Warning: Undefined property: WP_Error::$cat_ID in /var/www/html/staging.maharashtranama.com/wp-content/themes/maharashtranamanews/tag.php on line 7
महत्वाच्या बातम्या
-
महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप; फडणवीस पुन्हा सीएम, अजित पवार उपमुख्यमंत्री
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेनेचं सरकार स्थापन होणार असं वाटलं असतानाच आज महाराष्ट्राच्या राजकारणाला नाट्यमय कलाटणी मिळाली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या अनेपक्षित घडामोडींमुळं राज्यभरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
6 वर्षांपूर्वी -
यापुढे फक्त मनसे पक्षहित? मनसे नाशिकच्या दत्तक पुत्रांसोबत; महापौरपद भाजपाकडे
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात ऐतिहासिक अशी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची महाविकासाआघाडी अस्तित्वात आली आहे आणि दुसऱ्याबाजूला २५ वर्षांपूर्वीची भाजप-शिवसेनेची युती केंद्रापासून संपुष्टात आली आहे. २०१४च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा जाहीर करत अप्रत्यक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पसंती दिली होती. मात्र त्याला शिवसेनेने तीव्र विरोध केला होता.
6 वर्षांपूर्वी -
भाजपाला सोडून कोणतेही सरकार टिकणार नाही: सुभाष देशमुख
सत्तास्थापनेच्या प्रक्रियेतील सर्व महत्त्वाचे मुद्दे संपले आहेत. दोन्ही काँग्रेसच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली आहे. उद्या पुन्हा आमची चर्चा होणार असून त्यानंतर शुक्रवारी शिवसेनेच्या नेत्यांसोबत चर्चा करण्यात येईल. शुक्रवार संध्याकाळपर्यंत सत्तेचा फॉर्म्युलाही तयार होणार असून त्याच दिवशी संध्याकाळपर्यंत सत्तास्थापनेची अंतिम घोषणा करण्यात येणार असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. शिवसेनेसोबत जाण्याबाबत आजच्या बैठकीत तत्त्वत: मंजुरी देण्यात आल्याचे संकेतही त्यांनी दिले.
6 वर्षांपूर्वी -
आपसातील भांडणांमुळे दोघांचे नुकसान झाले पण अजून भांडणं बंद नाहीत: मोहन भागवत
राज्यातील सत्ता स्थापनेचा पेच अद्याप सुटलेला नाही. भारतीय जनता पक्ष-सेना यांच्यात सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी आता सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या भाषणातून अप्रत्यक्ष सल्ला दिला आहे. नागपूरमध्ये एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी सांगितले की, लहान मुलांचे प्रथम गुरू त्यांचे आई-वडील असतात. शाळेत जाण्यापूर्वी त्यांना प्राथमिक शिक्षण घरातूनच मिळतं.
6 वर्षांपूर्वी -
युती तुटली! शिवसेना ‘एनडीए’बाहेर; भाजपाकडून अधिकृत घोषणा
महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवरून भारतीय जनता पक्षासोबत काडीमोड घेतलेली शिवसेना आता एनडीएतून बाहेर पडली आहे. संसदेतील दोन्ही सभागृहांत म्हणजेच, लोकसभा आणि राज्यसभेत शिवसेनेचे खासदार विरोधी पक्षात बसणार आहेत. ते विरोधी पक्षांच्या बाकावर बसतील, अशी संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज प्रसारमाध्यमांना दिली.
6 वर्षांपूर्वी -
राज्यात नवी समीकरणे जुळत असल्याने अनेकांना पोटाचे विकार सुरू झाले: शिवसेना
सरकार स्थापन करण्यास असमर्थ आहोत असं सांगणारे राष्ट्रपती राजवट लागू होताच ‘आमचेच सरकार येणार’ असं कोणत्या तोंडानं सांगत आहेत’, असा खडा सवाल करतानाच, ‘श्रीरामासही राज्य सोडावे लागले होते. त्यामुळं इतकं मनास लावून घेऊ नका,’ असा खोचक सल्ला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी -
पडद्याआड हालचाली! काँग्रेस-राष्ट्रवादीत फेर-मेगाभरती होण्याची शक्यता? सविस्तर वृत्त
सरकार स्थापनेच्या सुरुवातीलाच बहुमताचा आकडा गाठणं अशक्य असल्याचं लक्षात येताच भाजपच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यास आम्ही असमर्थ आहोत असं जाहीर केलं. मात्र, मागील दोन दिवसांपासून असमर्थ ठरणारे भाजपचे नेते अचानक पुन्हा आमचंच सरकार येणार असं वारंवार बोलू लागले आहेत. परंतु, त्यामागील मुख्य कारण दुसरंच असल्याचं वृत्त आहे. कारण महाशिवआघाडीचं सरकार स्थापन होताच भारतीय जनता पक्षातील विद्यमान मंडळी भाजपाला सोडचिट्ठी देण्याचा मार्गावर असल्याची चुणचुण भाजपाला लागली आहे.
6 वर्षांपूर्वी -
उद्धव ठाकरेंवर राग व्यक्त करण्यासाठी भाजपकडून ठाकरेंच्या कौटुंबिक नात्याचा वापर?
गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेचा मोदींबद्दलचा आदर स्वाथी की नि:स्वार्थी? आशिष शेलार
गुरूवारी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली होती. यावेळी त्यांनी भाजपचे अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर निशाणा साधला होता. ‘मुख्यमंत्रीपदाबाबतची चर्चा बंद दाराआड अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये झाली होती. ती बंद दाराची खोली खुद्द शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची होती. त्यामुळे त्यांची ती खोली आम्हाला मंदिरापेक्षा कमी नाही. तिथे झालेली शहा-ठाकरे यांच्यातील चर्चा शहांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितली नाही, त्यामुळे गोष्टी बिघडल्या’, असा घणाघाती आरोप संजय राऊत यांनी थेट अमित शहा यांच्यावर केला होता. त्यामुळे आशिष शेलार यांनी आज संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला.
6 वर्षांपूर्वी -
मुंबई पालिका कंत्राटदारांवरील धाडीमार्गे सेना लक्ष? राज्यात सत्ता येताच सेना उत्तर देणार?
मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेचे बिनसले असताना केंद्र सरकारच्या अखत्यारीतील प्राप्तीकर विभागाने सेनेच्या ताब्यातील महापालिकेतील कंत्राटदारांवर छापे टाकले आहेत. यावरून भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेत्यांनी शिवसेना पक्ष नैत्रुत्वाच्या विरुद्ध आघाडी उघडल्याची चर्चा रंगली आहे. मात्र, राज्यात सत्ता स्थापन होताच शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी देखील भाजपच्या संबंधित घोटाळ्यांमध्ये लक्ष घालण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी चालवलेला हा खेळ काही दिवसचं बघायचा आणि सत्ता येताच चोख प्रतिऊत्तर द्यायचं अशी चर्चा शिवसेना आणि मित्रपक्षांमध्ये रंगली आहे.
6 वर्षांपूर्वी -
#VIDEO: उद्धव यांचा हाच तो पुरावा ज्यावरून भाजप खोटं बोलत आहे हे सिद्ध होतं
सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये मुख्यमंत्री पद आणि सत्तेत समसमान वाटा यावरून आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहे. मात्र अमित शहा यांनी मातोश्रीवर भेट दिल्यानंतर जी चर्चा झाली होती, त्यानंतर स्वतः उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर शिवसैनिकांशी संवाद साधत यावर भाष्य करत शिवसैनिकांना खात्री दिली होती. त्याचा पुरावा म्हणजे सध्या समाज माध्यमांवर व्हायरल झालेला हा व्हिडिओ मोठा पुरावा म्हणावा लागेल.
6 वर्षांपूर्वी -
मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश असल्याचं त्यांचे आनंदी चेहरे सांगतात: सेनेची जहरी टीका
राष्ट्रपती राजवट लादली म्हणजे महाराष्ट्रातील सत्ता परिवारातच राहिली. त्यामुळे मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत हे त्यांच्या आनंदी चेहऱ्यावरून दिसत आहे. आता सरकार कोणी व कसे बनवायचे? राष्ट्रपती राजवटीचा खेळखंडोबा लवकरात लवकर कसा दूर करायचा हाच प्रश्न आहे अशा शब्दात सामना अग्रलेखातून शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
६ तारखेच्या बैठकीत निर्णय, पण शेतकऱ्यांना आकस्मित निधी पोहोचलाच नाही: सविस्तर
राज्यात सर्वत्र अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. राज्यातील सत्ता स्थापनेवरून भारतीय जनता पक्ष-शिवसेनेत वाद सुरू असताना दुसरीकडे शरद पवार हे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावले होते. शरद पवार शुक्रवारी अकरा वाजेच्या सुमारास नाशिकमध्ये दाखल झाले होते. इगतपुरीमधील भात पिकाच्या नुकसानीची पाहणी त्यांनी केली. शेतकऱ्यांचं नुकसान आणि त्यांच्या व्याथा त्यांनी जाणून घेतल्या होत्या. आमच्या हातचं पीक गेलंय. खूप नुकसान झालंय. जगावं की मरावं असा प्रश्न आमच्या समोर आहे. मात्र सरकारतर्फे कुणीच आलेलं नाही, असं शेतकऱ्यांनी पवारांना सांगितलं.
6 वर्षांपूर्वी -
४ राज्यात भाजपने जनादेशाचा अपमान केला, पण राष्ट्रपती राजवट लागू झाली नाही
सध्या राज्यातील सत्तास्थापनेच्या अनुषंगाने भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा तिळपापड होताना दिसत आहे आणि त्यामुळे ते संतापलेले दिसत असून प्रत्येक गोष्टीत जनादेशाचा आदर भाजप करते असे डोस पाजू लागले आहेत. त्यामुळे समाज माध्यमांवर देखील भाजपच्या या टीकेला जोरदार प्रतिउत्तर देण्यात येतं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सब का हिसाब होगा? राज्यातील सर्व महामंडळं व समित्यांवरून भाजपराज खालसा होणार
राज्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तास्थापनेचे अंतिम सूत्र ठरल्याची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्रीपद अडीच अडीच वर्षांसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाटून घेतले जाईल तर पूर्ण पाच वर्षांसाठी उपमुख्यमंत्रीपद हे काँग्रेसकडे राहील या निर्णयावर सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत झाल्याचे वृत्त आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे खासदार आणि सोनिया गांधी यांचे निकटवर्तीय अमहमद पटेल यांच्यामध्ये मुंबईत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
6 वर्षांपूर्वी -
'अब आएगा मज़ा'; आमदार नितेश राणेंचं ट्विट
सत्तास्थापनेचा तिढा वाढला असून भारतीय जनता पक्षासाठी सर्व अशा जवळपास संपल्यात जमा आहेत. भारतीय जनता पक्षातील दिल्ली ते गल्ली’मधील नेत्यांची अवस्था पाहता आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ठाम भूमिका पाहता, भाजपने युतीत सत्ता स्थापनेची अपेक्षा जवळपास संपुष्टात आणली आहे. मात्र इतिहासात तोडफोडीच्या राजकारणाचा अनुभव असलेल्या खासदार नारायण राणे यांना बोलावून फडणवीसांनी त्यांच्यावर सरकार स्थापनेच्या शक्यता तपासण्याची जवाबदारी टाकल्याचे वृत्त आहे. त्यालाच अनुसरून आमदार नितेश राणे यांनी खासदार नारायण राणे यांचा फोटो ट्विट करत “अब आएगा मज़ा” असं ट्विट केलं आहे.
6 वर्षांपूर्वी -
सत्तास्थापना अशक्य असल्याने फडणवीसांनी राणेंवर जवाबदारी टाकली? - सविस्तर वृत्त
आपल्याला सत्ता स्थापन करायची आहे, कामाला लागा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला सांगितलं असून सत्ता स्थापन करण्याची जबाबदारी त्यांनी माझ्यावर दिली आहे, असं सांगतानाच मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्यामुळे भाजपची सत्ता येण्यासाठी मला जे काही करता येईल ते करेल, असं भारतीय जनता पक्ष नेते नारायण राणे यांनी स्पष्ट करून खळबळ उडवून दिली.
6 वर्षांपूर्वी -
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी राज्यपालांची केंद्रीय गृहमंत्रालयाकडे शिफारस: दूरदर्शनचं वृत्त
राज्यातील सत्तास्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केंद्रीय गृहमंत्रालयाला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची शिफारस केली आहे. राज्यपालांनी भारतीय जनता पक्ष, शिवसेनेला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं होतं हे दोन्ही पक्ष सरकार बनविण्यात असमर्थ ठरले असून राज्यपालांनी राष्ट्रवादीला निमंत्रण दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी शिवसेनेच्या पाठिंब्यावर अवलंबून असल्याचं दिसून येत असल्याने राज्यपालांनी कायदेशीर सल्ला घेत केंद्रीय गृहमंत्रालयाला ही शिफारस पाठविली असल्याची माहिती सरकारी वृत्तवाहिनी दूरदर्शनने दिली आहे.
6 वर्षांपूर्वी -
शिवसेनेसाठी गोड बातमी! राज्यात महाशिवआघाडीचं सरकार येणार
महाराष्ट्रातील सत्तेचा पेच सोडवण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी वैचारिक मतभेद दूर लोटून शिवसेनेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेणार का?, याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले असताना व याबाबत अनेक उलटसुलट बातम्या क्षणाक्षणाला येत असताना त्याचं उत्तर ‘होय’ असं मिळालं आहे. सोनिया गांधी यांनी शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली.
6 वर्षांपूर्वी -
बाळासाहेबांनीच भाजपाला महाराष्ट्रात स्थान दिलं: माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का देत शिवसेनेने काँग्रेस आणि एनसीपी’ला सोबत घेऊन सत्तास्थापनेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. महाराष्ट्रातील या राजकीय उलथापालथीवर अनेक मतप्रवाह पाहायला मिळत असताना माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी अत्यंत स्पष्ट शब्दांत शिवसेनेच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे व काँग्रेसलाही महत्त्वाचा असा सल्ला दिला आहे.
6 वर्षांपूर्वी