Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मराठी जनता आणि मराठी पत्रकार देखील संताप व्यक्त करताना एकवटले
राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या मुंबईबद्दलच्या विधानानंतर राज्यभरातून प्रतिक्रिया येत आहेत. विविध राजकीय पक्षातील नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहे. यामध्ये महत्त्वाची गोष्ट म्हणजे भाजपचे नेत्यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कारण आमदार नितेश राणे, विधान परिषद आमदार प्रसाद लाड यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचे समर्थन केले आहे, तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार आशिष शेलार यांनी असहमत असल्याचे म्हटले आहे.
3 वर्षांपूर्वी -
खुलासा करण्याच्या बहाण्याने राज्यपालांनी OBC आरक्षण अध्यादेश रोखला? | कोश्यारी, भाजप विरुद्ध ठाकरे सरकार वाद पेटणार
ठाकरे सरकारनं ओबीसी आरक्षणासंदर्भात काढलेल्या अध्यादेशाला राज्यपालांनी रेड सिग्नल दाखवल्याची सूत्रांची माहिती आहे. विधानपरिषदेच्या 12 जागांवरील नियुक्तीला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अद्यापही मंजुरी दिलेला नाही.ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला राज्यपालांनी ब्रेक लावत ठाकरे सरकारला काही प्रश्न देखील विचारले आहेत. आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना अध्यादेश कसा? असा प्रश्न भगतसिंह कोश्यारींनी ठाकरे सरकारला विचारला असल्याची माहिती पुढे आली आहे.
4 वर्षांपूर्वी -
NCRB रिपोर्ट | महिला अत्याचारात भाजपशासित राज्य देशात टॉप 3 मध्ये | तर राज्यपालांचे ठाकरे सरकारला विशेष अधिवेशनसाठी पत्र
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. राज्यपाल कोश्यारींनी आपल्या पत्रात मुंबईतील साकीनाका बलात्कार प्रकरणावरुन कायदा सुव्यवस्थेकडे बोट दाखवलं आहे. इतकंच नाही तर राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेबाबत मुख्यमंत्र्यांना दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्याच्या सूचना केल्या आहेत. राज्यपालांनी कायदा सुव्यवस्थेची दखल घेणं, त्यात अधिवेशन बोलावण्याच्या सूचना करणं हे म्हणजे राज्याच्या सक्रीय राजकारणात वाढत्या हस्तक्षेपाचं द्योतक आहे, असं मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
4 वर्षांपूर्वी -
वाद पेटणार? | पूरग्रस्तांना सर्व मदत केंद्र सरकारनेच केली - राज्यपालांच वक्तव्य
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथे पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी आले असताना पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत त्यांनी थेट राजकीय पवित्रा घेतला आणि केंद्रानेच ही मदत दिली आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. याच वेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सरकारचे नावही घेतले नाही. त्यांच्या या भूमिकेने राज्यपाल विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील दरी अधिकच रुंदावत असल्याची प्रचिती पुन्हा आली.
4 वर्षांपूर्वी