Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
Bharat Bandh | 2 दिवसांचा संप | केवळ बँकिंगच नाही तर तुम्हाला या समस्यांना सामोरे जावे लागू शकते
येत्या 28 आणि 29 मार्च असे दोन दिवस कामगार संघटनांचा संप आहे. या संपामुळे बँकिंग कामकाजावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यासाठी देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियासह इतर बँकांनीही आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे. केवळ बँकिंग सेवांवर परिणाम होईल असे नाही, याशिवाय वीज आणि वाहतूक सेवांवरही (Bharat Bandh) परिणाम होऊ शकतो.
3 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | जळगावात काँग्रेस-राष्ट्रवादी शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर | दुकाने बंद करण्याचं आवाहन
केंद्र सरकारने गेल्या वर्षी पारित केलेल्या तिन्ही कृषी कायद्यांच्या विरोधात आज काँग्रेससह सर्वच समविचारी पक्षांनी भारत बंद आंदोलनाची हाक दिली आहे. जळगावात या आंदोलनाला संमिश्र प्रतिसाद लाभला. सकाळ सत्रात बाजारपेठ नेहमीप्रमाणे सुरू झाल्याने बंदचा कोणत्याही प्रकारचा परिणाम जाणवत नव्हता. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. त्यांनी व्यापाऱ्यांना सक्तीने दुकाने बंद करण्यास भाग पाडले.
4 वर्षांपूर्वी -
Bharat Bandh | हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थानमध्ये भारत बंदचा मोठा परिणाम
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या काही महिन्यापासून शेतकरी आंदोलन करत आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही, तोपर्यंत आंदोलन असेच सुरु राहील असा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी संपूर्ण देशात सकाळी 6 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत भारत बंदची हाक दिली आहे. या दरम्यान, संपूर्ण देशात शेतकरी महामार्गावर चक्का जाम आंदोलन आणि रेल्वे रुळावरही आंदोलन करत आहे.
4 वर्षांपूर्वी -
GST आणि तेल किंमतींविरोधात भारत बंद | 8 कोटी व्यापाऱ्यांचे समर्थन
ई-वे बिल, पेट्रोल-डिझेलचे वाढते दर आणि वस्तू व सेवा कर (GST) यावरुन आज अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (कॅट) भारत बंदची हाक दिली आहे. रस्ते वाहतूक क्षेत्रातील सर्वोच्च संस्था ऑल इंडिया ट्रान्सपोर्टर वेलफेअर असोसिएशन (AITWA) आणि इतर संस्थांनीही या बंदला पाठिंबा जाहीर केला आहे.
4 वर्षांपूर्वी