Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
जळगाव | भाजपचे काही बंडखोर नगरसेवक स्वगृही परतण्याच्या वाटेवर? - सविस्तर वृत्त
शहर मनपात ६ महिन्यांपूर्वी मोठा बॉम्बगोळा टाकत भाजपचे ३० नगरसेवक शिवसेनेत गेले होते. शिवसेनेकडून मिळालेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्याने वाढत असलेला दुरावा टोकाच्या भूमिकेपर्यंत पोहचला असून काही बंडखोर पुन्हा स्वगृही परतण्याच्या वाटेवर आहेत. भाजपच्या एका मोठ्या नेत्यासोबत या बंडखोरांच्या बैठका झाल्या असून दुसऱ्या भाजप नेत्याकडून यास दुजोरा मिळाला आहे. भाजपचे काही बंडखोर पुन्हा स्वगृही परतल्यास मनपातील चित्र बदलण्याची शक्यता आहे.
4 वर्षांपूर्वी -
चंद्रकांतदादांच्या नाशिक दौऱ्यानंतरही भाजपमध्ये अंतर्गत वाद | एका प्रभाग समितीवर शिवसेनेची बाजी
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नाशिकचा दौरा करून स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या बैठक घेतल्या होत्या. त्यानंतरही भाजपमध्ये स्थानिक पातळीवर मोठी धुसपूस असल्याचं पाहायला मिळालं आहे. विशेष म्हणजे भाजपमधील काही पदाधिकारी शिवसेनेला मदत करत असल्याचं देखील सिद्ध झालं आहे.
4 वर्षांपूर्वी -
तुकाराम मुंढे यांची थेट पीएमओकडे तक्रार, नितीन गडकरींचा पुढाकार
मुंबई, पुणे शहरापाठोपाठ नागपूरमध्ये दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. मात्र, कोरोना आणि पावसाळ्याच्या तोंडावर संकटाशी दोन हात करण्यासाठी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे महापालिकाच्या पाच हॉस्पिटलचा कायापालट केला आहे. तुकाराम मुंढे यांनी करून दाखवलं असं म्हणत, त्यांच्या कामगिरीची सर्वत्र प्रशंसा होत असताना नागपुरात महापौरविरुद्ध आयुक्त वाद पेटल्याचं पाहायला मिळालं होतं.
5 वर्षांपूर्वी