Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्रासाठी राज्य सरकारच्या विरोधात मोठे आंदोलन करणार - अण्णा हजारे
केंद्रात ज्या पद्धतीने लोकपाल कायदा झाला आहे, त्याच धर्तीवर राज्यात सशक्त लोकायुक्त कायदा व्हावा, या मागणीसाठी समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यातील उद्धव ठाकरे सरकार विरोधात आंदोलनाचा बिगुल दिला आहे. भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, त्यासाठी सशक्त आणि स्वायत्त लोकायुक्त गरजेचा आहे.
4 वर्षांपूर्वी -
जनताच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे प्रश्न सुटणार नाहीत, मी एकटा काय करु? - अण्णा हजारे
देशातील राजकारणात काही वाद किंवा चर्चा सुरू झाल्यावर सर्वांना ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची आठवण येत असते. अशा वेळी आता अण्णा हजारे कुठे गेले असा सवाल सोशल मीडियाच्या माध्यमातून केला जातो. तसेच आता अण्णा हजारे हे झोपले आहेत का? अशी विचारणाही केली जाते. आता समाजसेवक अण्णा हजारेंनीच जनतेला हा सवाल केला आहे. ‘जनता हीच कुंभकर्णासारखी झोपली आहे, त्यामुळे सरकार त्यांना हवे ते करून घेत आहे.
4 वर्षांपूर्वी -
कृषी कायद्यावरून केंद्राला जानेवारीत अल्टिमेटम देणारे अण्णा महाविकास आघाडी विरोधात संधी मिळताच जुलै'मध्ये प्रकटले
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जानेवारी महिन्यात पत्र लिहून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला होता. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण जानेवारी महिन्याच्या अखेरीस आंदोलन करणार आहोत. हे आपले अखेरचे आंदोलन असेल असे अण्णा हजारे यांनी म्हटले होते. आपणास आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही तरीही आपण आंदोलनास बसणार असल्याचे अण्णांनी पंतप्रधानांना दिलिहेल्या पत्रात म्हटले होते.
4 वर्षांपूर्वी -
भाजपशी चर्चेनंतर आंदोलन स्थगित | आता महाविकास आघाडीला हे बाहेर काढू, ते बाहेर काढू इशारे
प्रजासत्ताक दिनापासून दिल्लीतील परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे. आंदोलन सुरू असलेल्या ठिकाणी धुमश्चक्री झाल्या. त्याचबरोबर शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्धारही केला आहे. दुसरीकडे कृषी कायद्यांविरोधात समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलनाची इशारा दिला होता. मात्र, शुक्रवारी त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. अण्णा हजारे यांच्या या निर्णयावर सोशल मीडियावर शंका उपस्थित केल्या जात असून, शिवसेनेनंही अण्णा हजारे यांना काही सवाल केले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अण्णा हजारे यांचे पंतप्रधानांना पत्र | शेतकऱ्यांच्या प्रश्नावर दिल्लीत आंदोलन करणार
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिला आहे. अण्णा हजारे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आपण जानेवारी महिन्याच्या अखेरीस आंदोलन करणार आहोत. हे आपले अखेरचे आंदोलन असेल असे अण्णा हजारे यांनी म्हटले आहे. आपणास आंदोलन करण्याची परवानगी दिली नाही तरीही आपण आंदोलनास बसणार असल्याचे अण्णांनी पंतप्रधानांना दिलिहेल्या पत्रात म्हटले आहे.
4 वर्षांपूर्वी -
रामाला मानणारे वचन कसे मोडतात | अण्णांचा मोदी सरकारला संतप्त सवाल
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. एका बाजूला रामाचे नाव घेऊन राज्य करायचे आणि दुसरीकडे प्रभू राम यांचा आदर्श बाजूला सारून दिलेली वचने पाळायची नाहीत, असा या सरकारचा कारभार सुरू असल्याचे हजारे यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नी आपण केलेल्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी हजारे यांनी सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच सध्या दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनापेक्षा आपल्या मागण्या वेगळ्या असून त्या आंदोलनावर आपले आंदोलन अवलंबून नसल्याचे संकेतही हजारे यांनी दिले आहेत.
4 वर्षांपूर्वी -
अण्णांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आंदोलन करु नये | भाजप नेत्याशी अण्णांची दीडतास चर्चा
केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना काही शेतकरी संघटनांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. भारतीय किसान युनियनने सुप्रीम कोर्टात या कायद्यांच्या विरोधात याचिका दाखल केली असून सुप्रीम कोर्टासमोर प्रलंबित असलेल्या या प्रकरणाच्या सुनावणीची मागणी केली आहे. नवीन कृषी कायदे उद्योजकांच्या हितांचे रक्षण करतात आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे हित जपले जाणार नाही, असा दावा या याचिकेत केला आहे. हे कायदे घटनाविरोधी आणि शेतकरी विरोधी आहे.
4 वर्षांपूर्वी -
अण्णा दिल्लीत जाऊन कृषी कायद्यांविरोधात आंदोलनच्या तयारीत | भाजप नेत्यांची धावाधाव
दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या आंदोलनाचा आजचा (२२ डिसेंबर) २७ वा दिवस आहे. मात्र, थंडीचा जोरात मार बसत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. आंदोलना दरम्यान ३३ शेतकऱ्यांचा विविध कारणांनी मृत्यू झाला आहे. सोमवारी शेतकऱ्यांनी दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवे आणि अन्य काही मार्ग अडवलेत. विविध सीमेवर शेतकऱ्यांनी २४ तासांचे उपवास सुरू केले आहे. उपवासाची श्रृंखला आंदोलन असेपर्यंत ठेवली जाणार आहे. सोनीपथ येथे कुंडली सीमेवर आज ६५ वर्षीय निरंजन सिंह या शेतकऱ्याने विष प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.
4 वर्षांपूर्वी -
मोदी सरकार खोटारडे आहे | मला दोनवेळा फसवलं | नाक दाबा त्याशिवाय ते....
कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनावर तोडगा निघत नसल्यानं दिल्लीत आंदोलन करत असलेल्या जवळपास 40 शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या भारत बंदला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल आणि दिल्लीला येणारे सर्व रस्ते बंद करण्यात येतील असा इशाराच शेतकरी संघटनांनी दिला आहे.
4 वर्षांपूर्वी -
शिखर बँक: अण्णा हजारेंकडून शरद पवारांना क्लीन चीट
शिखर सहकारी बँकेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार , माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह ७० जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये सत्ताधारी भाजपा-शिवसेनेसह दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांचा समावेश आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांची धामधूम सुरू असताना झालेल्या या कारवाईने एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारेंनी यांनी सदर विषयाला अनुसरून शरद पवारांना क्लीन चिट दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
RTI कायद्यातील सुधारणांच्या विरोधात रस्त्यावर उतरा; अण्णांचं तरुणांना आवाहन
कालच्या RTI संबंधित बातमीनंतर देशातील राजकारण ढवळून निघालं आहे. केंद्र सरकार सध्या आरटीआय कायद्यात सुधारणा करण्याच्या तयारीत आहे. त्यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली आहे. तसेच तरुणांनी या विरोधात आवाज उठवावा अस आवाहन केले आहे. राळेगणसिद्धी येथे पत्रकार परिषदेत बोलताना जनता मालक असून लोकप्रतिनिधी आणि अधिकारी जनतेचे सेवक आहेत. त्यामुळे सेवक काय काम करतो हे लोकांना माहित होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच हा कायदा आणला.
6 वर्षांपूर्वी -
अण्णांच्या संबंधी बोलणे आणि वाचणे मी सोडून दिले आहे: शरद पवार
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या उपोषण या विषयावर बोलणे आणि बातम्या वाचणे देखील मागील २ वर्षे पूर्णपणे सोडून दिलं आहे, अशी खोचक प्रतिक्रिया एनसीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील बारामती हॉस्टेल येथे पक्षातील वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली.
6 वर्षांपूर्वी -
पत्र मिळालं, आपणास शुभेच्छा; असं एका ओळीत उत्तर देत अण्णांची मोदींकडून हेटाळणी
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मागील ५ वर्षांत तब्बल ३८ वेळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठविल्यावर अखेर त्यांनी प्रथमच अण्णांच्या पत्राला केवळ एका ओळीत उत्तर देत त्यांची अप्रत्यक्ष हेटाळणीच केल्याचे म्हटले जात आहे. त्यात अण्णांना उत्तर देताना म्हटलं आहे की, ‘तुमचे १ जानेवारीचे पत्र मिळाले. आपणास शुभेच्छा’ केवळ एवढाच एका ओळीचा उल्लेख संबंधित पत्रात करण्यात आला आहे. परंतु, अण्णांनी विचारलेल्या शेतकऱ्यांच्या, लोकपाल नियुक्ती तसेच प्रत्येक राज्यात लोकायुक्त कायदा याबाबत उत्तर देण्याचे नरेंद्र मोदींनी स्पष्ट टाळले आहे.
6 वर्षांपूर्वी -
अभ्यासपूर्वक राफेल प्रकरणाचे सत्य लोकांसमोर आणणार: अण्णा हजारे
मोदी सरकारने फ्रान्ससोबत केलेल्या राफेल लढाऊ विमानांच्या करारामध्ये घोटाळा झाल्याचा आरोप आधीच विरोधकांनी केला आहे. त्यात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याविषयावरून भाजपला काय करू आणि काय नको अशी परिस्थिती करून ठेवली आहे. परंत्तू, आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे सुद्धा सदर विषयात हात घालणार असल्याने मोदी सरकारच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अण्णा प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की, राफेल प्रकरणाचा मी अभ्यास करत असून, याबाबतचे सत्य मी सामान्य जनतेसमोर आणेण अशी घोषणा, अण्णा हजारे यांनी यांनी केली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेची टीका, अण्णांच्या गर्जनांचा पचपचीत 'गाजर' हलवा झाला
सामना अग्रलेखातून शिवसेनेने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या दिल्लीतील रामलीला मैदानावरील उपोषणावर सडकून टीका केली आहे.
7 वर्षांपूर्वी -
नो लोकपाल, नो मोदी', घोषणांनी रामलीला मैदान दुमदुमले
अण्णांची प्रकृती दिवसेंदिवस ढासळत चालली आहे तरी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे त्यांच्या उपोषणावर ठाम आहेत. आज नो लोकपाल, नो मोदी’, घोषणांनी संपूर्ण रामलीला मैदान दुमदुमले. रामलीला मैदानावर हजारो शेतकरी आणि अण्णांचे समर्थक मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करत आहेत. आज अण्णांच्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे.
7 वर्षांपूर्वी -
शहीद दिनापासून अण्णांच लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन
अखेर अण्णांनी आज रणशिंग फुंकले, २३ मार्च म्हणजे शहीद दिनाचे औचित्य साधून अण्णांच आज लोकपाल विधेयकासाठी सत्याग्रह आंदोलन सुरु आणि मोदीसरकारच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
7 वर्षांपूर्वी -
अण्णांचा जन-लोकपालसाठी मोदीसरकार विरोधात एल्गार, दिल्लीला रवाना
जन-लोकपाल आंदोलनासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आज दिल्लीला रवाना झाले. लवकरच ते मोदी सरकारवर विरोधात लोकपाल विधेयक पारित करावे म्हणून उपोषणाला बसणार आहेत.
7 वर्षांपूर्वी