण्यासाठी प्रकरण सीबीआयला सोपवण्याचा निर्णय दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कोर्टाच्या आदेशानंतर जयश्री पाटील यांच्या प्रतिक्रियेवर अनेकांच्या भुवया उंचावल्या | तो 'मराठा' शब्दप्रयोग
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निकाल | देशमुखांची १५ दिवसांत प्राथमिक चौकशी पूर्ण करण्याचे CBI'ला आदेश
मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्यासोबत वकील जयश्री पाटील यांनीदेखील याचिका केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांच्यासहित दाखल इतर दोन जनहित याचिका फेटाळून लावत वकील जयश्री पाटील यांच्या याचिकेवर हे आदेश दिले आहेत. यावेळी न्यायालयाने १५ दिवसांत चौकशी पूर्ण करण्याचा आदेश सीबीआयला दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
Breaking | उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना झापलं | विचारले अनेक गंभीर प्रश्न
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावतीने अनिल देशमुख यांच्याविरोधातील याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे आहेत. परमबीर सिंग यांचे वकील विक्रम ननकानी बाजू मांडत आहेत. परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबई हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी.एस. कुलकर्णी यांच्या खंडपीठात सुनावणी सुरु झाली आहे.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती | मुंबई हायकोर्टाच्या माजी न्यायमूर्तींकडून चौकशी
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी अखेर महाविकास आघाडी सरकारने चौकशी समितीची घोषणा केली आहे. ही समिती पुढील 6 महिन्यात अहवाल देणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुमची याचिका जनहित याचिका कशी? हायकोर्टाचा सवाल | उद्या तातडीची सुनावणी
सुप्रीम कोर्टाने फटकारल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची आणि त्यांच्या कारभाराची सीबीआयने चौकशी करण्याचे आदेश देण्याची मागणी परमबीर यांनी फौजदारी जनहित याचिकेद्वारे केली आहे. दरम्यान हायकोर्टाने उद्या तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय घेतला आहे.
4 वर्षांपूर्वी -
संबंधित जनहित याचिका केवळ चिप पब्लिसिटीसाठी | सुनावणीदरम्यान न्यायालयाची टिपणी
गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गैरकारभाराविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पदरी निराशा पडली होती. सदर प्रकरणी तुम्ही मुंबई हायकोर्टात का गेला नाही, असा सवाल करतानाच आधी हायकोर्टात जा, असा सल्ला सुप्रीम कोर्टाने सिंग यांना दिला होता. त्यानंतर त्यांनी याचिका मागे घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
4 वर्षांपूर्वी -
परमबीर सिंग यांचे आरोप | निवृत्त न्यायमूर्तींमार्फत चौकशी होणार - राज्य सरकार
देशमुख यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते, असा आरोप परमबीर सिंग यांनी केला होता. त्याप्रकरणी बैठकीत चर्चा झाली. अनिल देशमुख यांनी राजीनामा देण्याची किंवा त्यांचा राजीनामा घेण्याची गरज नसल्याचे मत बैठकीत सर्व मंत्र्यांनी व्यक्त केल्याचे समजते. तसेच या आरोपांत किती तथ्य आहे, याचीही सत्यता आयोगामार्फत तपासली जाणार आहे. ‘कमिशन ऑफ एन्क्वॉयरी ॲक्ट’अंतर्गत ही चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
दूध का दूध, पाणी का पाणी करावे | गृहमंत्री अनिल देशमुख यांचं ट्विट
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय. निवृत्त न्यायमूर्तींमार्फत गृहमंत्र्यांची चौकशी केली जाणार आहे. राज्य शासना्च्या या निर्णयानंतर गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करत ‘दूध का दूध, पाणी का पाणी करावे’, असं म्हटलं आहे.
4 वर्षांपूर्वी -
API दर्जाच्या अधिकाऱ्याला कोणी १०० कोटी रुपयांचं टार्गेट देईल हेच मनाला पटत नाही - IPS कृष्ण प्रकाश
महाराष्ट्राचे गृहमंत्री सहायक निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याला शंभर कोटींच्या वसुलीचे टार्गेट कसे देतील, टार्गेट दयायचेच असेल तर पोलिस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना देतील, त्यामुळे यात तथ्य वाटत नाही, जे अधिकारी चुकीचे काम करतात, त्यांनाच टार्गेट दिले जाते, असे पिंपरी -चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी स्पष्ट केले. तसेच पिंपरी चिंचवड शहर भयमुक्त करणे, हेच आमचे टार्गेट असून चुकीला माफी नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
4 वर्षांपूर्वी -
हा सरकारला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न | परमबीर सिंहांविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करणार - गृहमंत्री
मुंबई पोलिस आयुक्तपदावरुन उचलबांगडी करण्यात आलेले पोलिस अधिकारी परमबीर सिंहांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविषयी गंभीर आरोप केले आहेत. अनिल देशमुख यांनी प्रत्येक महिन्याला 100 कोटी रुपयांची वसुली करण्याचे टार्गेट सचिन वाझे यांना दिला असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. आता यावर अनिल देशमुख यांनी प्रसिद्ध पत्रक जारी करुन सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच परमबीर सिंहांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल करणार असल्याचेही ते म्हणाले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
नागपुर मिहान प्रकल्प | गृहमंत्री अनिल देशमुख यांची दिल्लीत पवारांशी चर्चा
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ६ जनपथ या दिल्लीतील बंगल्यावर गृहमंत्री अनिल देशमुख सकाळी १० वाजताच्या सुमारास दाखल झाले होते. शरद पवार सध्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्ली येथे आहेत. गृहमंत्री आणि शरद पवारांच्या या भेटीत महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
4 वर्षांपूर्वी -
गृहमंत्र्यांविरुद्ध हक्कभंग दाखल | तर अशोक चव्हाणांविरुद्ध सुद्धा हक्कभंग आणणार
मनसुख हिरेन प्रकरणी आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्यांमध्ये गृहमंत्र्यांनी सचिन वझे यांना क्राइम ब्रांचमधून काढले जाणार असल्याची घोषणा केली. ते विधान परिषदेत बोलत होते. मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात विधिमंडळात भाजपने थेट एपीआय सचिन वझे यांचे नाव घेतले होते. यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना गृहमंत्री म्हणाले, की सचिन वझे यांना बाजूला करावे अशी मागणी विरोधकांकडून झाली. त्या प्रकारचा निर्णय आम्ही घेतला. त्यांना क्राइम ब्रांचमधून बाहेर केले आहे. त्यांना इतर ठिकाणी पाठवले जाईल.
4 वर्षांपूर्वी -
भारतरत्नांची नव्हे | भाजप IT सेलची चौकशी होणार | IT सेलच्या प्रमुखाचंही नाव समोर - गृहमंत्री
शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ पॉप स्टार रिहाना, पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग यांनी ट्विट केले होते. या ट्विटनंतर लता मंगेशकर यांच्यासह सचिन तेंडूलकर, कंगना राणावत, रोहित शर्मा, विराट कोहली अशा अनेक सेलिब्रिटींनी एकामागोमाग एक ट्विट करून त्यांना विरोध केला.
4 वर्षांपूर्वी -
लता मंगशेकर, सचिन तेंडुलकर, सायनाच्या ट्विटची चौकशी होणार | गृहमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
पॉप सिंगर रिहानाने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक सेलिब्रिटजनी ट्विट केलं होतं. सर्व सेलिब्रिटजच्या ट्विटमध्ये साधर्म्य दिसून येत असल्याने याची चौकशी करण्यात येणार असून तसे आदेश देण्यात आल्याचं अनिल देशमुख यांनी आज स्पष्ट केलं. त्यामुळे गानसम्राज्ञी लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, सायना नेहवाल, अक्षयकुमार, अजय देवगन, विराट कोहली आदींच्या ट्विटची चौकशी होणार आहे.
4 वर्षांपूर्वी -
भाजपने पवारांना एस्कोर्ट दिला नव्हता | अजित पवारांच्या सुरक्षेसाठी हवालदारही नव्हता
राज्यातील महाविकासआघाडी सरकारने विरोधी पक्षाच्या महत्त्वाच्या नेत्यांना मोठा दणका दिला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा व्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला आहे. देवेंद्र फडणवीसांसोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड, भाजप नेते आशिष शेलार इतकेच नव्हे तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सुरक्षा व्यवस्थेत ठाकरे सरकारकडून मोठी कपात करण्यात आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
चांगलं काम केलं तरी आपलं दुकान बंद होऊ नये म्हणून फडणवीस टीका करतात - गृहमंत्री
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगलं काम केलं तरी टीकाच करणार आहेत. त्यांचं राजकीय दुकान बंद होऊ नये म्हणून ते टीका करत असतात असा टोला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एका कार्यक्रमात लगावला आहे. अनिल देशमुख यांनी नववर्षाच्या निमित्ताने पुण्यातील येरवडा कारागृहाला भेट दिली. यानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधताना बोलत होते.
4 वर्षांपूर्वी