Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
BLOG : ५ रुपये भी बोहोत बडी चीज होती है बाबू!
एखाद्या सर्वसामान्य मुंबईकराला रेसकोर्स मध्ये धावणाऱ्या घोड्याच्या ताशी वेगापेक्षा मुंबई लोकलचा वेग आणि वेळ हे सगळ्यात जास्त महत्वाचं असतं. खरं मुंबईकराच आयुष्य जगायचं असेल तर लोकलमधून प्रवास केल्याशिवाय पर्याय नाही. मुंबई लोकल मेरी जान हे जरी खरं असलं तरी बेस्टच्या बस ही मुंबईच्या रस्त्यांची शान आहे. लोकल हा मुंबईकरांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे ह्यात शंका नाही.
6 वर्षांपूर्वी -
'बेस्ट' निर्णयाची आजपासून अंमलबजावणी सुरू; किमान भाडं ५ रुपयांवर
मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनातील आणि खिशाला परवडणारा सार्वजनिक प्रवासी वाहतुकीचा कणा असलेल्या बेस्ट परिवहन सेवेच्या किमान प्रवासी भाड्यात कपात करण्यात आली आहे. बेस्ट बसच्या किमान भाडेकपातीला मुंबई महापालिकेची महासभा आणि आरटीएने अधिकृत मान्यता दिल्यानंतर महाराष्ट्र सराकने देखील भाडेकपातीला मान्याता दिली आहे. त्यामुळे आता प्रवाशांना बेस्टचे किमान बसभाडे हे ८ रुपयांवरून ५ रुपयांपर्यंत कमी होणार आहे. दरम्यान, सदर निर्णयाला अनुसरून महाराष्ट्र सरकारकडून परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, बेस्टचे नवे दर आजपासून प्रत्यक्ष लागू होणार आहेत.
6 वर्षांपूर्वी