Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
'A फॉर'? सगळ्या विकृतींचं नाव एकच! नितेश राणेंना म्हणायचंय तरी काय? कारण योगी आदित्यनाथ, अमित शहा??
BJP MLA Nitesh Rane | नागपूर विधिमंडळ परिसरात माध्यमांशी बोलताना नितेश राणे म्हणाले, “आपण सगळ्यांनी विचार करायला हवा की, महाराष्ट्रात इतके राजकारणी आहेत, पण जेव्हा जेव्हा सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियनचा प्रश्न येतो. मुद्दा काढला जातो, तेव्हा फक्त आदित्य ठाकरेंचं नाव का घेतलं जातं? तेव्हा दुसऱ्या राजकारण्याचं नाव का घेतलं जात नाही? का उल्लेख केला जात नाही. दुसरे राजकारणी महाराष्ट्रात नाहीये का? कुठे न कुठे दाल में कुछ काला हे म्हणून तर एकाच माणसाचं सातत्यानं नाव घेतलं जातं.
2 वर्षांपूर्वी -
राणे पुत्राच्या कोकणी मतदारांना प्रचारादरम्यान धमक्या! जे गाव माझ्या विचाराचा सरपंच देईल त्याच गावाचा विकास अन्यथा...
MLA Nitesh Rane | भारतीय जनता पक्षाचे नेते आणि आमदार नितेश राणे हे त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. यातच आता त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. सरपंच निवडून आला नाही तर एक रुपयाचा निधी देणार नाही, अशी धमकी नितेश राणे यांनी गावकऱ्यांना दिली आहे. त्यांनी दिलेल्या या धमकीचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी चालू आहे. या निवडणुकांच्या प्रचारामध्ये सर्वपक्षीय नेते व्यस्त आहेत. याच प्रचारादरम्यान नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील नांदगाव येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांचं हे वक्तव्य असल्याचं सांगण्यात येत आहे.
2 वर्षांपूर्वी