Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Balasaheb Thorat To Ashish Shelar | भाजपाच्या नेत्यांना भाकीत करण्याची सवय, त्यांनी ज्योतिष बदलावा - थोरात
काल भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी राज्यात लवकरच निवडणुका लागतील असं वक्तव्य केलं होतं आणि आता त्याला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे. महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून भाजपातील काही नेत्यांना काहींना काही भाकीत करण्याची सवय आहे. मात्र, भाजपामध्ये जो ज्योतिष आहे, जो भविष्य बदलत असतो. तो आता त्यांना बदलण्याची गरज आहे, असा खोचक टोला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी लगावला आहे.
4 वर्षांपूर्वी -
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यास आमचा विरोध - बाळासाहेब थोरात
औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर जोरदार हालचाली सुरु आहेत. औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडे तसा प्रस्ताव पाठवला आहे. आता लवकरच शिवसेनेचं स्वप्न सत्यात येणार असल्याचं दिसत असताना महाआघाडीतील प्रमुख घटक कॉंग्रेसने या नामांतरणाला विरोध केला आहे.
4 वर्षांपूर्वी -
कम बॅक राहुलजी | महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचं राहुल गांधींना पत्र
काँग्रेस पक्षात नेतृत्वावरून सुरू असलेल्या घडामोडींमध्येच आता सोनिया गांधी अंतरिम अध्यक्षपदाचा राजीनामा देऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सोमवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार आहे. या बैठकीत सोनिया अध्यक्षपद सोडू शकतात, असं बोललं जातंय. २०१९ साली लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत ऑगस्ट महिन्यात राजीनामा दिला होता. यानंतर वर्षभरापेक्षा जास्त काळ सोनिया गांधी काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत.
5 वर्षांपूर्वी